व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

सर्व क्षेत्रातील कामगारांना पेन्शन मिळवून देणारी पीएम श्रमयोगी मानधन योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण केंद्र सरकारच्या एक अशा योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्यामुळे आपण वयाच्या 60 वर्षानंतरही आत्मनिर्भर जीवन जगू शकू. म्हणजेच आपण वयाच्या 60 वर्षानंतरही कोणावरही अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही तर आपण त्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर ही योजना केंद्र सरकार द्वारे राबवण्यात येणारी योजना आहे त्यामध्ये असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धाप काळात पेन्शन दिली जाते. या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना यामध्ये देशातील सर्व असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळात पेन्शन लागू केली जाते. जसे सरकारी नोकरदार निवृत्तीनंतर ज्याप्रमाणे निवृत्ती वेतनाचा लाभ घेतात त्या धरतीवर ही योजना व संघटित क्षेत्रातील सर्व कामगारांना लाभ घेण्यासाठी आखली आहे.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना ही ही भारत सरकारची एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेची सुरुवात 15 फेब्रुवारी 2019 रोजी झाली.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचे स्वरूप

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत ज्या व्यक्तीचे उत्पन्न पंधरा हजार किंवा त्यापेक्षा कमी आहे. म्हणजेच जी व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी जे काम करते त्यातून ती व्यक्ती जास्तीत जास्त पंधरा हजार रुपये मिळू शकत नाही त्या व्यक्तींना या योजनेअंतर्गत वृद्धापकाळात पेन्शन दिली जाते. ज्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ज्याप्रमाणे सर्व सेवा सुविधा मिळतात त्या सेवा सुविधा असंघटित क्षेत्रातील कामगारांना मिळत नाही म्हणूनच केंद्र सरकार द्वारे ही योजना अमलात आणली गेली आहे. या योजनेचा लाभ असंघटित क्षेत्रातील कामगार जसे की भट्टी कामगार, रिक्षा चालक ,मजूर, मोची, शिंपी, सुतार, लोहार, परीट इत्यादींना मिळू शकतो. म्हणजेच ज्या व्यक्ती किंवा एक विशिष्ट वर्ग ज्यांची संघटना नाही त्या सर्व व्यक्ती किंवा घटक या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. जर तुम्ही देखील या असंघटित क्षेत्राचा किंवा वर्गाचा भाग असाल तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असाल.

हे वाचा-  गाडीच्या नंबर वरून मालकाचे नाव कसे काढायचे | get owner details from vehicle number

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी पात्रता-

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने चा लाभ घेणाऱ्या व्यक्तीसाठी किंवा घटकासाठी काही पात्रता निश्चित केले आहे त्या पात्रता खालील प्रमाणे आहेत.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी फक्त आणि फक्त तेच व्यक्ती पात्र आहेत जे असंघटित क्षेत्रात काम करतात. असंघटित क्षेत्र म्हणजे जिथे दररोज काम केल्यावरच पोट भरते. त्यांच्यासाठी निश्चित पगार पेन्शन निश्चित रजा इत्यादी सुविधा नसतात उदाहरणार्थ दैनंदिन सफाई कामगार, रिक्षा चालक ,भाजी विक्रेते, गवंडी इत्यादी

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने साठी केवळ तेच लोक पेन्शनचा लाभ घेऊ शकतात ज्यांचे उत्पन्न मासिक उत्पन्न पंधरा हजार पेक्षा जास्त नाही म्हणजेच ज्यांचे उत्पन्न पंधरा हजारापर्यंत आहे किंवा पंधरा हजार च्या आत आहे. म्हणजेच सरकारच्या या पात्रते अंतर्गत जे लोक पिवळे रेशन कार्ड धारक आहेत ते जास्तीत जास्त या योजनेसाठी पात्र ठरतात. या योजनेतील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याचे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेत बँक खाते आपल्या आधार कार्ड क्रमांकाची संलग्न असले पाहिजे ही सर्वात महत्त्वाची पात्रता किंवा अट आहे. या अटीची किंवा पात्रतेची जो कोणी पूर्तता करणार नाही त्यांना प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेचा लाभ घेता येणार नाही त्याचबरोबर प्रधानमंत्री मानधन योजनेच्या लाभार्थ्यासाठी बँक खाते (बचत) असणे अनिवार्य आहे.

