व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

फक्त शंभर रुपयात करून द्या तुमच्या जमिनीची वाटणी |land registration in only 100 rupees.

Land Registration in 100 rs

शेतकरी बांधवांनो शेतजमीन नावावर करण्यासाठी आपल्याला खूप पैसे खर्च करावे लागते परंतु जर आपण एखादी जमीन दुसऱ्या व्यक्तीकडून खरेदी केली तर स्टॅम्प ड्युटी आणि इतर खर्च मिळून जास्त पैसे खर्च करावे लागतात. परंतु जर आपण आपल्या वाढवडिलांकडील जमीन मुलांच्या नावाने करणारा असाल तर ती जमीन नावावर करण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागत नाही.

तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करा. 👈

म्हणजेच वडिलोपार्जित शेत जमीन आपल्या मुलांचे नावावर करत असताना फक्त शंभर रुपयांमध्ये आपण त्या जमिनीची वाटणी करू शकतो. शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करण्याची कायदेशीर प्रक्रिया असून त्याकरिता कुटुंबातील सर्व सदस्यांची सहमती असल्यावर आपण अर्ज करू शकतो हा अर्ज करून आपण कच्च्या नकाशाचा दिल्यास ती जमीन सहजरीत्या नावावर होते. याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील कलम 85 नुसार कार्यवाही करण्यात येत असते.

जमिनीचा नकाशा व सातबारा एकाच कागदावर मिळवा. येथे क्लिक करा.

शंभर रुपयात शेत जमीन वाटणीचा अर्ज कसा करायचा?

शंभर रुपयांमध्ये शेतजमीन फक्त आपण आपली वडिलोपार्जित जमीन नावावर करू शकतो इतर जमिनीकरिता तुम्हाला जास्त खर्च करावे लागतील. कुटुंबातील जमिनीचे वाटप करत असताना जर सर्व कुटुंबातील सदस्यांची सहमती असेल तर आपण एक अर्ज करून तसेच त्यावर कच्चा नकाशा देऊन ही जमीन सहजरित्या नावावर करू शकतो. ही जमीन वाटप करण्यासंदर्भात महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल अधिनियम मध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या तुम्हाला जाणून घेणे महत्त्वाचे आहेत.

हे वाचा-  सिबिल स्कोर कसा वाढवायचा संपूर्ण माहिती |how to increase CIBIL score.

तुमच्या जमिनीचा सातबारा डाऊनलोड करा.👈

1. शंभर रुपयांमध्ये जमिनीची वाटणी करण्यासाठी आपण दुय्यम निबंधकासमोर नोंदणीकृत अर्ज करू शकतो.

2. दिवाणी न्यायालय मध्ये जमीन वाटप करण्यासाठी दावा दाखल करू शकतो.

शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या जमीन महसूल अधिनियमानुसार केवळ शंभर रुपये इतके मुद्रांक शुल्क विहित करावे लागेल. परंतु अनेक लोकांना या संदर्भात माहिती नसल्यामुळे त्यांना वाटते की जमीन नावावर करण्यासाठी खूप पैसा लागेल.

शंभर रुपयांमध्ये शेत जमीन वाटणी करण्यासाठी चा अर्ज कुठे मिळेल?

शेतकरी बांधवांना शंभर रुपयांमध्ये शेत जमिनीची वाटणी करण्यासाठी लागणारा अर्जाचा नमुना आम्ही तुम्हाला खाली उपलब्ध करून दिलेला आहे. अर्जाचा नमुना येथे पहा या लिंक वर क्लिक करून तुम्ही तो अर्ज डाऊनलोड करू शकतात.

अर्जाचा नमुना येथे पहा

शासन निर्णय येथे पहा

वरील ठिकाणावरून आपण शासन निर्णय तसेच अर्ज पाहू शकतात. ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी प्रमाण पर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment