व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडकी बहीण योजनेचे पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत की नाही पहा : Check here How to Check ladki bahin yojana all installment deposits in bank account or not?

How to Check Ladki Bahin Yojana Payment Status in Bank Account : महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये सन्मान निधी सरकारकडून दिला जातो. जुलै महिन्यात ही योजना सुरू झाली असून टप्प्याटप्प्याने प्रत्येकाच्या खात्यात पैसे जमा केले जातात. परंतु, अद्यापही काही पात्र महिलांना बँक खात्यात पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला नाही. तसंच, अर्जात ज्या खात्याची नोंद केली आहे, त्या बँकेत जाऊन तपासले असता त्या खात्यातही पैसे आलेले नाहीत, अशी स्थिती तुमचीही झाली असेल तर तुमचे पैसे कोणत्या खात्यात गेले? आणि ते कसे तपासायाचे याविषयी सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहोत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली तेव्हा काही निकष ठरवण्यात आले होते. त्यानुसार, अडीच लाखांच्या खाली उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेत पात्र ठरवण्यात येणार, बँकेशी आधार लिंक असणं गरजेचं आहे, महिलेच्या कुटुंबातील कोणाकडेही चार चाकी गाडी नसावी आदी काही निकष होते. त्यामध्ये बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक असणं फार गरजेचं आहे. कारण, तुमचा अर्ज स्वीकारला गेला असला तरीही बँक सिडिंग नसल्याने तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यास अडचणी येणार आहेत. तसंच, एकापेक्षा अधिक बँक खाती असतील आणि अधिक खात्यांपैकी कोणतंही खातं सिडिंग झालं असेल तर त्या खात्यातही थेट पैसे जमा होत आहेत. अशावेळी पात्र महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा मेसेज येत नाही. त्यामुळे तुमचं कोणतं खातं सिडिंग आहे आणि कोणत्या खात्यात पैसे जाम झालेत, हे कसं तपासायचं ते पाहुयात.

हे वाचा 👉  लाडकी बहीण योजनेत उडाला गोंधळ, अनेक महिलांचे पैसे  दुसऱ्याच खात्यात जमा.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

लाडकी बहीण योजनेचे पैसे कोणत्या खात्यात गेले? असं तपासा!

  • सर्वात आधी https://uidai.gov.in/en/ यासंकेतस्थळावर जा.
  • त्यानंतर खाली असलेल्या My Aadhar वर क्लिक करा.
  • तिसऱ्या कॉलममध्ये Aadhaar Services च्या खाली बँक सिडिंग स्टेटसवर क्लिक करा.
  • तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर लॉग इनचा पर्याय समोर दिसेल. तिथे तुमचा आधार कार्ड क्रमांक समाविष्ट करा, कॅप्चा भरा आणि आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला ओटीपी भरा.
  • आता तुमच्या समोर चौकोनी आकारातील काही पर्याय दिसतील. तिथे Bank Seeding Status वर क्लिक करा.
  • तिथे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर Congratulations! Your Aadhaar-Bank Mapping has been done असा मेसेज येऊन खाली ज्या बँकेत तुमचं आधार कार्ड लिंक आहे, त्याची माहिती येईल. तिथे आलेल्या बँकेतच तुमचे पैसे जमा झाले आहेत.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी तपासण्यासाठी खाली क्लिक करा.

अर्जात भरलेल्या बँक खात्यात पैसे जमा न होता इतर खात्यात पैसे जमा झाल्यास अनेकदा मेसेज येण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे वरील युक्ती वापरून जर तुम्ही प्रक्रिया केलीत तर तुम्हाला पैसे कोणत्या खात्यात गेलेत हे समजायला सोपं पडेल. त्यामुळे लगेच जाऊन त्या बँकेत तुमचं पासबूक तपासून या.

हे वाचा 👉  राज्याच्या पावसाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांसाठी सरकारच्या कोणकोणत्या घोषणा, Maharashtra Assembly Budget 2024 for farmers

लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन क्रमांका कोणता?

सिडिंग बँक खात्यातही पैसे जमा झाले नसतील तर १८१ या हेल्पलईन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आलं आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page