राज्यातील ज्या इच्छुक उमेदवारांना या योजनेच्या अंतर्गत सरकारकडून बेरोजगारी भत्ता मिळवायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा करा.
बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा. 👇
- या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराल सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल 👈
- यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईट मुख्यपृष्ठ उघडेल,
- या होमपेजवर तुम्हाला नोकरी इच्छुक लॉगिन हा पर्याय दिसेल
- या पर्यायाच्या तळाशी तुम्हाला रजिस्टर हा पर्याय दिसेल त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल
या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक नोंदणी फॉर्म उघडेल, या नोंदणी फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसेकी आधार क्रमांक, मोबाइल क्रमांक, इत्यादी संपूर्ण माहिती भरावी लागेल.
- अशा प्रकारे संपूर्ण माहिती भरल्यावर, तुम्हाला खालील नेक्स्ट या बटनावर क्लिक करावे लागेल
- त्यानंतर तुमच्या मोबाइलवर एक OTP येईल, यानंतर तुम्हाला हा OTP भरून सबमिट या बटनावर क्लिक करावे लागेल
- आता तुम्हाला लॉगिन करण्यासाठी परत मागील पेजवर जावे लागेल, आता तुम्हाला लॉगिन फॉर्ममध्ये युजरनेम आणि पासवर्ड त्याचबरोबर कॅप्चा कोड भरावा लागेल, आणि त्यानंतर लॉगिन या बटनावर क्लिक करावे लागेल
- या प्रकारे तुमची अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल
Grievances नोंदणी करण्याची पद्धत
या योजनेच्या अंतर्गत अर्जदाराल सर्व प्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल
यानंतर तुमच्यासमोर या वेबसाईट मुख्यपृष्ठ उघडेल,
- या होमपेजवर तुम्हाला पेजच्या तळाशी Grievances हा पर्याय दिसेल
- तुम्हाला या पर्यायावर क्लिक करावे लागेल. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पुढचे पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पृष्ठावर, तुम्हाला तक्रार नोंदणी फॉर्म दिसेल.
- तुम्हाला या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती भरावी लागेल जसे की वैयक्तिक तपशील, पत्ता आणि संपर्क तपशील, तक्रारी इ. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे लागेल.
- अशा प्रकारे तुमची तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
योजनेची अधिकृत वेबसाईट | इथे क्लिक करा |
---|---|
हेल्पलाईन नंबर | 022-22625651/53 |
महाराष्ट्र सरकारी योजना | इथे क्लिक करा |
कुशल कामगारांना निर्माण करण्यासाठी रोजगार निर्मिती आणि उद्योजकता प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरते. ही वस्तुस्थिती आहे की उद्योजक केवळ आर्थिक वाढीस हातभार लावत नाहीत, तर ते स्वतःसाठी सुद्धा उत्पन्न आणि त्याबरोबर रोजगाराचे स्त्रोत प्रदान करतात, आणि तसेच इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करतात, आणि किफायतशीर पद्धतींद्वारे नवीन आणि नाविन्यपूर्ण उत्पादने/सेवांची निर्मिती करतात. त्यामुळे, रोजगार निर्मितीसाठी उद्योजकतेला गती देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. अशा विविध पद्धतीने शासन नागरिकांसाठी रोजगार उत्पन्न करण्याचा आणि रोजगार वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, त्याचबरोबर राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक पाठबळ देवून सक्षम बनविण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहे, वाचक मित्रहो आपल्याला हि पोस्ट आवडली असेल तर आम्हाला अवश्य कळवा.