व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम किसान संपदा योजनेअंतर्गत, आता अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी मिळणार 50% पर्यंतचे अनुदान.. जाणून घ्या योजनेची संपूर्ण माहिती.!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

PM Kisan Sampada Yojana 2025

नमस्कार, देशातील बहुतांश लोक शेती व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळेच केंद्र सरकार कृषी व्यवसायाकडे अनेक योजनांच्या माध्यमातून विशेष लक्ष देत असते. म्हणूनच केंद्र सरकारने कृषी पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी प्रधानमंत्री किसान संपदा योजना (PM-Kisan Sampda Yojana) सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2025 आहे. सदर लेखामध्ये आपण प्रधानमंत्री किसान संपदा योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहूया.

पीएम किसान संपदा योजनेविषयी थोडक्यात..

प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही भारत सरकारच्या अन्नप्रक्रिया उद्योग मंत्रालयांतर्गत राबवली जाणारी एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून कृषी क्षेत्राच्या विकासाबरोबरच शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. या योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन कृषी उत्पादनांना मूल्यावरतीत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी या योजनेची सुरुवात 2017 मध्ये करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत किरकोळ विक्रीपासून पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यावर भर दिला जातो.

पीएम किसान संपदा योजनेचे फायदे

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे फायदे आपण खाली पाहूया:

  • या योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची संधी आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून भारतातील ई-कॉमर्स आणि किरकोळ क्षेत्रातील अन्न प्रक्रिया व्यवसायाला चालना मिळणार आहे.
  • कृषी उत्पादनांचे संरक्षण, प्रक्रिया आणि वितरण अधिक चांगल्या पद्धतीने होणार आहे.
  • सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे या योजनेअंतर्गत कृषी क्षेत्रातील नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत.
हे वाचा 👉  ‘पोरी जरा हळू हळू चाल’, गाण्यावर काय नाचली चिमुकली, VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक - Ladaki Bahin

पीएम किसान संपदा योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत अन्नप्रक्रिया उद्योगांसाठी आणि साठवण सुविधांसाठी 40 ते 50% पर्यंत अनुदान दिले जाते.

सदर योजनेच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 2016 ते 2020 या कालावधीसाठी 6000 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित करण्यात आले होते. आता या योजनेच्या पुढील टप्प्यामध्येही मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जाणार आहे.

अनुदानाचा वापर अन्न प्रक्रिया उद्योग आणि साठवण सुविधांसाठी करणे अनिवार्य

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत मिळालेल्या अनुदानाचा वापर कशासाठी करता येतो? हे आपण खाली पाहूया:

  • नवीन अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आणि त्यांच्या विस्तारासाठी अनुदानाचा वापर करणे अनिवार्य आहे.
  • साठवण सुविधा विकसित करण्यासाठी सदरच्या अनुदानाचा वापर करणे अनिवार्य आहे.
  • प्रक्रिया उद्योगासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानामध्ये सुधारणा करण्यासाठी अनुदानाचा वापर करणे.
  • उत्पादने टिकवण्यासाठी आणि उत्पादनांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामग्रीसाठी अनुदानाचा वापर करणे अनिवार्य आहे.

पीएम किसान संपदा योजनेमध्ये समाविष्ट असलेले उद्योग/प्रकल्प

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेमध्ये समाविष्ट असलेले उद्योग/प्रकल्प आपण खाली पाहूया:

  • अन्न प्रक्रिया उद्योग (शेती व शेतीवर आधारित व्यवसाय)
  • शितगृहे आणि गोदाम सुविधा
  • मेगा फूड पार्क आणि कृषी-प्रक्रिया क्लस्टर
  • लॉजिस्टिक व पुरवठा साखळी व्यवस्थापन केंद्र
  • इतर अन्न प्रक्रिया संबंधित उत्पादन युनिट्स

पीएम किसान संपदा योजनेसाठी आवश्यक पात्रता

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेअंतर्गत विविध उद्योगांसाठी पात्रता निकष भिन्न आहेत. एखाद्या उदाहरणादाखल सांगायचे झाले तर,

  • मेगा फूड पार्क साठी विशेष उद्देश कंपनी आवश्यक आहे. ज्यामध्ये गुंतवणूकदाराची एकूण निव्वळ संपत्ती किमान ₹50 कोटी असणे आवश्यक आहे.
  • अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधांसाठी केंद्र/राज्य सरकारी संस्था, खाजगी क्षेत्रातील संस्था त्याचबरोबर विद्यापीठे पात्र आहेत.
हे वाचा 👉  Groww ॲप डाऊनलोड करा. |Groww ॲपवरून प्रत्येक ट्रान्जेक्शन वर कॅशबॅक मिळवा.

पीएम किसान संपदा योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

पी एम किसान संपदा योजनेच्या अर्ज प्रक्रियेसाठी अर्जदाराने काही कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असते. सदरची कागदपत्रे कोणती आहेत हे आपण खाली पाहू:

  • आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • जमिनीची कागदपत्रे
  • बँक खाते पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर

अर्जदाराने अर्ज करताना सदरची कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे परंतु ही कागदपत्रे अर्जाच्या प्रकारानुसार बदलू शकतात.

पीएम किसान संपदा योजनेसाठी अर्ज कसा करायचा?

प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो. सदर योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2025 आहे. ऑनलाईन अर्ज कसा करायचा याबाबतची स्टेप बाय स्टेप माहिती आपण खाली पाहूया:

  • पीएम किसान संपदा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जावे लागेल.👉🏽 https://sampada-mofpi.gov.in/
  • वेबसाईटवर गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला नोंदणी करण्यासाठी होम पेजवर Investing Online Application Under PMKSY Scheme या लिंक वर क्लिक करून प्रकल्पाची निवड करा आणि नोंदणी फॉर्म मध्ये आवश्यक ती माहिती भरून सबमिट करा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही क्रेडेन्शिअल्ससह वेबसाईटवर लॉगिन करा.
  • लॉग इन केल्यानंतर सदर योजनेचा अर्ज उघडून त्यामध्ये सर्व आवश्यक ती माहिती अचूकपणे भरून आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • सर्वात शेवटी अर्जामधील सर्व माहिती आणि कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज सबमिट करा.
हे वाचा 👉  आजच्या सोन्याच्या किमतीत वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर | Gold rate today

अशा पद्धतीने तुम्ही प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी अर्ज करू शकता. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही वर दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.

सदर लेखामध्ये आपण प्रधानमंत्री किसान संपदा योजनेविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. जर तुम्ही अन्नप्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी इच्छुक असाल तर, तुमच्यासाठी ही योजना म्हणजे एक मोठी संधी आहे. या योजनेच्या माध्यमातून अन्य प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून एक मोठा उद्योजक होण्याची सुवर्णसंधी तुमच्यासमोर आहे.धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page