व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

महाराष्ट्राला मिळणार आणखी एक 713 किलोमीटर लांबीचा महामार्ग, राज्यातील या शहरांमधून जाणार नवीन महामार्ग.. जाणून घ्या संपूर्ण माहिती!|Maharashtra New Expressway

गेल्या काही वर्षांपासून देशामध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रात देखील अनेक महामार्ग केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने पूर्णत्वास नेले आहेत. यामुळे देशातील दळणवळण व्यवस्था सध्या मजबूत दिसत आहे. यामध्ये आता आपल्या राज्याला आणखी एका नव्या महामार्गाची भेट केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून मिळणार आहे. हा महामार्ग इंदौर ते बाडवा-बुरहानपूर-इच्छापूर मार्गे महाराष्ट्र आणि तेलंगणा मधून हैदराबाद असा असणार आहे. या पोस्टमध्ये आपण या नवीन महामार्गाबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया.

भारतामध्ये जेव्हापासून श्री. नितीन गडकरी यांच्याकडे केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार आला आहे, तेव्हापासून देशात हजारो किलोमीटर लांबीचे नवीन महामार्ग तयार झाले आहेत, आणि होत आहेत. देशातील रस्त्यांची दुर्दशा यामुळे दळणवळणावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने रस्त्याचे नेटवर्क वाढवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले आहेत. या कारणांमुळेच सध्या भारतातील दळणवळण व्यवस्थाही गेल्या काही वर्षांच्या तुलनेत खूपच मजबूत होताना दिसत आहे.

महाराष्ट्रामध्ये देखील गेल्या काही वर्षांमध्ये अनेक महामार्ग प्रोजेक्ट पूर्ण झाले आहेत, यामध्ये समृद्धी महामार्गाचा विशेषत्वाने उल्लेख करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर अनेक महामार्ग पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहेत. अशातच महाराष्ट्राला आणखी एक नव्या महामार्गाची भेट केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाकडून मिळणार आहे. यामुळे राज्यातील दळणवळण व्यवस्था आणखीन मजबूत होईल यात शंकाच नाही.

हे वाचा 👉  भारतीय दूरसंचार विभागाच्या नव्या नियमानुसार, रिचार्जशिवाय आता किती दिवस सुरू राहू शकते तुमचे सिम कार्ड? पहा संपूर्ण माहिती!

हा नवीन महामार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांना जोडणार आहे. मध्य प्रदेशातील इंदौर शहराला हैदराबाद शहराशी जोडण्यासाठी हा प्रोजेक्ट भारतमाला प्रकल्पांतर्गत विकसित केला जाणार आहे. या संपूर्ण महामार्गाची लांबी 713 किलोमीटर असणार आहे. या महामार्गामुळे राज्या-राज्यांतील कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होणार आहे.

हा नवीन महामार्ग मध्य प्रदेशातील इंदौर ते बाडवा-बुरहानपुर-इच्छापुर मार्गे महाराष्ट्र आणि तेलंगणा मधून हैदराबाद असा जाणार आहे. आपण हा महामार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यातील कोण कोणत्या शहरातून जाणार आहे, हे आपण खाली पाहूया.

3 राज्यातील या शहरांमधून जाणार आहे, हा महामार्ग

हा महामार्ग मध्य प्रदेशातील इंदौर, बाडवा, बुरहानपुर आणि इच्छापूर शहरांमधून जाणार आहे.

हा महामार्ग महाराष्ट्रातील मुक्ताईनगर, जळगाव, अकोला, हिंगोली, नांदेड या शहरांमधून जाणार आहे.

हा महामार्ग तेलंगणामधील मंगलूर, रामसनपल्ली, संगारेड्डी आणि हैदराबाद या शहरांमधून जाणार आहे.

इंदौर ते हैदराबाद महामार्ग निर्मितीसाठी होणार इतका खर्च

इतर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेचं हा महामार्ग सुद्धा National Highway Authority of India (NHAI) कडून बांधला जाणार आहे. नव्याने प्रस्तावित असलेल्या या संपूर्ण महामार्गाच्या निर्मितीसाठी 15,000 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

सध्याचे इंदौर ते हैदराबाद हे अंतर 876 किलोमीटर एवढे आहे. पण हा महामार्ग तयार झाल्यानंतर, हे अंतर 157 KM ने कमी होणार आहे. त्याचबरोबर या महामार्गावरील प्रवासाचा कालावधी 3 तासांनी कमी होणार असून इंदोर ते हैदराबाद हे अंतर केवळ 10 तासांमध्ये पूर्ण करता येणार आहे.

हे वाचा 👉  लाडकी बहीण योजनेसाठी लागणारे कागदपत्रे |लाडकी बहीण योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात.

इंदौर ते हैदराबाद या महामार्गामुळे होणारे फायदे

हा महामार्ग तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांसाठी व्यापाराची मोठी संधी निर्माण होणार आहे. विशेषतः जळगाव, अकोला, नांदेड या भागातील कृषी व औद्योगिक उत्पादने थेट दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये सहज पोहोचवणे शक्य होणार आहे, तेही कमी खर्चामध्ये.

हैदराबाद हे आयटी हब असल्यामुळे अनेक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. नांदेड आणि हिंगोली सारख्या भागातून आयटी व स्टार्ट अप क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी या महामार्गावरील प्रवास सोपा आणि जलद होईल.

नवीन महामार्ग केवळ व्यापार आणि उद्योगासाठीच नाही, तर कृषी, शिक्षण आणि पर्यटन क्षेत्रासाठी ही उपयुक्त ठरणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल या महामार्गाच्या माध्यमातून दक्षिण भारतातील बाजारपेठांमध्ये जलद आणि सहज पोहोचवतात येणार आहे.

या महामार्गामुळे महाराष्ट्र आणि तेलंगणातील विद्यार्थी शिक्षणासाठी सहज आणि जलद प्रवास करू शकतील. हैदराबाद आणि पुणे ही शैक्षणिक केंद्र या महामार्गामुळे अधिक जवळ येतील.

या महामार्गामुळे उद्योग, व्यापार, शिक्षण आणि पर्यटन या सर्व क्षेत्रांना खूप मोठा फायदा होणार आहे.

या पोस्टमध्ये आपण केंद्र सरकारच्या रस्ते व वाहतूक मंत्रालयाने प्रस्तावित केलेला नवीन महामार्ग इंदौर ते हैदराबाद या महामार्गाबाबतची संपूर्ण माहिती पाहिली आहे. विशेषतः या महामार्गामुळे महाराष्ट्राला होणारा फायदा काय आहे? त्याचबरोबर महाराष्ट्रातील कोणत्या शहरांमधून हा महामार्ग केलेला आहे. हे पाहिले आहे. आम्ही आशा करतो की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच आवडेल. धन्यवाद!

हे वाचा 👉  NLM scheme. शेळीपालन योजना

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page