व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम किसानच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांसाठी, या तारखेपासून सुरू होणार नवीन नोंदणी प्रक्रिया, नोंदणी अर्ज कसा करायचा? पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पासून वंचित असणारे शेतकरी म्हणजेच जे शेतकरी अजूनही पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली नाही त्या शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा नोंदणी प्रक्रिया सुरू होणार आहे. या पोस्टमध्ये आपण प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची नोंदणी केव्हा सुरू होणार आहे? त्याचबरोबर या योजनेची संपूर्ण माहिती यामध्ये पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज कसा करायचा? पाहूया.

पीएम किसान सन्मान निधी योजनेबद्दल थोडक्यात..

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजना ही केंद्र सरकारकडून 1 डिसेंबर 2018 पासून देशांमध्ये लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते. परंतु ही रक्कम 3 समान हप्त्यांमध्ये 4 महिन्याच्या अंतराने प्रत्येकी 2000 रुपयांचे तीन हप्ते दिले जातात. सुरुवातीला या योजनेमध्ये 2 हेक्टर पर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचां समावेश केला होता. परंतु नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सर्व शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सरसकट शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या विविध गरजांसाठी भांडवल उपलब्ध व्हावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीवर होणारा खर्च या आर्थिक मदतीतून काही अंशी कमी व्हावा. हा या योजनेचा उद्देश आहे.

हे वाचा 👉  166 किमी रेंज असलेली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर – फक्त 15,000 रुपयांत बुक करा!

पीएम किसान योजनेची नवीन नोंदणी होणार या तारखेपासून

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक लोकप्रिय तसेच महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आत्तापर्यंत पीएम किसान योजनेचे 19 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले गेले आहेत. या योजनेचा पुढील हप्ता म्हणजेच 20 वा हप्ता मान्सून आगमनावेळी वितरित केला जाण्याची शक्यता आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमधील विविध कामे जसे की पेरणी, शेतीची मशागत, बी बियाणे खरेदीसाठी या पैशाचा उपयोग होईल.

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून अजूनही जे शेतकरी वंचित आहेत. त्यांना पुन्हा एकदा या योजनेचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या नवीन नोंदणी प्रक्रियेला 15 एप्रिल पासून पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे. त्यामुळे जर अजूनही कोणी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित आहे ते नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठीची पात्रता

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.
  • भारतात राहणाऱ्या कोणत्याही राज्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • सुरुवातीला फक्त 2 हेक्टर म्हणजेच 5 एकर शेत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत असे, परंतु नंतर केंद्र सरकारने सदरची अट हटवून सरसकट शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत असे सांगितले आहे.
  • सदरच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याचे बँक खाते असणे अनिवार्य आहे. ज्यांच्याकडे बँक खाते नाही त्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते उघडणे बंधनकारक आहे.
हे वाचा 👉  सरकारी नोकरीची सुवर्णसंधी,भारतीय डाक विभागामध्ये तब्बल 21,413 पदांसाठी होणार भरती.. जाणून घ्या पात्रता, वेतन, अर्ज कसा करायचा? संपूर्ण माहिती.!

पीएम किसान सन्माननिधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • ओळखीच्या पुराव्यासाठी मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, मनरेगा कार्ड
  • बँक खाते तपशील, खाते क्रमांक,IFSC कोड, बँक पासबुक प्रत
  • जमिनीचा 7/12 उतारा
  • मोबाईल क्रमांक

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नोंदणी कशी करायची?

ऑनलाइन नोंदणी

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. तुम्ही ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने या योजनेसाठी नोंदणी करू शकता. या दोन्ही पद्धतीने नोंदणी कशी करायची हे आपण खाली स्टेप बाय स्टेप पाहूया:

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.👇🏼👇🏼👇🏼 https://pmkisan.gov.in/
  • अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचे मुखपृष्ठ उघडेल.
  • या मुखपृष्ठावर तुम्हाला शेतकरी कॉर्नर हा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर आणखीन तीन पर्याय दिसतील.
  • यापैकी तुम्ही नवीन शेतकरी नोंदणी या पर्यायावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन शेतकरी फॉर्म ओपन होईल.
  • या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर, मोबाईल नंबर टाकून,त्यानंतर तुमचे राज्य निवडा.
  • त्यानंतर कॅप्च्या कोड भरून तुमच्या मोबाईल नंबर वर पाठवलेला OTP एंटर करा.
  • आता या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे अपलोड करून सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

अशा पद्धतीने तुम्ही पी एम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणी करू शकता.

हे वाचा 👉  नमो शेतकरी योजना 6 वा हप्ता कधी मिळणार? संपूर्ण माहिती जाणून घ्या.

ऑफलाइन नोंदणी

  • जर तुम्हाला या योजनेसाठी ऑफलाइन नोंदणी करायची असेल तर, तुम्ही तुमच्या जवळच्या CSC सेंटरला (कॉमन सर्विस सेंटर) भेट देऊन अर्ज करू शकता.
  • CSC सेंटरमध्ये गेल्यानंतर तुम्ही या योजनेच्या नोंदणीसाठी ऑफलाइन पद्धतीने आवश्यक कागदपत्रासह अर्ज करा.
  • संबंधित अर्ज केंद्रामध्ये उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांकडे जमा करा.
  • केंद्रात उपस्थित असलेले अधिकारी तुमची पात्रता तपासतील आणि कागदपत्रांची पडताळणी करतील.
  • जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असल्याचे आढळले तर, तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

अशा पद्धतीने तुम्ही पी एम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑफलाइन नोंदणी करू शकता.

पीएम किसान सन्माननिधी योजना ही शेतकऱ्यांसाठी खूपच उपयुक्त योजना आहे. देशातील शेतीला व शेतकऱ्याला बळकट करण्यासाठी ही योजना अत्यंत प्रभावी ठरत आहे. म्हणूनच आपण या पोस्टमध्ये आत्तापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यापासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत, ते शेतकरी 15 एप्रिल पासून नवीन नोंदणी करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page