हे वाचा-  मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार रुपयांची आर्थिक मदत.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत जी व्यक्ती इन्कम टॅक्स भरते ती व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार नाही. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजने अंतर्गत ज्या व्यक्ती सरकारच्या म्हणजेच केंद्र किंवा राज्य विभागात कंत्राटी तत्त्वावर किंवा कायम काम करतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ फक्त इ पी एफ ओ ,एन पी एस, इ एस आय सी यासारख्या योजनांचा जे लाभ घेत नाहीत त्यांनाच मिळणार

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेची वैशिष्ट्ये-

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना ही एक भारत सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. जी एक समाजातील असंघटित घटकांना किंवा वर्गाला सामाजिक सुरक्षा प्रदान करते ही योजना 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती त्यामध्ये 18 ते 40 वयोगटातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना वृद्धापकाळसाठी आर्थिक सुरक्षा प्रदान करणे या योजनेअंतर्गत नोंदणीकृत कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेमध्ये नोंदणी करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे.
  • उमेदवाराने त्याच्या वयाच्या 42 वर्षापर्यंत दरमहा 55 ते 200 रुपये जमा करावे लागतील.
  • या योजनेअंतर्गत सरकार उमेदवाराच्या योगदानाच्या 50% पर्यंत योगदान देईल.
  • यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे उमेदवाराचे आधार कार्ड आणि पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत.
  • उमेदवार हा वयाच्या साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तो दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळवण्यास पात्र होईल.
  • श्रमयोगी मानधन योजना ही भारतीय आयुर्विमा (एलआयसी) च्या सहकार्याने चालवली जाणारी योजना आहे.
  • या योजनेचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जर तुम्ही या योजनेतून काही अपरिहार्य कारणामुळे बाहेर पडला तर तुम्हाला साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तुमचे योगदान परत मिळेल.
हे वाचा-  5 kW हाइब्रिड सोलर सिस्टम: विना बॅटरी रात्रंदिवस चालवा 2 AC, हीटर आणि सर्व लोड

योजनेचा अर्ज-

या योजनेचा लाभ घेण्यासाठी उमेदवार दोन पद्धतीने अर्ज करू शकतो:

  • ऑनलाइन पद्धतीने उमेदवार https://maandhan.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतो.
  • ऑफलाइन पद्धतीने उमेदवार आपल्या जिल्ह्यातील श्रम विभाग कार्यालयात जाऊन अर्ज करू शकतो.

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा फायदा:

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना मुख्य फायदा म्हणजे लाभार्थ्याला हमी अंतर्गत किमान तीन हजार रुपये महिना पेन्शन मिळेल पण ही रक्कम लाभार्थ्याचे वय साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर च मिळेल.

या लेखांमधून आम्ही तुम्हाला हे सूचित करू इच्छितो की या मानधन योजनेमध्ये लाभार्थ्यांनी इतका प्रेमियम जमा केला आहे तेवढी रक्कम केंद्र सरकारच्या वतीने लाभार्थ्याच्या खात्यात जमा केली जाते त्या अनुषंगाने आपण प्रीमियमची गणना समजून घेऊया:

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभार्थी जर अठरा वर्षाचा असेल तर साठ वर्षापासून तीन हजार रुपये पेन्शन साठी त्याला दरमहा 55 रुपये प्रीमियम भरावा लागेल.

त्याचप्रमाणे जर लाभार्थी 29 वर्षाचा असेल तर त्याला साठ वर्षाच्या वयापासून तीन हजार रुपये पेन्शन साठी दरमहा 100 रुपये प्रीमियम जमा करावा लागेल.

जर लाभार्थी 40 वर्षाचा असेल तर त्याला साठ वर्षाच्या वयापासून तीन हजार रुपये पेन्शन मिळवण्यासाठी दरमहा दोनशे रुपये चा प्रीमियम जमा करावा लागेल.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजनेअंतर्गत कामगार कार्ड मधून पेन्शन कशी मिळवायची:-

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेसाठी कामगार त्याच्या मोबाईल द्वारे ऑनलाईन माध्यमातून अर्ज करू शकतात.

  • प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना साठ वर्षानंतर दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळेल.
  • जर एखाद्या लाभार्थ्याचा अनपेक्षित पणे मृत्यू झाला तर त्याच्या पत्नीला पंधराशे रुपये पेन्शन दिली जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment