व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्त्या राज्य शासन कधी करणार बँक खात्यामध्ये जमा? जाणून घ्या.!

नमस्कार, या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता राज्य सरकारकडून कधी वितरित केला जाणार आहे? याबाबतची संपूर्ण माहिती पाहूया.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये सुरू केलेली सर्वाधिक लोकप्रिय योजना म्हणून ओळखली जाते. सदर योजनेचा उद्देश्य राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा आहे. यासाठी राज्य सरकार पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दरमहा 1500 रुपयांची रक्कम जमा करते. सदर योजनेच्या माध्यमातून सरकारकडून महिलांना आर्थिक सक्षम करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी पाऊल उचलले जात आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्त्यांचे वितरण राज्य सरकारकडून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये वितरित केले आहे. परंतु आता राज्यातील लाडक्या बहिणींना 8 वा हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 8 व्या हप्त्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमांमध्ये असे सांगितले आहे की, लाडकी बहीण योजनेच्या 8 व्या हप्त्याचे वितरण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे.

अपात्र बहिणीकडून निधी परत घेतला जाणार नाही

राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अगदी अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झालेली दिसून येते. परंतु सदर योजनेबाबत सरकारने ज्या अटी व शर्ती या योजनेचा लाभ घेण्यासाठी घातलेल्या होत्या. त्या अटी व शर्ती डावलून राज्यातील अनेक लाडक्या बहिणींनी या योजनेचा लाभ घेतला होता. अशा लाडक्या बहिणींवर सरकार कारवाई करणार असे सांगण्यात आले होते. या कारवाईमध्ये आत्तापर्यंत लाडक्या बहिणींनी घेतलेली रक्कम लाभ परत घेण्यात येईल असे सांगितले जात होते.

हे वाचा 👉  PMEGP LOAN SCHEME |PMEGP योजनेअंतर्गत दहा रुपये लाख रुपयांच्या कर्जावर 35% सबसिडी

परंतु याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींकडून आतापर्यंत वितरित केलेल्या 7 हप्त्यांचे पैसे परत घेतले जाणार नाहीत असे सांगितले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत 5 लाख लाडक्या बहिणी अर्ज पडताळणी करून अपात्र करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये या योजनेच्या अटी व शर्ती आहेत. त्यानुसार या अटी व शर्तीमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना या योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहेत. यामध्ये या योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांकडे चार चाकी वाहन असल्याचे आढळून आले आहे. त्याचबरोबर काही महिला या योजनेच्या वयोमर्यादेच्या अटींमध्ये न बसणाऱ्या आहेत. त्याचबरोबर काही काही महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.50 लाख रुपयांपेक्षा जास्त असल्याचे पडताळणी मध्ये दिसून आले आहे. अशा सर्व लाडक्या बहिणींना या योजनेसाठी अपात्र करण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार?

राज्य शासन लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये महिन्याला 1500 रुपये जमा करते. पण विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने जर आमचे सरकार राज्यामध्ये सत्तेवर आले तर, लाडक्या बहीण योजनेची रक्कम 2100 रुपये करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यामध्ये महायुतीचे सरकार निवडून आले परंतु अजून त्यांच्याकडून दिले गेलेल्या आश्वासन पूर्ण केले गेले नाही. म्हणजेच राज्यातील लाभार्थी लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचे 2100 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे.

हे वाचा 👉  SBI Mutal fund बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा

लाडक्या बहिणी योजनेचे 2100 रुपयांची तरतूद राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये केली जाईल असे राज्य शासनाकडून स्पष्ट केले गेले आहे. त्यानुसार राज्याचा अर्थसंकल्प 1 मार्च रोजी अर्थमंत्री अजित पवार सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार लाडक्या बहीण योजनेच्या वाढीव हप्त्याबाबतच्या तरतुदीची घोषणा करू शकतात.

या पोस्टमध्ये आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 वा हप्ता लाभार्थी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी वितरित केला जाणार आहे. याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. त्याचबरोबर अपात्र महिलांच्याकडून सदर योजनेअंतर्गत वितरित केलेले रक्कम परत घेतली जाणार आहे या चर्चावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूर्णविराम लावलेला आहे. त्यांनी असे सांगितले आहे की कोणत्याही प्रकारची रक्कम अपात्र महिलांच्याकडून परत घेतली जाणार नाही. त्याचबरोबर राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार हे 1 मार्च रोजी सादर करणार आहेत. यामध्ये महायुती सरकारकडून दिलेले आश्वासन म्हणजे या योजनेची वाढीव रक्कम म्हणजेच 2100 रुपये याबाबतची तरतूद अर्थसंकल्पामध्ये केली जाईल का? याबाबतची संपूर्ण माहिती आपण या पोस्टमध्ये पाहिली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही पोस्ट नक्कीच आवडलेली असेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page