व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना अर्ज प्रक्रिया

नमस्कार मित्रांनो या लेखात आपण राजे यशवंतराव होळकर महामेष योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा याबद्दल सविस्तर माहिती पाहूया. महाराष्ट्र शासनाने या योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी स्वतंत्र पोर्टल विकसित केले आहे. या पोर्टल वर जाऊन कोणीही महामेष योजनेसाठी अर्ज करू शकतात.

या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे. त्या आधी अर्जाची सर्व प्रक्रिया पूर्ण करून घ्या.

  • सर्वप्रथम आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या महामेष योजनेच्या पोर्टलवर जायचे आहे. यासाठी mahamesh.org पोर्टलच्या खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • या वेबसाईट वर आल्यानंतर तुम्हाला अर्जासाठी नोंदणी करा हा पर्याय निवडा
  • अर्ज करतांना खालील सूचनांचे पालन करा
  1. अर्जदारास त्याचा आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक वापरून एकदाच नोंदणी करता येईल.
  2. जर तुम्ही या आधी नोंदणी केली असल्यास “केलेले अर्ज” हा पर्याय निवडुन तुम्ही तुमची माहिती पाहु शकता व त्यामध्ये बदल करू शकता.
  3. आपण या आधी नोंदणी केली नसल्यास “नवीन अर्जदार नोंदणी” हा पर्याय निवडुन नोंदणी करून योजनेचा पर्याय निवडु शकता.
  4. अर्ज करण्याची तारीख संपल्यानंतर अर्जामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करता येणार नाही.
  5. अर्ज करण्याआधी योजेने संबंधित सर्व माहिती व निवडीचे निकष वाचुन घ्यावेत.
  6. अर्जदार पात्रता ही योजनेच्या निकषावरून ठरविली जाईल.
  7. अर्जाची पावती व अर्जाची प्रत ही अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर आपणास डाऊनलोड करता येईल.
हे वाचा-  आप्पाचा विषय लई हार्ड ये गाण्यावर अशोक सराफ यांचा डान्स, पहा धमाल व्हायरल व्हिडिओ
  1.  * असे चिन्ह असलेली माहिती भरणे अनिवार्य आहे.
  2. अर्जदार हा भटक्या-जमाती (भ-जक) प्रवर्गातील असावा
  3. राशनकार्ड नुसार नमूद सदस्यांची नावे, संख्या तसेच आधारकार्ड नंबर माहिती अचूक नोंदवावी.
  4. अर्जदाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी नसावे व ६० वर्षापेक्षा जास्त नसावे.
  5. एका आधारकार्ड नंबर सोबत एकच मोबाइल नंबरची नोंदणी करता येईल याची नोंद घ्यावी.
  6. अर्जदार नोंदणी करत असताना अर्जदाराने स्वत:चा / वापरात असणारा मोबाइल नंबर भरणे आवश्यक आहे
  7. प्रथम लॉगिन पासवर्ड आणि नंतर प्राथमिक निवड झाल्यास एसएमएस द्वारे कळवण्यात येईल
  8. कुटूंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ घेता येईल.
  9. माहिती पूर्णतः खरी असावी. माहिती चुकीची व खोटी आढळून आल्यास आपली निवड रद्द केली जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page