व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

भारतीय बाजारात लॉन्च झाली पहिली सोलर इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या कारची किंमत, फीचर्स आणि रेंज आणि बरेच काही…

नमस्कार मित्रांनो, आपला देश दिवसेंदिवस टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये प्रगती करताना दिसत आहे. या प्रगतीमध्ये आता आणखी एक भर पडताना दिसते, ती म्हणजे सोलर एनर्जी वर चालणारी भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार ईवा होय. या कारचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही कार मुख्यत्वे सोलर एनर्जी वर चालणारी Solar Electric Car Eva म्हणून ओळखली जाते. आजच्या या लेखांमध्ये आपण या सोलर इलेक्ट्रिक कार विषयीची संपूर्ण माहिती सविस्तर पाहूया.

व्यावे मोबिलिटी कंपनीने Solar Electric Car Eva चे लॉन्च केले 3 व्हेरियंट्स

भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कार ईवाचे व्यावे मोबिलिटी कंपनीकडून 3 व्हेरियंट लॉन्च केले गेले आहेत. यामध्ये 9 किलोवॅट प्रति तास, 12 किलोवॅट प्रति तास आणि 18 किलोवॅट प्रति तास यांचा समावेश आहे. या 3 व्हेरियंट पैकी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कोणताही एक पर्याय निवडू शकता.

Solar Electric Car Eva किंमत

भारतातील पहिली सोलर इलेक्ट्रिक कारची एक्स-शोरूम किंमत वर दिलेल्या 3 व्हेरीयंट नुसार 3.25 लाख रुपयांपासून ते 5.99 लाख रुपयांपर्यंत आहे. कंपनीने या सोलर कारची प्री-बुकिंग देखील सुरू केली आहे. तुम्ही जर ही कार खरेदी करण्यास इच्छुक असाल तर, तुम्हाला प्री बुकिंग करण्यासाठी फक्त 5000 रुपये मोजावे लागतील. प्री बुकिंग केल्यानंतर तुम्हाला ही कार 2026 मध्ये मिळू शकेल.

व्यावे मोबिलिटी कंपनीकडून ही कार बुक करणाऱ्या पहिल्या 25,000 ग्राहकांना अनेक बेनिफिट्स मिळतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये एक्सटेंडेट बॅटरी वॉरंटी, 3 वर्षाची मोफत वाहन कनेक्टिव्हिटी यासारख्या अनेक फीचर्स चा समावेश असेल. या बेनिफिट्स चा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला फक्त 5000 रुपये खर्च करून या कारचे प्री-बुकिंग करणे आवश्यक आहे.

हे वाचा 👉  मोबाईलवरच तयार करा फार्मर आयडी कार्ड, तेही एक रुपयाही न खर्च करता. |Apply for Farmer id card on mobile.

Solar Electric Car Eva चे सोलर पॅनल

सोलर इलेक्ट्रिक कार ईवाचे सोलर पॅनल आणि इलेक्ट्रिक मोटर एकत्रितपणे उत्कृष्ट परफॉर्मन्स देतात. कारचा कमाल वेग ताशी 70 किलोमीटर आहे. ही कार 5 सेकंदात 0-40 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठू शकते. दरम्यान या कारच्या प्रवासादरम्यान ऑप्शनल असलेले सोलर रूफ 3000 किलोमीटर पर्यंत बॅटरी  चार्जिंग देखील करते.

Solar Electric Car Eva फीचर्स

सोलर इलेक्ट्रिक कार ईशाच्या फीचर्स बद्दल सांगायचे झाले तर, यामध्ये लिक्विड बॅटरी कूलिंग, पॅनोरॅमिक ग्लास समरूप, लॅपटॉप चार्जर, ॲपल कारप्ले TM आणि अँड्रॉइड ऑटो TM हे फीचर्स देण्यात आले आहेत. कॉम्पॅक्ट आकारामुळे मोठ्या पेट्रोल कार गाड्यांना पर्याय म्हणून सोलर इलेक्ट्रिक कार ईवा उत्तम ठरते. या कारची रनिंग कॉस्ट फक्त 0.5 रुपये प्रति किलोमीटर आहे. Solar electric car Eva एकदा चार्ज केल्यानंतर अडीचशे किलोमीटरची रेंज देते म्हणजेच 250 किलोमीटर पर्यंत धावते.

Solar Electric Car Eva विषयी व्यावे मोबिलिटी कंपनीचे मत

व्यावे मोबिलिटीचे सीईओ यांनी या कार विषयी असे सांगितले आहे की, ही कार जागतिक तापमान वाढ, उर्जेवरील अवलंबित्व आणि प्रदूषण यांचे आव्हान कमी करण्याच्या दृष्टीने ही सोलर इलेक्ट्रिक कार तयार केली आहे.

एकंदरीत पाहिले तर ही कार तयार करण्यामागे कंपनीचा हेतू निसर्गामध्ये उपलब्ध असलेल्या सोलर ऊर्जेचा वापर करून पेट्रोल डिझेल यासारख्या इंधनामुळे होणारे प्रदूषण कमी करून पर्यावरणाचा होणारा ऱ्हास कमी करणे असल्याचे दिसून येते. सोलर आणि इलेक्ट्रिक उपकरणाचा एक चांगला मेळ घालून उत्कृष्ट कार या कंपनीने तयार केली आहे.

हे वाचा 👉  पंजाबराव डख यांचा अवकाळी पावसाचा हवामान अंदाज |पंजाब डख हवामान अंदाज.

सदर लेखांमध्ये आपण भारतामध्ये सौर उर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक कार जी नुकतीच भारतीय बाजारामध्ये सादर केली आहे. या कार विषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. तुम्ही सुद्धा कमी बजेटमध्ये व सोलर व इलेक्ट्रिक यांचा मेळ घालून तयार केलेली कार घेण्यासाठी इच्छुक असाल तर, वर त्या कारची संपूर्ण माहिती तुमच्यासाठी आम्ही सादर केली आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडेल. धन्यवाद!

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page