व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

FD मध्ये एकरकमी पैसे गुंतवायचे की SIP द्वारे गुंतवणूक करायची?  तुम्हीही गोंधळात असाल तर जाणून घ्या कुठे फायदा आणि कुठे नुकसान.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

गॅरंटीड रिटर्न योजनांना प्राधान्य देणारे गुंतवणूकदार अनेकदा संभ्रमात असतात की त्यांनी गुंतवणुकीसाठी गॅरंटीड रिटर्न स्कीम निवडावी की मार्केट लिंक्ड SIP.  तुमचाही गोंधळ असेल तर तुमचा संभ्रम इथे दूर होणार आहे.

फिक्स्ड डिपॉझिट म्हणजेच FD हे गुंतवणुकीचे एक साधन आहे. बऱ्याच वर्षांपासून लोक यामध्ये गुंतवणूक देखील करत आहेत. ज्यामध्ये गुंतवणूकदाराला त्याच्या पैशावर किती व्याज मिळेल आणि किती वर्षात किती रक्कम मिळेल. हे आधीच माहित असते. व या गुंतवणुकीमध्ये थोडीशी देखील रिस्क नसते. त्यामुळे बरेच लोक FD मध्ये गुंतवण्यासाठी जास्त इच्छुक असतात. आजकाल तरुण पिढी व वेल एज्युकेटेड  लोक म्युच्युअल फंडामध्ये SIP द्वारे गुंतवणूक करण्यास देखील ‌ चांगली पसंती देत आहेत.  जरी हे मार्केट लिंक्ड असल्यामुळे, तुम्हाला त्यात हमी व्याज मिळत नाही, परंतु काही काळापासून त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.कारण यामध्ये गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या गुंतवलेल्या रकमेच्या किमान 15 ते 40 टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळतो, त्यामुळे  गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांद्वारे मोठ्या प्रमाणात पैसे गोळा केले आहेत.

अशा परिस्थितीत, खात्रीशीर परताव्याच्या योजनांना प्राधान्य देणारे गुंतवणूकदार अनेकदा गुंतवणुकीसाठी दोन पर्यायांपैकी कोणते पर्याय निवडायचे याबद्दल संभ्रमात राहतात.  जर तुम्हालाही अशा गोंधळाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत असेल, तर येथे जाणून घ्या FD आणि म्युच्युअल फंडाशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी, जेणेकरून तुमच्यासाठी गुंतवणूक कुठे फायदेशीर ठरेल हे समजू शकेल. तुमच्या गुंतवणुकीसाठी एफडी चांगली की म्युच्युअल फंड.

हे वाचा 👉  आचारसंहिता म्हणजे काय ?निवडणूक जाहीर झाल्यानंतर जाणून घ्या

व्याजदराच्या बाबतीत कोण चांगले आहे?

ज्या व्याजदराने तुम्ही तुमची FD मधील रक्कम निश्चित करता, मॅच्युरिटीवर तुम्हाला त्या व्याजदरानुसार लाभ मिळतो.  आज, बहुतेक बँका FD वर जास्तीत जास्त ८% व्याज देत आहेत.  तर म्युच्युअल फंड बाजाराशी जोडलेले असतात.  बाजारातील चढउताराचा परिणाम यावर दिसून येत आहे.  परंतु जर तुम्ही त्यात SIP द्वारे गुंतवणूक केली तर तुम्हाला सरासरी १२ टक्क्यांपर्यंत व्याज मिळते, जे FD पेक्षा खूपच चांगले आहे. हे व्याज बराच वेळा 12% पेक्षा जास्त ते 40 %पर्यंत असू शकते .

तुम्ही तुमचे पैसे कधी वापरू शकता ?

लवचिकतेच्या दृष्टीने पाहिले तर म्युच्युअल फंड अधिक चांगले मानले जातात.  जेव्हा तुम्हाला निधीची आवश्यकता असेल तेव्हा, तुम्ही पैसे काढू शकता.  तुम्ही सतत हप्ते भरण्यास सक्षम नसल्यास, तुम्ही काही काळ थांबवू शकता.  तर एफडीमध्ये असे होत नाही.  एकदा तुम्ही कालावधीसाठी पैसे निश्चित केले की, तुम्ही त्यापूर्वी पैसे काढू शकत नाही.  तो मागे घेतल्यास दंड भरावा लागतो. व तुम्हाला तुमचा व्याज परतावा देखील कमी मिळतो. परंतु म्युच्युअल फंड मध्ये असे काही होत नाही ज्या ठराविक कालावधीपर्यंत तुम्ही तुमचे पैसे म्युच्युअल फंड मध्ये गुंतवलेले आहेत तोपर्यंतचे तुम्हाला पूर्णपणे रिटर्न तुम्हाला मिळतो व तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही केव्हाही तुमचे पैसे म्युच्युअल फंड मधून काढून घेऊ शकता.

हे वाचा 👉  राशन कार्ड असलेल्या महिलांसाठी आनंदाची बातमी! मिळणार तब्बल ₹12,600 – संपूर्ण माहिती जाणून घ्या!

Tax बाबतीत कोण चांगले आहे ?

Tax बाबतीतही म्युच्युअल फंड FD पेक्षा चांगला असू शकतो. कारण   म्युच्युअल फंडाच्या ELSS योजनेमध्ये, तुम्हाला फक्त तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीवर कर सूट मिळू शकते, परंतु FD मध्ये कर लाभ मिळवण्यासाठी, तुम्हाला किमान 5 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.  याशिवाय म्युच्युअल फंडाचा एक फायदा असा आहे की तुम्ही तो अगदी कमी रकमेनेही सुरू करू शकता.  SIP फक्त 500 रुपयांनी सुरू करता येते. व तुम्हाला जर आर्थिक अडचण भासत असेल तर तुम्ही काही कालावधीसाठी तुमची SIP थांबवू देखील शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page