व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Gram panchayat yojana 2024 तुमच्या गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या कोणकोणत्या योजना सुरू आहेत, असे पाहा मोबाईलवर ऑनलाईन 2024

Gram panchayat आपल्या भारत देशात लोकशाही शासन असून लोकप्रशासनानुसार कामकाज केले जाते. या लोकप्रशासनाचे विकेंद्रीकरण  करुन विविध पातळ्यांवर काम करुन शासकीय योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय संस्थांची निर्मिती करण्यात आली. त्यातील ग्रामपंचायत हा या लोकप्रशासन विक्रेंद्रिकरणाचा शेवटचा टप्पा मानला जातो. Gram panchayat yojana

 केंद्र किंवा राज्य पातळीवर नागरिकांसाठी जाहिर करण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या म्हणून केंद्र सरकार – राज्य सरकार – जिल्हा पंचायत – तालुका पंचायत- आणि शेवटी ग्रामपंचायत  अशी लोकप्रशासनाची मांडणी करण्यात आलेली आहे. यानुसार ग्रामिण भागात योजना राबवण्यासाठी मनरेगा या शासकीय संस्थेची निर्मिती करण्यात आली आहे. ग्रामिण विकास योजनांची माहिती घेण्याआधी आपण मनरेगा म्हणजे काय याबाबत जाणून घेऊ कारण या ग्रामपंचायत पातळीवरील योजना या मनरेगा मार्फतच नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जातात. Gram panchayat yojana

तुमच्या ग्रामपंचायत मध्ये विविध चालू असलेल्या योजना यांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Gram panchayat ग्रामिण पातळीवर विविध योजना राबवणाऱ्या मनरेगा बद्दल माहिती मिळवूया

मनरेगा म्हणजे  हे जाणून घेऊ. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, जो 2005 मध्ये भारत सरकारने सुरू केला.  Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Act

हे वाचा-  मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना: या तारखेला जमा होणार 4500 रुपये.

महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमाची अंमलबजावणी 1977 पासून महाराष्ट्रात सुरु करण्यात आली. त्यावेळी राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम, 1977 नुसार दोन योजना सुरु करण्यात आल्या.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उद्देश

ग्रामीण भागात राहणा-या नागरिकांना शाश्वत उपजीविका  देऊन ग्रामीण गरिबांचे जीवनमान सुधारणे आणि ग्रामीण  भागातील गरिबी आणि बेरोजगारी दूर करणे हा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा उद्देश आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा इतिहास

भारतात ग्रामीण रोजगार हमी योजनेची संकल्पना सर्वप्रथम 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला मांडण्यात आली होती, त्यानंतर 2005 मध्ये भारतीय संसदेने मनरेगा योजना मंजूर केली. ही योजना सुरुवातीला भारतातील 200 जिल्ह्यांमध्ये सुरू करण्यात आली होती. त्या जिल्ह्यांमधील यशा नंतर  देशातील सर्व ग्रामीण जिल्ह्यांमध्ये  मनरेगा योजना लागू करण्यात आली.  गेल्या काही वर्षांमध्ये, या योजनेत अनेक बदल झाले आहेत आणि लाखो ग्रामीण कुटुंबांसाठी रोजगार निर्मिती करण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. मनरेगा हे भारतातील दारिद्र्य निर्मूलन आणि ग्रामीण विकासाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

ऑनलाईन पद्धतीने मनरेगा वेबसाईटवर योजनांची यादी पाहण्यासाठी पुढील प्रक्रिया करा

तुमच्या ग्रामपंचायत मध्ये विविध चालू असलेले योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

  • सर्वप्रथम मनरेगाच्या म्हणजेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या
  • त्यानंतर ग्रामपंचायत पर्यायावर क्लिक करा.
  • यादी पाहण्यासाठी  Generate report  पर्यायावर  क्लिक करा.
  • त्यापुढील पेज ओपन झाल्यावर तुमचे राज्य निवडा.
  • कोणत्या वर्षाची योजना आहे ते पहा आणि निवड करा
  • जिल्ह्यांची यादीमधून जिल्हा, तालुका, गाव निवडा.
  • तुमच्या गावातील ग्रामपंचायतीचा  dashboard दाखवला जाईल. कोणती योजना पाहायची असेल ती  निवडा.
  •  वर्ष 2023 -24 निवडा, पुढे त्या गावासाठी असलेल्या योजनांची यादी खुली होईल.
  • तुमच्या कामाची योजना असेल तर त्याची संपूर्ण माहिती वाचून त्यावर अर्ज करा. आणि त्या योजनेचा लाभ घ्या
हे वाचा-  या महिलांना तत्काळ करावी लागणार eKYC अन्यथा बंद होणार सबसिडी

Mahatma Gandhi National Rural Employment Gurantee Act

केंद्र शासन पुरस्कृत ग्रामपंतायत विकास योजनांची यादी Central government scheme for rural India

  • कायमस्वरुपी विक्री केंद्र बांधणे
  • श्यामा प्रसाद मुखर्जी रूर्बन अभियान
  • राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
  • महालक्ष्मी सरस प्रदर्शन
  • दीन दयाल उपाध्याय कौशल्या विकास योजना
  • प्रधानमंत्री आवास योजना- ग्रामीण
  • महिला किसान सशक्तीकरण कार्यक्रम
  • महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनशैली मिशन
  • प्रधान मंत्री ग्राम सडक योजना
  • राष्ट्रीय ग्रामस्वराज योजना
  • सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण

राज्य सरकार पुरस्कृत ग्रामपंचायत विकास योजनांची यादी

  • तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम
  • वित्त आयोग
  • स्मार्ट ग्राम योजना
  • ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान
  • मुख्यमंत्री ग्राम सडक योजना

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment