महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व धर्मातील 60 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेचे उद्दिष्ट राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना धार्मिक यात्रा मोफत उपलब्ध करून देणे आहे, ज्यामुळे त्यांच्या मनःशांतीसाठी व आध्यात्मिक आनंदासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले आहे. या योजनेत महाराष्ट्र आणि भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश करण्यात आला आहे..
राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
योजना उद्दिष्टे:
- योजनेचे नाव: मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना
- उद्दिष्ट: राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ यात्रा मोफत उपलब्ध करून देणे.
- व्याप्ती: महाराष्ट्र राज्य व भारतातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश. यादी परिशिष्ट “अ” व “ब” प्रमाणे.
- लाभार्थी: महाराष्ट्र राज्यातील 60 वर्षे व त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिक.
- पात्रता:
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
- वार्षिक उत्पन्न रु. 2.50 लाखापेक्षा जास्त नसणे.
- अपात्रता:
- कुटुंबातील सदस्य आयकरदाता असल्यास.
- सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त शासकीय सेवक असल्यास.
- कुटुंबातील सदस्य खासदार/आमदार असल्यास.
- कुटुंबातील सदस्यांकडे चारचाकी वाहन असल्यास.
- संसर्गजन्य रोगांनी ग्रस्त असल्यास.
- शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.
- मागील वर्षी लॉटरीत निवडलेले परंतु प्रवास न केलेले नागरिक अपात्र राहतील.
- अपेक्षित कागदपत्रे:
- ऑनलाइन अर्ज.
- आधार कार्ड.
- निवासी प्रमाणपत्र.
- उत्पन्नाचा दाखला.
- वैद्यकीय प्रमाणपत्र.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- जवळच्या नातलगाचा मोबाईल क्रमांक.
- रेल्वे/बस प्रवासासाठी एजन्सी व टूरिस्ट कंपन्यांची निवड: अधिकृत टूरिस्ट कंपन्या व IRCTC.
- लाभार्थ्यांची निवड: जिल्हास्तरीय समितीद्वारे लॉटरी पद्धतीने निवड केली जाईल.
- प्रवास प्रक्रिया: आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांच्या देखरेखीखाली टूरिस्ट कंपन्या प्रवासाचे आयोजन करतील.
- प्रवासी गट: योजना एकत्रितपणे आयोजित केली जाईल. राज्य शासनाने निश्चित केलेल्या संख्येनुसार प्रवास होईल.
- इतर लोकाांच्या प्रवासासाठी सहभाग: फक्त निवडलेल्या व्यक्तीलाच प्रवास करता येईल.
- अतिरिक्त खर्च: शासनाने निश्चित केलेल्या खर्चाच्या बाहेर अतिरिक्त खर्च लाभार्थ्याला करावा लागेल.
- प्रवासादरम्यान अपेक्षा: नियम व अटींचे पालन करणे आवश्यक.
राज्यस्तरीय समिती:
सदर योजनेचे संनियंत्रण व आढावा घेण्याकरता राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात येत आहे
अटी व शर्ती:
- प्रवासादरम्यान सर्व आवश्यक नियम व अटींचे पालन करणे आवश्यक.
- सहाय्यकाची वयोमर्यादा 21 ते 50 वर्षे असावी.
- दोन पती-पत्नी वय 75 पेक्षा जास्त असल्यास मदतनीसाची सोय केली जाईल.
- सहाय्यकास प्रवासाची संपूर्ण माहिती असणे आवश्यक.
अर्ज प्रक्रिया:
- अर्जदाराने ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक.
- अर्जदाराने आपल्या जवळच्या सेतु केंद्रात अर्ज दाखल करणे.
- अर्ज भरणे पूर्णपणे विनामूल्य आहे.
- अर्ज करताना अर्जदाराने कुटुंबाचे ओळखपत्र, आधार कार्ड व अन्य आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवणे.
.