व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड चालवू शकता, काय आहे नियम? जाणून घ्या संपूर्ण माहिती.. | sim card rule

नमस्कार मित्रांनो, आपले आजचे आर्टिकल एका महत्त्वाच्या विषयावर असणार आहे. तो विषय म्हणजे तुम्ही तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड चालवू शकता? यामध्ये आपण एका आधार कार्डवर किती सिम कार्ड एखादा व्यक्ती नियमांतर्गत चालवू शकतो? सदरच्या नियमाचे उल्लंघन केल्यास कोणत्या शिक्षेची तरतूद आहे? तुमच्या नावाचे सिम कार्ड दुसरे कोणी वापरत आहे का? त्याचबरोबर संशयास्पद सिम कार्ड कसे डिॲक्टिव्ह करायचे? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.

आधार कार्ड वर किती सिम कार्ड चालवता येतात, काय आहे नियम?

नवीन सिम कार्ड खरेदी करताना सिम कार्ड विक्रेत्याकडून आधार कार्ड मागितले जाते. एखादा व्यक्ती किती सिम कार्ड खरेदी करू शकतो? याविषयी एक नियम तयार करण्यात आला आहे. या नियमानुसार एका आधार कार्डवर केवळ 9 सिम कार्ड खरेदी करता येतात. तर जम्मू काश्मीर आसाम आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये ही संख्या 6 आहे.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

आधार कार्डवर किती सिम कार्ड ॲक्टिव्ह आहेत हे कसे पाहायचे?

तुमच्या आधार कार्डवर किती सिम ॲक्टिव्ह आहेत, हे टेलिकॉम विभागाच्या https://sancharsaathi.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील ॲक्टिव्ह सिम कार्ड ची संख्या माहित होईल किंवा जाणून घेता येईल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे सिम कार्ड संशयास्पद ॲक्टिव आढळल्यास ते ब्लॉक करून त्याची तक्रार करण्याची सुविधाही या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

हे वाचा-  MapmyIndia App: फायदे आणि डाउनलोड करण्याची पद्धत |Download MapmyIndia App

तुमच्या नावावर किती आणि कोणत्या नंबरचे सिम कार्ड ॲक्टिव्ह आहे हे कसे पाहायचे?

तुमच्या नावावर किती आणि कोणत्या नंबरचे सिम कार्ड ॲक्टिव्ह आहे हे पाहण्याची स्टेप बाय स्टेप माहिती खालीलप्रमाणे:

  • सर्वप्रथम तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in या पोर्टलला भेट द्यावी लागेल.
  • त्यानंतर येथे बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून ओटीपी च्या मदतीने लॉगिन करावे लागेल.
  • आता तुमच्यासमोर त्या सर्व क्रमांकाचे तपशील येतील जे तुमच्या आधार कार्ड वरून चालू आहेत.
  • तुम्हाला माहीत नसलेला क्रमांक जर यादीत असेल तर तुम्ही त्याची तक्रार करू शकता.
  • त्यासाठी नंबर आणि This is not my number हा पर्याय निवडा.
  • आता वरील बॉक्समध्ये ID मध्ये लिहिलेले नाव टाका.
  • आता तळाशी असलेल्या रिपोर्ट बॉक्स वर क्लिक करा.
  • तक्रार केल्यानंतर तुम्हाला तिकीट आयडी संदर्भ क्रमांक देखील दिला जातो.

दुसरे कोणीही तुमचे सिम कार्ड वापरत आहे का हे पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

संशयास्पद सिम कार्ड कसे डिॲक्टिव्ह करायचे?

  • सर्वप्रथम तुम्हाला टेलिकॉम विभागाच्या या संकेतस्थळावर जावे लागेल. 👉🏽 https://sancharsaathi.gov.in
  • होम पेजवर Citizen Centric Service अंतर्गत Know Your Mobile Connections वर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्च्या भरा.
  • तुमच्या मोबाईल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल, तो भरून पुढे जा.
  • आता तुम्हाला तुम्ही तुमच्या आधार कार्ड वर घेतलेला सर्व सिम कार्डचा तपशील मिळेल.
  • आता तुम्हाला तुमच्या आधार कार्ड घेतलेल्या सिम कार्ड मधील एखादा नंबर संशयास्पद वाटत असल्यास Not Required वर क्लिक करून त्याची माहिती देऊ शकता.
  • सिम कार्ड डिॲक्टिव्हेट होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागू शकतो, त्याचबरोबर सिम कार्ड ब्लॉक करण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही.
हे वाचा-  मोबाईलवर जमीन कशी मोजायची | measure land using mobile app

टेलिकॉम कायद्याच्या नियमापेक्षा जास्त सिम ॲक्टिव्हेट केल्यास दंडाची तरतूद

नवीन टेलिकॉम कायद्याच्या नियमानुसार जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या आधार कार्डवर फक्त 9 सिम कार्ड चालू ठेवण्याची परवानगी आहे. यापेक्षा जास्त सिम कार्ड ॲक्टिव्ह आढळल्यास सदर व्यक्तीला  50 हजार ते 2 लाख रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

संचार साथी पोर्टल विषयी थोडक्यात…

संचारसाठी पोर्टलवर अनेक प्रकारच्या सेवा उपलब्ध आहेत, ज्याचा तुम्ही फायदा घेऊ शकता. संचार स्वाती पोर्टलच्या माध्यमातून सायबर फ्रॉड आणि फसवणुकीच्या गुन्ह्याची तक्रार करता येते. संचारसाठी पोर्टलवर केलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई केली जाते. जर तुमचा मोबाईल चोरीला गेला तर तो या पोर्टलच्या माध्यमातून ब्लॉकही केला जातो. टेलिकॉम क्षेत्रातील घोटाळ्यांना आळा घालणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.

सदर लेखामध्ये आपण आधार कार्ड वर तुम्हाला किती सिम कार्ड चालवता येतात त्याचबरोबर टेलिकॉम विभागाच्या नियम तरतुदी याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही सुद्धा तुमच्या आधार कार्डवर किती सिम कार्ड अक्टिव्ह आहेत त्याचबरोबर संशयास्पद सिम कार्ड Deactivate करू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही नक्कीच आवडलेली असेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page