व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती संग्रहित करणारे अपार कार्ड आहे तरी काय? ते कसे मिळवायचे? जाणून घ्या संपूर्ण माहिती! | Apaar card online apply

नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या लेखांमध्ये अपार कार्ड जे की शालेय ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आधार कार्ड सारखेच असणार आहे. याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया. यामध्ये आपण अपार कार्ड म्हणजे काय? त्याचबरोबर अपार कार्डचे फायदे काय आहेत? अपार कार्ड कसे बनवायचे? त्याचबरोबर अपार कार्ड ची सद्यस्थिती काय आहे? या मुद्द्यांच्या आपण सविस्तर व विस्तृत विश्लेषण करणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया अपार कार्ड विषयीची संपूर्ण माहिती.

शैक्षणिक, शासकीय, आर्थिक अशा अनेक कामांमध्ये आधार कार्ड हे खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचप्रमाणे आता केंद्र सरकारच्या माध्यमातून शालेय ते महाविद्यालयापर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड सारखेच अपार कार्ड बनवावे लागणार आहे. जे पालकांच्या संमतीने तयार केले जाईल. अपार कार्ड च्या माध्यमातून आपणाला विद्यार्थ्यांची शैक्षणिक माहिती ऑनलाईन पाहता येते.

अपार कार्ड हे भारत सरकारद्वारे विद्यार्थ्यांसाठी घेतला गेलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. या कार्डचा प्रमुख उद्देश भारतातील सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक ओळख प्रदान करणे हा आहे.

अपार कार्ड विषयी थोडक्यात..

संपूर्ण भारतातील शालेय ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना युनिक आयडी क्रमांक देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार शिक्षण मंत्रालय आणि भारत सरकारने अपार कार्ड लॉन्च केले आहे.अपार कार्डचे संक्षिप्त रूप स्वयंचलित स्थायी शैक्षणिक खाते नोंदणी असे आहे. अपार कार्ड जारी करण्यासाठी भारत सरकारने शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC) ची स्थापना केली आहे. हे कार्ड एज्युकेशन इकोसिस्टीम रजिस्टर म्हणून काम करते. अपार कार्ड हे वन नेशन वन स्टूडेंट कार्ड म्हणून ही ओळखले जाते. या कार्डचा सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे कारण ते त्यांचा संपूर्ण शैक्षणिक डेटा जसे की बक्षिसे, पदव्या, शिष्यवृत्ती आणि इतर क्रेडिट डिजिटल स्वरूपात संग्रहित करणार आहे.

हे वाचा-  व्हॉट्सॲपवरील कोणीही डिलीट केलेले मेसेज वाचण्याची सोपी पद्धत

अपार कार्ड हे कायमस्वरूपी 12 अंकी ओळखपत्र क्रमांक आहे, जो विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा मागवा ठेवतो आणि एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत हस्तांतरणाची सुविधा देतो. शालेय ते महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या पूर्व विद्यार्थ्यांना शाळा आणि संस्थांद्वारे हे कार्ड वितरित केले जाणार आहे. अपार कार्ड म्हणजेच वन नेशन वन स्टुडन्ट ओळखपत्र मुलांच्या आधार कार्ड क्रमांकाची जोडले जाणार आहे.

अपार कार्ड फायदे

अपार कार्ड चे फायदे काय आहेत? ते आपण खाली पाहूया:

  • अपार कार्ड हे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती संग्रहित करून पुरवते. यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग, फोटो, क्रीडा उपक्रम, शैक्षणिक कर्ज, शिष्यवृत्ती, पदवी प्रमाणपत्र, पुरस्कार इ. माहिती समाविष्ट आहे.
  • अपार कार्ड विद्यार्थ्यांचे आजीवन ओळखपत्र म्हणून काम करते. ज्यामुळे विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांना त्यांची शैक्षणिक प्रगती  सहजपणे पाहता येते.
  • अपार कार्डधारक विद्यार्थ्यांना बस प्रवासात अनुदान, परीक्षा शुल्क भरण्याची सोय, सरकारी संग्रहालयामध्ये मोफत प्रवेश, पुस्तके आणि स्टेशनरीवर सवलत इ. शिक्षण विषयक बाबींमध्ये ज्या अपार कार्डचा उपयोग होतो.
  • या कार्डमधील विद्यार्थ्यांची सर्व समाविष्ट शैक्षणिक माहिती एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत जाण्यास खूपच उपयोगी पडेल. यामुळे देशात कुठेही महाविद्यालयीन प्रवेशासाठी हे कार्ड खूपच उपयोगी आहे.
  • अपार क्रमांक शाळा, पदवी महाविद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय, पदव्युत्तर शिक्षणासह सर्व स्तरावर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदीचा मागवा घेईल.
  • अपार कार्ड विद्यार्थ्यांचा डेटा एका ठिकाणी डिजिटल स्वरूपात ठेवेल, ज्यामध्ये शैक्षणिक परिणाम, चाचणी निकाल, रिपोर्ट कार्ड, आरोग्य कार्ड आणि सह अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांची उपलब्धी जसे की, ऑलिंपियाड रँकिंग, विशेषज्ञ कौशल्य प्रशिक्षण इत्यादीचा समावेश आहे.
  • अपार कार्ड हे थेट ABC बँकेची जोडले जाईल. जेव्हा एखादा विद्यार्थी सेमिस्टर किंवा अभ्यासक्रम पूर्ण करतो तेव्हा क्रेडिट्स थेट ABC मध्ये नोंदवले जातात. त्यामुळे ते सर्व भारतीय महाविद्यालयांमध्ये वैध ठरतात.
हे वाचा-  तुम्ही एटीएम, फोनपे, गुगल पे, क्रेडिट कार्डसाठी जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरत आहात का! आजच बदल करा, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात."

