व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

NLM scheme. शेळीपालन योजना

NLM Scheme सुधारीत राष्ट्रीय पशुधन अभियान अर्थसाह्याचे स्वरूप

अर्थसाह्याचे स्वरूप बघितल्यास या योजनेमध्ये खाली दर्शविल्यानुसार दोन समान हप्त्यांमध्ये प्रकल्पाच्या भांडवली खर्चावर ५० टक्के अनुदान देण्यात येते.

१०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + ५ (बोकड अथवा नर मेंढे ) १० लाख
२०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १० (बोकड अथवा नर मेंढे) २० लाख
३०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + १५ (बोकड अथवा नर मेंढे) ३० लाख
४०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २० (बोकड अथवा नर मेंढे) ४० लाख
५०० (शेळ्या अथवा मेंढ्या) + २५ (बोकड अथवा नर मेंढे) ५० लाख

राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर आणि बँक किंवा वित्तीय संस्था यांनी कर्जाचा पहिला हप्ता लाभार्थ्याला वितरित केल्यानंतर, शासनामार्फत अनुदानाची ५० % रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये वितरित केली जाते, उर्वरित ५० % अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने शिफारस केल्यानंतर लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

बँक कर्ज न घेता स्वयं-निधीमधून प्रकल्प उभारणी करण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या बाबतीमध्ये, ज्या बँकेत पात्र लाभधारकाचे खाते आहे, त्या बँकेद्वारे प्रथम प्रकल्पाचे मूल्यांकन करणे आवश्यक आहे. प्रकल्प मंजूर झाल्यानंतर राज्य अंमलबजावणी एजन्सीने अनुदान वितरित करण्याबाबत शिफारस केल्यानंतर आणि प्रकल्पाच्या एकूण भांडवली खर्चापैकी लाभधारकांनी २५ % खर्च स्वतः केल्यानंतरच शासनामार्फत अनुदानाची ५० % रक्कम लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये थेट वितरित केली जाते, उर्वरित ५० % अनुदानाची रक्कम प्रकल्प पूर्ण होऊन राज्य अंमलबजावणी एजन्सीने प्रकल्पाची शहानिशा केल्यानंतर लाभधारकांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते.

हे वाचा-  Mahindra Bolero Pickup फक्त 25 हजारात घरी, घेऊन जा , जाणून घ्या कसं...| Mahindra Bolero Pickup भारतात लॉन्च.

स्वनिधीमधून प्रकल्प राबविण्यात येणाऱ्या पात्र असलेल्या लाभधारकांनी प्रकल्पातील अनुदान रक्कम वगळता उर्वरित रकमेची हमी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय व मत्स्यपालन मंत्रालय, भारत सरकार यांच्या नावे ३ वर्षांसाठी बँक गॅरंटीच्या स्वरूपात हमी देणे आवश्यक आहे

Rashtriya pashudhan vikas abhiyan  या अभियानाच्या सर्व मार्गदर्शक सुचना राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://ahd.maharashtra.gov.in  व केंद्र शासनाच्या  पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ https://www.nlm.udyammitra.in  यावर उपलब्ध आहे.

योजनेच्या लाभासाठी https://www.nlm.udyammitra.in संकेतस्थळावरील पोर्टलद्वारे ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा आहे. 

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment