व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने  उचलले मोठे पाऊल, 60 वर्षानंतर मिळणार दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन.. पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महाराष्ट्र सरकारने राज्यातील बांधकाम कामगारांच्या भविष्यासाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक घोषणा केली आहे. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत याबाबतची घोषणा केली आहे. यामध्ये त्यांनी बांधकाम कामगारांना 60 वर्षे वयानंतर सरकारकडून बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणीकृत असणाऱ्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये निवृत्तीवेतन दिले जाईल असे, या घोषणेमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे. या पोस्टमध्ये आपण सरकारने केलेल्या निवृत्ती वेतना विषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

बांधकाम कामगार योजनेविषयी थोडक्यात…

बांधकाम कामगार योजना ही भारतातील राज्य सरकार आणि केंद्र सरकारद्वारे बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या कल्याणासाठी राबवली जाणारी एक कल्याणकारी योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेचे उद्दिष्ट बांधकाम कामगारांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक मदत प्रदान करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी विविध लाभ उपलब्ध करून देणे. या लाभामध्ये प्रामुख्याने..

  • बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते.
  • कामगारांचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते.
  • मोफत आरोग्य तपासणी आणि वैद्यकीय मदत देखील दिली जाते.
  • बांधकाम कामगारांना या योजनेअंतर्गत घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत प्रदान केली जाते.
  • बांधकाम कामगारांच्या साठी पेन्शन योजना आणि इतर आर्थिक मदतीच्या योजना सुद्धा राबवल्या जातात.
  • महिलांसाठी प्रसुती मदत आणि मुलींच्या लग्नासाठी अनुदानाची तरतूद या योजनेच्या माध्यमातून केली आहे.

वरील सर्व लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांना स्थानिक बांधकाम कामगार कल्याण मंडळात आवश्यक कागदपत्रासह नोंदणी करणे अनिवार्य आहे.

हे वाचा 👉  खुशखबर! आता या नागरिकांना ही घर बांधण्यासाठी मिळते 2 लाख 50 हजार रुपये अनुदान फक्त इथं करा अर्ज....! Gharkul Yojana scheme

बांधकाम कामगार योजना बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांच्या हितासाठी खूपच महत्त्वाची आहे या योजनेच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना मूलभूत, आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा प्रदान केली जाते.

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची बांधकाम कामगारांसाठी मोठी घोषणा

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत बांधकाम कामगारांसाठी निवृत्ती वेतनासंबंधित घोषणा करताना असे सांगितले की, इमारत आणि इतर बांधकाम व्यवसायातील कामगारांच्या हिताच्या संरक्षणार्थ केंद्र सरकारने 1996 ला कायदा लागू केला आहे. या कायद्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याने 2007 मध्ये नियम बनवले आहेत. या नियमांतर्गत 2011 मध्ये महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाची स्थापना मुंबईमध्ये करण्यात आली आहे. या मंडळामध्ये 18 ते 60 वर्षे वयोगटातील बांधकाम कामगारांची नोंदणी करून घेतली जाते. नोंदणी केलेल्या कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये आता बांधकाम कामगारांना 60 वर्षे वयानंतर दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाणार असल्याचे मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितले आहे.

बांधकाम कामगार योजनेअंतर्गत दरवर्षी 12,000 रुपये मिळणार निवृत्ती वेतन

ज्या व्यक्तीचे वय 60 वर्षे पूर्ण झालेले आहे त्या व्यक्तीची बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी होऊ शकत नाही. तसेच त्यांना या योजनेअंतर्गत मिळणारा कोणताही लाभ घेता येत नाही. ही बाब प्रामुख्याने विचारात घेऊन बांधकाम कामगार मंडळाने नोंदणीकृत असलेल्या आणि वयाची साठ वर्षे पूर्ण केलेल्या बांधकाम कामगारांना दरवर्षी 12 हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी केली आहे. यातील तरतूद अशी असणार…

  • बांधकाम कामगारांना 10 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना 50% च्या मर्यादेत प्रतिवर्षी 6000
  • बांधकाम कामगारांना 15 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर 75% मर्यादित प्रतिवर्षी 9000
  • बांधकाम कामगारांना 20 वर्षे नोंदणी कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रतिवर्षी 12,000 रुपये इतके निवृत्तीवेतन देण्यात येईल.
हे वाचा 👉  SBI Mutal fund बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा

निवृत्तीवेतन घोषणेमुळे होणार 58 लाख बांधकाम कामगारांचे भवितव्य सुरक्षित

कायद्यातील तरतुदी आणि केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन निवृत्ती वेतनाची सविस्तर कार्यपद्धती निश्चित करण्यात येणार आहे. सध्या बांधकाम मंडळाकडे 58 लाख बांधकाम कामगारांची नोंदणी आहे. या निर्णयामुळे बांधकाम कामगारांच्या कुटुंबाचे आणि यापुढे मंडळाकडे नव्याने नोंदणी होणाऱ्या कामगारांचे कुटुंबांचे भवितव्य सुरक्षित होणार आहे.

बांधकाम कामगार नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत? ते आपण खाली पाहूया:

  • वयाच्या पुराव्यासाठी आधार कार्ड, जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी पुराव्यासाठी रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, युटिलिटी बिले यामध्ये वीज, पाणी, लाईट बिल
  • ओळखीच्या पुराव्यासाठी पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स
  • मागील 12 महिन्यांमध्ये 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज 3 फोटो

बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशी करायची?

बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी कशी करायची? याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला Mahaboce च्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. https://mahabocw.in/mr/
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला कामगार नोंदणी विभागांमध्ये जाऊन फॉर्म-5 डाऊनलोड करून घ्यावा लागेल.
  • फॉर्म-5 मध्ये आवश्यक ती माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडा.
  • कामगार योजनेचा भरलेला फॉर्म आणि कागदपत्रे जवळच्या तालुका कामगार सुविधा केंद्रात सादर करा.
  • अर्ज सादर केल्यानंतर, कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुमच्या सोयीची तारीख निवडा आणि त्या दिवशी मूळ कागदपत्रांसह तुम्ही निवडलेल्या कामगार सुविधा केंद्रावर उपस्थित रहा.
हे वाचा 👉  गाय-म्हैस खरेदीसाठी शेतकऱ्यांना २.५० लाख रुपये मिळणार. – अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करून तुमचे भविष्य सुरक्षित करू शकता.

बांधकाम कामगारांच्या निवृत्ती वेतन घोषणा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी विधानसभेत केल्यामुळे राज्य सरकारकडून बांधकाम कामगारांना या घोषणेच्या माध्यमातून एक खूप मोठा दिलासा मिळणार आहे. या घोषणामुळेच बांधकाम कामगारांचे भवितव्य उतार वयामध्ये सुरक्षित राहणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहिली आहे. त्याचबरोबर जर तुम्ही बांधकाम कामगार मंडळाकडे बांधकाम कामगार म्हणून नव्याने नोंदणी करणार असाल, तर ती कशी करायची याबाबतची सुद्धा माहिती आपण या पोस्टमध्ये दिली आहे. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page