अपार कार्ड नोंदणीसाठी पालकांची संमती आवश्यक

शाळा आणि महाविद्यालय केवळ पालकांच्या संमतीनेच अपार कार्डसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करू शकतात. अपार कार्ड मध्ये विद्यार्थ्यांचा रक्तगट, उंची, वजन आणि इतर तपशील देणे आवश्यक आहे, म्हणूनच पालकांची संमती गरजेची आहे. जर पालकांनी संमती नाही दिली तर, शाळा आणि महाविद्यालयाला या कार्डासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करता येणार नाही.

अपार कार्ड पालक संमती अर्ज कसा भरायचा?

जे पालक आपल्या मुलांच्या अपार कार्डसाठी अर्ज करू इच्छितात, ते शाळेकडून किंवा महाविद्यालयाकडून संमती अर्ज मिळू शकतात. त्याचबरोबर पालकांना अधिकृत वेबसाईटवरून अर्ज डाउनलोड करण्यासाठी, अर्ज पूर्ण करण्यासाठी आणि शाळेत पाठवण्यासाठी देखील अर्ज उपलब्ध आहे. संमती अर्ज पालकांच्या संमतीचे प्रतिनिधित्व करतो. पालकांना कोणते एक क्षणी त्यांची संमती रद्द करण्याचा देखील अधिकार आहे. अपार कार्ड संमती अर्ज कसा भरायचा? याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • पालक संमती अर्ज भरण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://apaar.education.gov.in/
  • वेबसाईटवर गेल्यानंतर Resources यावर क्लिक करा.
  • अपार पालक संमती फॉर्म (इंग्रजी) च्या पुढील डाउनलोड चिन्हावर क्लिक करून, अर्जामध्ये विचारलेला सर्व तपशील भरा.
  • भरलेला अर्ज शाळा किंवा महाविद्यालयामध्ये जमा करा.

अपार कार्ड साठी अर्ज कसा करायचा?

अपार कार्ड नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सदर विद्यार्थ्याचे DigiLocker वर खाते असणे आवश्यक आहे. ज्याचा वापर ई-केवायसी साठी केला जातो. अपार कार्ड साठी अर्ज कसा करायचा? याविषयीची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट (ABC Bank) बँकेच्या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.👇🏼👇🏼 https://abc.gov.in
  • वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम माय अकाउंट आणि नंतर विद्यार्थी वर क्लिक करा.
  • डीजी लॉकर खाते तयार करण्यासाठी साइन अप वर क्लिक करा आणि तुमचा मोबाईल नंबर, पत्ता, आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा.
  • क्रेडेन्शियल वापरून तुमच्या DigiLocker खात्यात लॉगिन करा.
  • केवायसी पडताळणीसाठी डिजिलॉकर तुमची आधार कार्ड माहिती शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्स सोबत शेअर करण्याची परवानगी मागेल. मी सहमत आहे यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमची शैक्षणिक माहिती प्रविष्ट करा. जसे की, शाळा किंवा विद्यापीठाचे नाव, वर्ग किंवा अभ्यासक्रम इ.
  • सर्वात शेवटी वरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्ज सबमिट करा.
  • अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचे अपार कार्ड तयार केले जाईल.
हे वाचा-  आयुष्मान कार्ड चा लाभ कसा मिळेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे अपार कार्ड ऑनलाईन नोंदणी करून तयार करून घेऊ शकता.

अपार कार्ड डाउनलोड कसे करायचे?

अपार कार्ड डाऊनलोड कसे करायचे याबाबतचे स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट्सच्या वेबसाइटवर लॉगिन करावे लागेल. 👇🏼👇🏼👇🏼  https://abc.gov.in
  • त्यानंतर डॅशबोर्डवर अपार कार्ड डाउनलोड पर्याय शोधून त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अपार कार्ड दिसेल.
  • डाउनलोड किंवा प्रिंट पर्याय निवडा

अशा पद्धतीने तुम्हाला अपार कार्ड डाउनलोड करून प्रिंट स्वरूपात घेता येईल.

सदर लेखामध्ये आपण अपार कार्ड म्हणजेच वन नेशन वन स्टूडेंट कार्ड म्हणूनही ओळखले जाते याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही वर दिलेल्या माहितीच्या आधारे अपार कार्ड ऑनलाइन पद्धतीने मिळवू शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page