व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

केशरी, पांढऱ्या, पिवळ्या रेशन कार्ड ची छपाई आणि वितरणही बंद,पहा रेशन कार्ड बंद होण्याची कारणे..

नमस्कार, राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक खूपच महत्त्वाची माहिती आहे. ती महत्त्वाची माहिती म्हणजे आता ई-रेशन कार्ड राज्यातील सर्व रेशन कार्डधारकांना देण्यात येणार असून, रेशन कार्डची छपाई बंद होणार आहे. आपण सदर लेखांमध्ये रेशन कार्ड छपाई बंद होण्याची कारणे त्याचबरोबर ई-रेशन कार्ड चे वर्गीकरण कशा पद्धतीने होणार आहे? याबाबतची माहिती पाहणार आहोत.

आता तुम्ही जर नवीन रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका काढणार असाल तर, तुम्हाला पिवळे, केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड पुस्तक स्वरूपात मिळणार नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या रेशन कार्डाची छपाई बंद करण्यात आली आहे. या कारणामुळेच पुढील दिवसात राज्यामध्ये नवीन छपाई केलेले कोणतेही रेशन कार्ड मिळणार नाही. या रेशन कार्ड ला पर्याय म्हणून तुम्ही ई-रेशन कार्ड वापरू शकणार आहात. त्याचबरोबर तुमच्याकडे असलेले जुने रेशन कार्डसुद्धा रेशनचा लाभ घेण्यासाठी ग्राह्य असणार आहे.

तुमच्या गावची रेशन कार्ड यादी डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा

प्रशासनाकडून रेशन कार्डची छपाई बंद करण्याचे कारण स्पष्ट करण्यात आले आहे. ते कारण म्हणजे ई-पॉजद्वारे प्रशासन लाभार्थ्यांचा थांब घेऊन माल वितरित करते. यापूर्वी या वितरित केलेल्या मालाची रेशन कार्ड वर नोंद घेतली जात होती. आता ई-पॉज आल्यामुळे प्रशासनाला वितरित केलेल्या मालाची ऑनलाईन नोंदणी ठेवता येते. ऑनलाईन नोंदणी ठेवल्यामुळे प्रशासनावरील ताण कमी झाला आहे. या कारणामुळेच शिधापत्रिकेची किंवा रेशन कार्ड ची छपाई बंद केली आहे. त्याचबरोबर ई-शिधापत्रिकेचा वापर कोणत्याही शासकीय कामांसाठी करता येईल, त्याचबरोबर या शिधापत्रिकेच्या माध्यमातून सरकारी योजनांचा लाभही शिधापत्रिका धारक घेऊ शकतो. असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हे वाचा-  ऑनलाईन अर्जामधील आधार ई-केवायसी पर्याय निवडून, घरबसल्या मोबाईलवरून बनवा ड्रायव्हिंग लायसन्स.. पहा संपूर्ण माहिती!

ई-रेशन कार्डचे कसे होणार वर्गीकरण?

राज्यांमध्ये किंबहुना देशांमध्ये उत्पन्न गटानुसार रेशन कार्डचे वर्गीकरण करण्यात आले आहे. या वर्गीकरणानुसार दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना पिवळे रेशन कार्ड दिले जाते. सामान्य कुटुंबासाठी म्हणजेच अंत्योदय लाभार्थ्यांना पिवळे रेशन कार्ड आणि आर्थिक दृष्ट्यासक्षम यामध्ये जास्तीत जास्त नोकरदार वर्गाचा समावेश होतो अशा नागरिकांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. परंतु, या रेशन कार्डाची छपाई बंद झाल्यामुळे ई-रेशन कार्ड मध्ये याचे वर्गीकरण कसे होणार? याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. यावर प्रशासनाकडून असे सांगण्यात आले आहे की, ई-रेशन कार्डवर लाभार्थी कोणत्या गटातील आहे हे नमूद असणार आहे. त्यामुळे कोणत्याही योजनेचा लाभ घेताना लाभ देणाऱ्यांना याची माहिती असणार आहे.

तुम्ही जर आता नवीन रेशन कार्ड काढायला गेलात तर तुम्हाला ई-शिधापत्रिकाच मिळणार आहे. तसेच जर तुमच्याकडे जुने रेशन कार्ड किंवा छापलेले रेशन कार्ड असले तरीही जर तुम्हाला दुय्यम ई-रेशन कार्ड हवे असेल तर त्यासाठीही तुम्ही अर्ज करू शकता.

सध्या राज्य सरकारकडे छापलेले रेशन कार्ड जितके उरले आहेत त्यांचे वितरण करण्यात येणार आहेत. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये नवीन रेशन कार्डाची छपाई होणार नाही. संपूर्ण राज्यामध्ये फक्त ई-रेशन कार्ड अस्तित्वात येणार आहे. असे प्रशासनाकडून स्पष्ट केले आहे.

ई-रेशन कार्ड बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

ई-रेशन कार्ड बनवण्यासाठी अर्जदाराला खाली दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते पाहूया:

  • ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो
  • पत्त्याच्या पुराव्यासाठी युटिलिटी बिले, बँक स्टेटमेंट किंवा पासबुक, भाडेकरार यापैकी काही कागदपत्रे आवश्यक
हे वाचा-  लाडकी बहिण योजना महाराष्ट्र | Ladaki Bahin Yojana Maharashtra संपूर्ण माहिती

तुमचे रेशन कार्ड डाउनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

ई-रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?

ई-रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • ई-रेशन कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. या ठिकाणी आपण महाराष्ट्रातील नागरिक ई-रेशन कार्ड साठी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात.👇🏼👇🏼 👉🏽https://marathitime.com/download-ration-card/
  • वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही Apply Online for ration card या पर्यायावर क्लिक करा.
  • ई-रेशन कार्ड बनवण्यासाठी तुम्ही ओळखपत्र म्हणून आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट, हेल्थ कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इ. देऊ शकता.
  • रेशन कार्ड साठी तुमच्याकडून 5 रुपयापासून ते 45 रुपयांपर्यंत शुल्क घेतले जाईल.
  • अर्ज भरल्यानंतर शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
  • फिल्ड व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमचा अर्ज योग्य असल्याचे आढळल्यास तुम्हाला ई-रेशन कार्ड मिळेल.

अशा पद्धतीने ई-रेशन कार्ड साठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.

ई-रेशन कार्ड अर्जाचा स्टेटस असा तपासा

  • ई-रेशन कार्ड साठी अर्ज केल्यानंतर तुम्ही घरबसल्या अर्जाची स्थिती पाहू शकता. यासाठी तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ फूडच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. ती वेबसाईट आपण वर दिलेलीच आहे.
  • त्यानंतर Citizen Corner Section वर क्लिक करा.
  • आता Track Food Security Application वर क्लिक करा.
  • यातील चार पर्याय पैकी एक पर्याय भरा.
  • वरील चार पर्याय पैकी एक पर्याय भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची स्थिती दिसेल.
हे वाचा-  शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पीएम किसानचा 18 वा हप्ता ऑक्टोबरच्या 'या' तारखेला येणार - PM Kisan 18th Installment

अशा रीतीने तुम्ही अर्ज केलेल्या ई-रेशन कार्डचा स्टेटस तपासू शकता.

सदर लेखांमध्ये आपण नागरिकांना देण्यात येणाऱ्या रेशन कार्डची छपाई बंद करून, त्या जागी ई-रेशन कार्ड देण्यात येणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही ई-रेशन कार्ड बनवून घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page