PM सूर्य घर योजना ही भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ज्याचे उद्दिष्ट देशभरातील एक कोटी घरांमध्ये रूफटॉप सोलर सिस्टीम बसवण्याचे आहे. या योजनेअंतर्गत, सरकार 1 किलो वॅट क्षमतेच्या सौर यंत्रणेसाठी रुपये 30,000 अनुदान देते.
1kW सौर यंत्रणेची किंमत:
- सौर पॅनेल: ₹ 25,000-₹45,000
- सोलर इन्वर्टर:₹5,000-₹10,000
- बॅटरी (पर्यायी):₹10,000-₹15,000
- इतर उपकरणे:₹2,000-₹5,000
- सेट अप फी:₹5,000-₹10,000
1kwसोलर सिस्टिम बसवण्याची किंमत वर दिली आहे प्रत्येक वस्तूची किंमत किती आहे तेथे येथे दिले आहे.
एकूण खर्च:
- बॅटरी शिवाय:₹37,000-₹70,000
- बॅटरी सह:₹47,000-₹85,000
बॅटरीशिवाय आणि बॅटरी सह एक किलोवॅट सोलर सिस्टिम च्या खर्चाची माहिती दिली आहे.
सरकारी अनुदाने:
- 1kW सौर यंत्रणेसाठी:₹30,000 PM सूर्यघर योजनेअंतर्गत,1 किलोवॅट सौर यंत्रणा बसवण्यासाठी ₹30,000 चे अनुदान उपलब्ध आहे.
अनुदानासाठी कसा अर्ज करावा?
पीएमसी मध्ये घरी योजना तुम्हाला 1 ते 3 kW पर्यंतच्या सोलर पॅनलच्या स्थापनेसाठी सबसिडी देते तुम्ही .पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत अर्ज करू शकता.आम्ही नोंदणी आणि अर्जाची संपूर्ण माहिती खाली दिलेल्या बटनावर देत आहोत. पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी सबसिडी मिळवण्यासाठी खाली क्लिक करा.
तुम्हाला किती पैसे द्यावे लागतील:
- बॅटरी शिवाय:₹7,000-₹40,000
- बॅटरी सह:₹17,000-₹55,000
1 kW ची सोलर सिस्टिम स्थापित करण्यासाठी, तुम्हाला 30,000 रुपयांची सबसिडी वगळून ही रक्कम भरावी लागेल.
1 kW सौर यंत्रणेचे फायदे:
- प्रति वर्ष 12,00-15,00युनिट विजेचे उत्पादन
- वीज बिलात प्रति वर्ष ₹6,000-₹7,500 ची बचत
- कार्बन उत्सर्जनात घट
- ऊर्जा स्वातंत्र्य
पीएम सूर्य घर योजनेअंतर्गत एक किलो वॅट सोलर सिस्टिम बसवणे:
- तुम्हाला योजनेच्या वेबसाईटवर नोंदणी करावी लागेल.
- तुम्ही योजनेअंतर्गत नोंदणीकृत विक्रेता निवडणे आवश्यक आहे.
- तुम्हाला विक्रेत्याकडून सौर यंत्रणेचे कोटेशन घ्यावे लागेल.
- तुम्हाला बँकेकडून कर्ज घ्यावे लागेल (आवश्यक असल्यास)
- विक्रेत्याकडून सौर यंत्रणा बसवली जाईल.
- तुम्हाला अनुदानासाठी अर्ज करावा लागेल.
अधिक माहितीसाठी:
- पंतप्रधान सूर्य घर योजनेची वेबसाईट:https://pmsuryaghar.gov.in
- MNRE वेबसाईट:https://mnre.gov.in/
1KW सोलर पॅनल सिस्टीम:
पीएम सूर्य घरी योजना एक किलोवॅट सौर यंत्रणा बसण्याची उत्तम संधी देत आहे. ही योजना तुम्हाला वीजबिला वरील पैसे वाचविण्यात, कार्बन उत्सर्जन कमी करण्यास आणि ऊर्जा स्वातंत्र्य मिळविण्यात मदत करू शकते.