व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार, ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी 40% पर्यंतचे अनुदान..पहा योजनेची संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Tractor Trolley Anudan Yojana Maharashtra 2025

नमस्कार शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते. या योजना राबवून शासन आधुनिक शेती पद्धतीवर म्हणजेच यांत्रिक शेती पद्धतीवर भर देत आहे. सरकारद्वारे ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेअंतर्गत 40 ते 50% अनुदान स्वरूपात रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. जेणेकरून शेतीमधील कष्टाची कामे यंत्राच्या साह्याने करून कमी वेळेमध्ये जास्त कामे करता येतील. यामुळेच अशा प्रकारच्या अनेक योजना सरकार शेतकऱ्यांना आधुनिक शेती करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी राबवत असते. सदर लेखांमध्ये आपण ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

राज्यातील बहुतांश नागरिकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. हा शेती व्यवसाय बहुतांश ठिकाणी पारंपारिक पद्धतीने केला जातो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे राज्यातील सर्वसामान्य नागरिक तसेच आर्थिक दृष्ट्या कमकुवत शेतकरी ट्रॅक्टर ट्रॉली सारखी महागडी उपकरणे खरेदी करू शकत नाही. याचा विचार करून सरकार ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना राबवत आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा वापर करून शेतीतील कष्टाची कामे कमी होऊन कमी वेळेमध्ये जास्त काम करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. यामुळे शेतकरी आर्थिक सक्षम होऊन तो स्वावलंबी होऊ शकेल. या सर्व गोष्टीचा विचार करून सरकार ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना राबवत आहे.

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेअंतर्गत मिळणार 40 ते 50% अनुदान

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवली जाते. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारकडून यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी एकूण 14,500 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने या योजनेमध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीसाठी देखील 45 ते 50% अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांनाही अनुदान लॉटरी पद्धतीने मिळणार आहे.

हे वाचा 👉  NLM scheme. शेळीपालन योजना

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान सर्वसाधारण गटासाठी 45% तर, अनुसूचित जाती-जमाती व महिला शेतकरी, अल्पभूधारक शेतकऱ्यांना 50% अनुदान दिले जाणार आहे.

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेअंतर्गत मिळणार इतक्या क्षमतेची ट्रॅक्टर ट्रॉली

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 3 टन क्षमतेपर्यंतच्या ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी अनुदान मिळणार आहे. यासाठी सर्वसाधारण गटाला 50,000 तर अनुसूचित जाती- जमाती व महिला शेतकरी अल्पभूधारक शेतकऱ्यांना 60,000 हजार रुपये पर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

5 टन क्षमतेच्या ट्रॉलीसाठी अनुसूचित जाती-जमाती, अल्पभूधारक, महिला शेतकरी यांना 75,000 रुपये तर, सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना 60,000 रूपयांपर्यंतचे अनुदान दिले जाणार आहे.

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना पात्रता

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी पात्रता कोणत्या आहेत? ते आपण खाली पाहू:

  • ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी शेतकरी, महिला शेतकरी अर्ज करू शकतात, त्याचबरोबर शेतकरी समूह गट, शेतकरी उत्पादक कंपनी, सहकारी संस्था सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
  • सदर योजनेसाठी अर्ज करणारे शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या अर्जदाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच लहान शेतकरी, अल्पभूधारक, अनुसूचित जाती-जमाती, महिला शेतकरी यांना प्राधान्य दिले जाते.
  • या योजनेच्या लाभार्थ्याकडे शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे जेणेकरून अनुदानाची रक्कम सदर बँक खात्यावर हस्तांतरित केली जाईल.
हे वाचा 👉  Moneyview App वरून कमी सिबिल स्कोर वर 2 लाख रुपये मिळवा...|Moneyview App 2 Lakh Personal Loan

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहू:

  • आधार कार्ड
  • 7/12 व 8-अ उतारा
  • बँक पासबुक
  • ट्रॅक्टर नोंदणी प्रमाणपत्र
  • जातीचा दाखला (अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी)
  • खरेदी करावयाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यता तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
  • स्वयंघोषणापत्र
  • पूर्वसंमती पत्र

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी तुम्ही दोन पद्धतीने अर्ज करू शकता. ऑनलाईन व ऑफलाईन आपण या दोन्ही पद्धतीने अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती खाली पाहू:

ऑनलाइन अर्ज:

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम महाडीबीटीच्या या पोर्टलवर लॉगिन करावे लागेल. 👇🏼👇🏼https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
  • तुम्ही जर या पोर्टलवर नवीन असाल तर, तुम्हाला सर्वप्रथम नोंदणी करावी लागेल.
  • नोंदणी करून लॉग इन केल्यानंतर, कृषी विभागाच्या योजनांमध्ये ‘ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना’ निवडा.
  • आवश्यक माहिती भरून योजनेसाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करा.
  • त्यानंतर अर्ज सबमिट करून त्या अर्जाची प्रिंट आऊट घ्या.

ऑफलाईन अर्ज

  • ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजनेसाठी ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयामध्ये जावे लागेल.
  • तिथून तुम्हाला या योजनेचा अर्ज घेऊन त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज कृषी अधिकाऱ्याकडे जमा करा.
हे वाचा 👉  HSRP नंबर प्लेट : १५ वर्षांपेक्षा जुन्या वाहनांसाठी नवी नियमावली. | New rule for 15 year old vehicles on hsrp number plate

अर्ज सादर केल्यानंतर त्या अर्जाची छाननी होऊन, तुम्ही जर या योजनेसाठी पात्र झाला तर अनुदानाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल.

सदर लेखांमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी जी ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान योजना राबवली जाते, त्या योजनेची संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही या योजनेसाठी अर्ज करून पात्र झाला तर लाभ घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page