व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

राज्यातील 2.5 कोटी महिलांना या तारखेला मिळणार 3,000 रुपये! | Majhi ladki bahin yojana first installment

राज्यातील महिलांसाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेचा अर्ज करण्याची तारीख एक जुलैपासून सुरू झाली आहे.

या तारखेला दिला जाणार पहिला हप्ता

राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या रक्षाबंधन (18 ऑगस्ट) ला राज्यातील सुमारे 2.5 कोटी महिलांना दोन महिन्यांचे 3000 रुपये त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जाणार आहेत.

महिला सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजना

महिलांना सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकार अनेक मोठ्या योजना राबवत आहे. सध्या राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, महिलांसाठी अनेक योजनांची घोषणा करण्यात आली आहे. या योजनांमध्ये महिलांना वार्षिक तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत आणि दर महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत. ही योजना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या नावाने ओळखली जाते.

लाभार्थी पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील अटींची पूर्तता आवश्यक आहे:

  1. महिला महाराष्ट्राची रहिवासी असावी.
  2. महिलांचे वय 21 वर्षे ते 65 वर्षे दरम्यान असावे.
  3. अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असावे.
  4. महिलांच्या नावावर ट्रॅक्टर वगळता अन्य कोणतेही चार चाकी वाहन नसावे.
हे वाचा-  ई पीक पाहनी ॲप (e-pik pahni app) करण्यासाठी ॲप डाउनलोड करा.

अर्ज प्रक्रिया

या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट आहे. अर्ज भरून झाल्यानंतर चार ते पाच दिवसांत लाभार्थी यादी प्रसिद्ध केली जाईल. पात्र ठरलेल्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये मिळतील. लाभार्थी यादी कुठे आणि कशी प्रसिद्ध होईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

अर्ज सादर करण्याची ठिकाणे

महिलांनी अर्ज सादर करण्यासाठी खालील ठिकाणांचा वापर करू शकतात:

  1. अंगणवाडी केंद्र
  2. बालविकास प्रकल्प अधिकारी
  3. ग्रामपंचायत
  4. महापालिकेचे वार्ड ऑफिस
  5. सेतू सुविधा केंद्र
  6. महा सेवा केंद्र

आवश्यक कागदपत्रे

अर्ज करताना खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे:

  1. अर्ज व हमीपत्र
  2. रेशन कार्ड (Ration Card)
  3. आधार कार्ड (Aadhaar Card)
  4. बँक पासबुक फोटो (Bank Passbook Photo)
  5. उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
  6. रहिवासी दाखला (Residence Certificate)

राज्यातील महिलांसाठी ही योजना एक महत्त्वाची संधी आहे. ती त्यांच्या आर्थिक स्थिरतेत मोठा हातभार लावेल. इच्छुक महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि आपल्या आर्थिक प्रगतीसाठी एक पाऊल पुढे टाकावे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment