व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

या सोप्या स्टेप फॉलो करून, मोबाईलवरून असे डाऊनलोड करा Farmer ID Card(शेतकरी ओळखपत्र)… पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. हे महत्वपूर्ण पाऊल म्हणजे Farmer ID Card. (शेतकरी ओळखपत्र) या शेतकरी ओळखपत्र कार्डाचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांची माहिती एका ठिकाणी संग्रहित करून त्यांना विविध सरकारी योजना आणि कृषी सेवांचा लाभ देणे सुलभ व्हावे हा आहे. यामुळेच राज्य सरकारने Farmer ID Card (शेतकरी ओळखपत्र) तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी शेतकरी ओळखपत्रासाठी आधीच नोंदणी केलेली असेल तर, त्यांना Unique Farmer ID प्राप्त होत आहेत. या पोस्टमध्ये आपण Farmer ID Card मोबाईलवरून डाउनलोड कसे करायचे? याविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

Farmer ID Card(शेतकरी ओळखपत्र) विषयी थोडक्यात…

Farmer ID म्हणजे एक Unique Digital Identity जी शेतकऱ्यांच्या सर्व शेती विषयक माहितीचे एकत्रित संग्रहिकरण करते. राज्य सरकारद्वारे Farmer ID Card ‘Agristack’ योजनेअंतर्गत तयार करण्यात आले आहे. यामध्ये शेतकऱ्याची शेती संबंधित सर्व माहिती समाविष्ट आहे. या माहितीमध्ये…

  • शेतकऱ्याचे नाव, पत्ता आणि आधार नंबर
  • जमिनीची एकूण क्षेत्रफळ आणि मालकी हक्क
  • जमिनीमध्ये घेतलेली पिके व त्या पिकांचे उत्पादन
  • बाजारातील दर व व्यवहार
  • सरकारी लाभांची माहिती

वरील माहितीच्या आधारे सरकारला शेतकऱ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनांची आखणी करताना योग्य निर्णय घेता येतील, तसेच सरकारी योजनांचा शेतकऱ्यांनाही वेळेमध्ये लाभ मिळेल.

हे वाचा 👉  पोस्ट ऑफिस एफडी योजना: Post Office Time Deposit अंतर्गत पाच लाख गुंतवून 15 लाख रुपयांचा रिटर्न मिळवा.

Farmer ID Card ही एक डिजिटल क्रांती आहे, जी महाराष्ट्रातील शेती व्यवस्थेच्या आधुनिकरणासाठी त्याचबरोबर सुधारणेसाठी राज्य सरकारने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. जर तुम्ही अजूनही Farmer ID Card साठी नोंदणी केली नसेल तर, लवकरात लवकर नोंदणी  करणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या शेतीच्या भविष्यासाठी हे कार्ड खूपच उपयुक्त ठरेल, शिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी भविष्यातील हा एक खूप महत्त्वाचा दस्तावेज असेल.

Farmer ID Card(शेतकरी ओळखपत्र) चे फायदे

Farmer ID Card चे फायदे काय आहेत? हे आपण खाली पाहूया:

  • Farmer ID Card मुळे कृषी योजनांचा थेट लाभ मिळवणे शक्य होणार आहे.
  • पिक विमा, खत अनुदान, सौर पंप योजना यासाठी हे कार्ड फारच उपयुक्त आहे.
  • अनुदान पडताळणीसाठी करण्यासाठी या कार्डाचा उपयोग होतो.
  • या कार्डाच्या माध्यमातून तुमच्या शेतजमिनीचा Digital Agriculture Data तयार होणार आहे. यामुळे सर्व शेतजमिनीची नोंद एकाच ठिकाणी होणार आहे.

Farmer ID Card(शेतकरी ओळखपत्र) मोबाईलवरून Download कसे करायचे?

Farmer ID Card PDF स्वरूपात जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करणार असाल तर, खाली दिलेल्या स्टेप्स् फॉलो करा:

  • सर्वप्रथम तुम्हाला Farmer ID Card PDF स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼 https://apfr.agristack.gov.in/farmer-registry-ap/#/checkEnrolmentStatus
  • संकेतस्थळावर गेल्यानंतर सर्वप्रथम तुमचा आधार नंबर टाका. जर तुम्ही पूर्वी नोंदणी केली असेल, तर तुमची माहिती स्क्रीनवर दिसेल.
  • स्क्रीनवर आलेल्या माहितीमध्ये ‘View Details’ या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमची संपूर्ण नोंदणी केलेली माहिती दिसेल.
  • त्यानंतर वरच्या बाजूला ‘Generate PDF’ किंवा ‘Download PDF’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही तुमचे Farmer ID Card मोबाईलवर सेव्ह करून घेऊ शकता.
  • जर तुम्हाला हे कार्ड प्रिंट स्वरूपात हवे असेल, तर तुम्ही PDF स्वरूपात डाउनलोड केलेले कार्ड प्रिंट करून घेऊ शकता.
हे वाचा 👉  वाशी येथे झालेल्या सभेतील मनोज जरांगे पाटील यांच्या सरकारकडे केलेल्या प्रमुख मागण्या

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचे Farmer ID Card मोबाईलवरून PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर गरज असल्यास या कार्डाची  प्रिंटही काढून घेऊ शकता.

Farmer ID Card म्हणजे तुमच्या शेतीचा डिजिटल पासपोर्ट म्हटले तर वागे ठरणार नाही. यामुळे सरकारी योजना, अनुदान, विमा या सर्वांचा फक्त या एका दस्तऐवजामुळे फायदा घेता येणार आहे. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये Farmer ID Card मोबाईलवरून कसे डाउनलोड करायचे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा तुमचे Farmer ID Card PDF स्वरूपात डाउनलोड करून घेऊ शकता. त्याचबरोबर गरज असल्यास प्रिंटही काढून घेऊ शकता. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page