नमस्कार मित्रांनो, आपल्या देशाची जगभरामध्ये कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे. देशातील सुमारे 55% लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे. या कारणामुळेच देशातील शेतकऱ्यांचा सहाजिकपणे जमिनीशी संबंधित सरकारी कार्यालयांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे संबंध येतच असतो. यामुळेच देशातील सामान्य नागरिक किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी संबंधित कोणतेही काम यामध्ये जमिनीशी संबंधित कागदपत्रे किंवा जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारासाठी आवश्यक कागदपत्रांसाठी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये जावे लागते. ही भूमी अभिलेख कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असल्यामुळे तेथे जाऊन जमिनीशी संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी नागरिकांचा किंवा शेतकऱ्यांचा खूप वेळ वाया जातो. यावर एक चांगला तोडगा महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून काढण्यात आला आहे, तो म्हणजे महाराष्ट्र शासनाने भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल अपडेट केले आहे. ज्याद्वारे नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीशी संबंधित सर्व सुविधा एकाच ठिकाणी मिळवता येतील. या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमीन विषयक 17 विविध अशा सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
सदर लेखामध्ये आपण जमिनीशी संबंधित भूमी अभिलेख कार्यालयाने जे पोर्टल अपडेट केले आहे त्याविषयीची संपूर्ण माहिती, त्याचबरोबर या पोर्टलच्या माध्यमातून ज्या 17 सुविधांचा लाभ नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना घेता येणार आहे त्या सुविधा कोणत्या आहेत? भारतातील भूमी अभिलेखांचे प्रकार किती आहेत? याचीही माहिती आपण सदर लेखांमध्ये पाहूया.
नवीन पोर्टलवरून तुमच्या जमिनीचा नकाशा पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.
भूमि अभिलेख म्हणजे काय? याविषयी थोडक्यात..
जमीनविषयक किंवा मालमत्ता विषयक संपूर्ण नोंदणीची अदलाबदल ज्या कागदपत्राच्या माध्यमातून केली जाते. या सर्व दस्ताऐवजीकरणाचे शासकीय ठिकाण म्हणजे भूमी अभिलेख विभाग होत. भूमी अभिलेख कार्यालय हे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी असतात. भूमि अभिलेख विभागामध्ये मोजणीची संबंधित विविध अभिलेख उपलब्ध असतात. भूमी अभिलेख विभागामध्ये मूळ आणि त्यानंतर महसुली मोजणीच्या वेळी गुणाकार बुक, आकार फोड, कमी जास्ती पत्रक इ.अभिलेख तयार करण्यात आलेले आहेत.
भूमी अभिलेखांचे प्रकार
भारतामधील भूमी अभिलेखांचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे प्रकार कोणते आहेत ते खालीलप्रमाणे:
जमिनीची नोंद
जमिनीच्या नोंदीमध्ये एका विशिष्ट क्षेत्रातील जमिनी विषयक संपूर्ण बाबींची यादी असते. यामध्ये जमिनीचे स्थान, जमिनीचा आकार, जमिनीचा प्रकार यांचा समावेश होतो. या जमिनीच्या नोंदवहीचा एखाद्या प्रदेशातील जमिनीच्या मालकीची मांडणी समजून घेण्यासाठी उपयोग होतो. त्याचबरोबर जमिनीची नोंदवही जमिनीशी संबंधित कोणत्याही चौकशीचा प्रारंभ बिंदू आहे.
हक्कांचे रेकॉर्ड
हक्काच्या नोंदीमध्ये जमिनीच्या विशिष्ट तुकड्यावरील व्यक्ती किंवा संस्थांच्या अधिकाराचा तपशील असतो. यामध्ये मालक, भाडेकरू, गहाणखत, भाडेपट्टी आणि इतर अधिकारांची माहिती समाविष्ट असते. एखाद्या जमिनीवर कायदेशीर मालकी प्रस्थापित करण्यासाठी हक्कांचे रेकॉर्ड महत्त्वपूर्ण आहे. हक्कांच्या रेकॉर्डचा एखाद्या कायदेशीर विवादामध्ये वारंवार संदर्भ दिला जातो.
उत्परिवर्तन नोंदवही
उत्परिवर्तन नोंदवहीमध्ये जमिनीच्या नोंदीमध्ये मालकी आणि इतर तपशिलातील बदल नोंदवला जातो. जेव्हा एखादी मालमत्ता विकली जाते, सदर मालमत्तेस एखादा वारस मिळतो किंवा कोणत्याही प्रकारे हस्तांतरित केली जाते तेव्हा त्या व्यवहाराची नोंद उत्परिवर्तन रजिस्टर मध्ये केली जाते. ज्या द्वारे ही सुनिश्चित केले जाते की, जमिनीच्या नोंदी अद्यावत आहेत आणि मालकीची सद्यस्थिती दर्शवतात.
भाडे करार आणि पीक निरीक्षण नोंदवही
या नोंदवही मध्ये जमिनीमध्ये घेतलेल्या पिकांची आणि जमिनीच्या भाडे कराराच्या व्यवस्थेची माहिती असते. कृषी नियोजनासाठी आणि भाडेकरू हक्काशी संबंधित विभागाचे निराकरण करण्यासाठी भाडेकरार आणि पीक निरीक्षण नोंदवही खूप महत्त्वाची आहे.
विवादित केसेस रजिस्टर
ही नोंदवही जमिनीशी संबंधित कोणतेही विवाद किंवा खटल्यांची नोंद करते. जमीन विषयक चालू असलेल्या कायदेशीर समस्यांचा मागवा घेण्यास त्याचबरोबर जमिनीशी संबंधित विवादांचे निराकरण करण्यासाठी विवादित केसेस रजिस्टर खूप महत्त्वाचे आहे.
सर्वेक्षण आणि सेटलमेंट रेकॉर्ड
या नोंदवहीमध्ये तपशीलवार सर्वेक्षण आणि जमिनीचे नकाशे, जमिनीच्या सीमा आणि भौतिक वैशिष्ट्ये दर्शवलेली असतात. हे रेकॉर्ड सीमा विवाद सोडवण्यासाठी आणि शहरी नियोजन आणि विकास उपक्रमासाठी महत्त्वपूर्ण आहेत.
जमीन सुधारणा नोंदी
जमिनीमध्ये केलेल्या कोणत्याही सुधारणा किंवा घडामोडींचा तपशील जसे की बांधकाम, सिंचन, मृदा संवर्धन उपाय यांच्या नोंदी जमीन सुधारणा नोंदणी मध्ये केलेल्या असतात. वरील सुधारणा वरून जमिनीचे मूल्य आणि उपयुक्तता याचे मूल्यांकन करण्यासाठी जमीन सुधारणा नोंद महत्त्वाची आहे.
जमिनी संबंधित माहिती मिळणार अपडेट केलेल्या पोर्टलवरून…
राज्य सरकारने भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल अपडेट केलेले आहे. शेतकऱ्यांना शेतजमीन संबंधित कागदपत्रे मिळवण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये जावे लागू नये. त्याचबरोबर शेती संबंधित कागदपत्रांच्या नोंदणीचे काम जलद गतीने आणि घरबसल्या करता येईल. खालील लिंक वर क्लिक करून तुम्हाला भूमी अभिलेख विभागाच्या संकेतस्थळावर जाता येते. 👇🏼👇🏼👇🏼 https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ वरील भुमी अभिलेख विभागाच्या पोर्टल वरती जाऊन शेतकरी त्याचबरोबर नागरिकांना 17 जमीनविषयक सुविधांचा लाभ घेता येणार आहे. वरील पोर्टलच्या माध्यमातून शेतजमीनविषयक संपूर्ण कामे खूपच जलद आणि सोपी झाली आहेत.
नवीन पोर्टलवरून ७/१२ डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा .
भूमी अभिलेख पोर्टलच्या माध्यमातून मिळणाऱ्या 17 जमीनविषयक सुविधा
राज्यशासनाकडून भूमी अभिलेख पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना 17 जमीन विषयक सुविधा देण्यात आले आहेत. सदर सुविधांचा लाभ महसूल विभागाकडून नागरिक व शेतकऱ्यांना घरबसल्या मिळत असला तरीही यासाठी त्यांना कमीत कमी 15 रुपये शुल्क ऑनलाईन पद्धतीने आकारण्यात येणार आहे. जमीन विषयक किंवा मालमत्तेच्या नोंदी संबंधित मिळणाऱ्या 17 सुविधा खालीलप्रमाणे:
- 7/12 उतारा डिजिटल स्वाक्षरी सहित
- 8-अ उतारा डिजिटल स्वाक्षरी सहित
- फेरफार उतारा
- 7/12 फेरफार साठी ऑनलाईन अर्ज
- फेरफार स्थिती तपासणी
- मालमत्ता पत्रक
- मालमत्ता पत्रक फेरफार
- प्रलंबित दिवाणी न्यायालयीन प्रकरण
- अधिकार क्षेत्र जाणून घेणे
- ई-नकाशा/भू-नकाशा
- ई-अभिलेख
- ई-मोजणी
- अभिलेख पडताळणी
- आपली चावडी
- ई-चावडी जमीन महसूल भरणा
- ई-कोर्ट
- ई-पिक पाहणी
वरील 17 जमीन विषयक सुविधा राज्य शासनाकडून भूमी अभिलेख पोर्टल द्वारे नागरिक व शेतकऱ्यांसाठी देण्यात आलेल्या आहेत. जमीन विषयक व्यवहार करणाऱ्या नागरिकांना किंवा शेतकऱ्यांना ही पोर्टल खूपच महत्त्वाचे आणि मदतगार ठरणार आहे. सदर पोर्टलमुळे जमीन विषयक संपूर्ण कामे घरबसल्या होणार आहेत त्यामुळे वेळ, पैसा यांची बचत तर होईलच त्याचबरोबर ही सर्व कामे जलद गतीने होतील. भूमी अभिलेख विभागाच्या नवीन पोर्टलद्वारे वारस नोंदणीसाठी शेतकऱ्यांना घरबसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. भूमी अभिलेख पोर्टलचा एकंदरीत विचार केला तर हे पोर्टल जमीन विषयक व्यवहारांमध्ये एक अमुलाग्र क्रांती ठरू शकते.
सदर लेखामध्ये आपण भूमी अभिलेख विभागाकडून अपडेट करण्यात आलेले भूमी अभिलेख विभागाचे पोर्टल संबंधित संपूर्ण माहिती पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही जमीन विषयक संपूर्ण कामे घरबसल्या त्याचबरोबर कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये करू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडलेला असेल. धन्यवाद!