व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Bima sakhi Yojana: महिलांना मिळणार महिन्याला 7 हजार रुपये पहा काय आहे बीमा सखी योजना.

केंद्र सरकारकडून महिलांना सक्षमीकरण साठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. या योजना रांगेतल्या शेवट्या महिलेपर्यंत पोहोचावी यासाठी कृतीकार्यक्रमही सरकारकडून राबवला जातोय. दरम्यान सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी विमा सखी(Bima Saki Yojana) नावाची योजना आणली आहे या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे.महिलांना प्रत्येक महिन्याला 7हजार रुपये सोबतच कमिशन मिळू शकतं.याच पार्श्वभूमीवर ही योजना नेमकी काय आहे या योजनेतून महिलांना नेमके किती रुपये मिळू शकतात हे जाणून घेऊया.

Bima Sakhi Yojana विमा सखी ही एलआयसीची एक योजना आहे फक्त महिलांनाच या योजनेसाठी अर्ज करू शकतात. स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षे ट्रेनिंग दिलं जाईल. या काळात महिला एलआयसी एजंट म्हणून काम करू शकणार आहेत. ज्या महिलांना पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांना एलआयसी मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येईल.

विमा सखी योजना काय आहे?/ What is b Bima Sakhi Yojana

Life insurance corporation (LIC) ची ही योजना 18 ते 70 वर्ष वयोगटातील महिलांसाठी आहे ज्या महिला भावी उतरण आहे त्यांना पहिली तीन वर्षे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यांचे आर्थिक समज वाढवून त्यांना विम्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.

या प्रशिक्षण कालावधीत महिलांना विद्यावेतन देखील मिळणार आहे, प्रशिक्षण नंतर महिला एलआयसी विमा एजंट म्हणून काम करू शकतील त्याचबरोबर बीए पास विमा सखी नाही विकास अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे.

हे वाचा-  गाडी नंबर वरून मालकाचे नाव तपासा |check vehicle number using mobile number

LIC Bima Saki या योजनेसाठी पात्र ठरणाऱ्या महिला विमा सखी असे संबोधण्यात येणार आहे. यांचे काम हे महिलांना विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करणे ही त्यांना त्या कामात मदत करणे असे असणार आहे.

विमा सखी योजनेसाठी आवश्यक पात्रता | LIC Bima Sakhi Yojana Eligibility

  1. विमा सखी योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करू शकतात.
  2. त्यांच्याकडे मॅट्रिक किंवा हायस्कूल किंवा दहावी उत्तीर्ण प्रमाणपत्र असावे.
  3. या योजनेसाठी केवळ 18 ते 70 वयोगटातील महिला अर्ज करू शकतील.
  4. तीन वर्षाच्या प्रशिक्षणानंतर महिला विमा एजंट म्हणून काम करतात.

विमा सखींना नेमके किती पैसे दिले जातील?

या योजनेच्या माध्यमातून ट्रेनिंग येणाऱ्या महिलांना सरकारकडून स्टापपेंड दिले जाईल. या तीन वर्षाच्या काळात महिलांना दोन लाख रुपये दिले जातील. ट्रेनिंग घेणाऱ्या महिलांना पहिल्या वर्षी प्रत्येक महिलाला 7000 रुपये दिले जातील. दुसऱ्या वर्षी 6000 तर तिसऱ्या वर्षी 5000 रुपये दिले जातील. विशेष म्हणजे यामध्ये कमिशनचा समावेश नाही कमिशनच्या रूपात तुम्हाला मिळणारे पैसे हे वेगळे असतील.

यामध्ये बोनस कमी झाला समावेश नाही. त्यासाठी अट अशी असेल की महिलांना विकल्या जाणाऱ्या पॉलिसी पैकी 65 के पॉलिसी पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत सक्रिय राहल्यात.

याचा अर्थ असा की जर एखाद्या महिलेने पहिल्या शंभर पॉलिसी विकली असतील तर त्यापैकी 65 पॉलिसी दुसऱ्या वर्षाच्या अखेरीस लागू राहतील. एजंट केवळ पॉलिसी विकत नाहीत तर त्या टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात याची खात्री करणे हा त्याचा उद्देश आहे.

हे वाचा-  लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रु |महाराष्ट्र नवनिर्वाचित सरकारकडून लाडक्या बहिणींना आता मिळणार महिन्याला २१०० रु |Mukhymantri Manjhi Ladki Bahin Yojana 2100 ₹

विमा सखी साठी अर्ज कसा करावा?| LIC Bima Sakhi Yojana Apply Online

  • सर्वप्रथम LIC च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • तेथे Click Here Bima Sakhi विमा सखी साठी येथे क्लिक करा.
  • त्यानंतर आवश्यक माहिती जसे की नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, आणि पत्ता यासारखे तपशील भरा.
  • तुम्ही एलआयसी इंडियाच्या कोणत्याही एजंट किंवा विकास अधिकारी किंवा कर्मचारी तसेच वैद्यकीय परीक्षकाशी संबंधित असाल तर त्याची माहिती द्या.
  • शेवटी कॅप्चा पोटभरा आणि सबमिट बटनावर क्लिक करा.

महत्त्वाचा संदेश

विमा सखी योजना ही महिलांच्या स शक्तीकरणाची आणि आर्थिक स्वावलंबनासाठीची एक सकारात्मक पाऊल आहे. या संधीचा उपयोग करून महिलांनी आपल्या आर्थिक स्थितीला सुधारण्याचा प्रयत्न करावा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page