व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडकी बहीण योजनेच्या सहा नियमांमध्ये केले मोठे बदल |बरेचसे नियम सरकारने बदलले.

‘माझी लाडकी बहीण योजना’त सहा नवीन बदल

महाराष्ट्रातील ‘माझी लाडकी बहीण योजना’त सहा नवीन बदलांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले असून, या बदलांमुळे अधिकाधिक महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी नवविवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल, तर पतीच्या रेशनिंग कार्डला पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. तसेच, एखाद्या महिलेला महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषासोबत विवाह केल्यास पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळू शकतो.

लाडकी बहीण योजनेची अपात्र यादी येथे पहा 👈

नवीन नियम आणि अटी

  1. पोस्ट बँक खात्याचा समावेश: या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
  2. परराज्यातील महिलांचा समावेश: परराज्यात जन्मलेल्या महिलांना पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
  3. ग्रामस्तरीय समितीची जबाबदारी: प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी ग्रामस्तरीय समितीमार्फत वाचली जाणार आहे, व त्यात आवश्यक ते बदल केले जाणार आहेत.
  4. केंद्र सरकारच्या योजनेचा समावेश: केंद्र सरकारच्या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना देखील लाभार्थी मानले जाईल, परंतु ऑफलाईन अर्ज भरावा लागेल.
  5. विवाह नोंदणीचे सुलभता: नवविवाहित महिलांची विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास, पतीच्या रेशनिंग कार्डला पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल.
  6. ओटीपी कालावधी वाढवला: ओटीपीचा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात आला आहे.
हे वाचा-  बांधकाम कामगार योजना : या योजनेत कर्ज करून अनेक मोठमोठ्या योजनांचा फायदा घ्या.

लाडकी बहीण योजनेची अपात्र यादी येथे पहा 👈

लाभार्थी महिलांची यादी

राज्य सरकारने योजनेच्या प्रक्रियेला सुलभ करण्यासाठी कागदपत्रांमध्ये शिथिलता आणली आहे. लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होईल व त्या यादीत असलेल्या महिलांना 15 ते 19 ऑगस्ट दरम्यान थेट लाभ मिळणार आहे. या कालावधीत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्यांची 3000 रुपये रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

निष्कर्ष

‘माझी लाडकी बहीण योजना’त केलेल्या या बदलांमुळे अधिकाधिक महिलांना योजनेचा लाभ घेता येणार आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे महिलांचे आर्थिक स्वावलंबन वाढवण्यासाठी आणि त्यांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment