व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

एक रुपयात पिक विमा कसा भरावा | pmfby अंतर्गत पिक विमा भरा.

महाराष्ट्रात 2016 च्या खरिप हंगामापासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येते. महाराष्ट्र सरकारनं 2023 मध्ये या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला.

नवीन बदलांनुसार, गेल्या वर्षीपासून ‘सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राज्यात राबवण्यात येत आहे.

त्यानुसार, शेतकऱ्यांना केवळ 1 रुपयात पीक विम्यासाठी अर्ज करता येणार आहे.

गेल्यावर्षी राज्यातून एकूण 1 कोटी 70 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, अशी माहिती कृषी संचालक विस्तार व प्रशिक्षण विनयकुमार आवटे यांनी दिली आहे.

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणारी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी कालावधी सुरू झाला आहे. एक रुपयात शेतकऱ्यांना आपल्या पिकाचा विमा काढता येणार आहे. या योजनेत सहभागी होण्याची मुदत १५ जुलैपर्यंत आहे. शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

मोबाईल वरून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

केंद्र सरकारने २०१६ पासून प्रधानमंत्री शेतकरी पीक विमा योजना सुरू केली. खरीप व रब्बी हंगामातील पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सुरुवातीच्या टप्प्यात खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के व रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तर दोन्ही हंगामांतील नगदी पिकांसाठी विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्के रकमी शेतकऱ्यांकडून घेतली जात होती.

हे वाचा-  Earn money online gaming app: घरबसल्या मोबाईलवर गेम खेळून पैसे कमवण्याचा सोपा मार्ग!

मात्र, आता राज्य शासन हे पैसे भरणार असून, शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया घेतला जाणार आहे. शेतकऱ्यांना एक रुपया भरून या योजनेत सहभागी होता येते. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्याची गरज आहे.

खरिप हंगाम-2024 मध्ये योजनेत सहभागी होण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 ही आहे.

‘या’ पिकांसाठी विमा संरक्षण
तृणधान्य, कडधान्य : भात, खरीप ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तूर, मका.
गळीत धान्य : भुईमुग, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन, तीळ.
नगदी पीक : कापूस, कांदा.

पीक विमा योजनेत अर्ज करताना किती पैसे लागतात?

पीक विमा योजनेत शेतकरी स्वत: ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासाठीचा अर्ज प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट pmfby.gov.in वर करता येतो.

योजनेचा ऑनलाइन अर्ज असा करा.

  • मोबाईल वरून एक रुपयात पिक विमा भरण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.

  • ■ सुरुवातीला pmfby.gov.in असं सर्च केल्यानंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेची वेबसाईट ओपन होईल.
  • ■ येथील Farmer Application या पर्यायावर क्लिक करा.
  • ■ त्यानंतर Guest Farmer या पर्यायावर क्लिक करा.
  • ■ नवीन शेतकरी म्हणून नोंदणी करून सर्व माहिती भरा.
  • मोबाइल क्रमांक टाकून verify वर क्लिक करा.
  • ■ स्क्रीनवर एक captcha कोड दाखवला जाईल, तो टाकून Get OTP क्लिक करायचं आहे.
  • ■ सुरुवातीला बँक पासबुक फोटो अपलोड करा.
  • ■ डिजिटल सहीचा सातबारा उतारा आणि ८-अ उतारा, एकाच पीडीएफ फाईलमध्ये घेऊन अपलोड करा.
हे वाचा-  मिनी ट्रॅक्टर योजनेअंतर्गत अर्ज करण्याची स्टेप बाय स्टेप माहिती | mini tractor yojana.

अर्ज केला म्हणजे विम्यासाठी पात्र ठरलात असं होत नाही, कारण…

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ तुम्ही लाभास पात्र ठरलात असा होत नाही.

तुमच्या शेतमालाचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास तुम्हाला 72 तासांच्या आत ती माहिती विमा कंपनीला द्यायची आहे.

त्यानंतर विमा कंपनी आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष पाहणीनंतर पीक विमा योजनेच्या नियमानुसार तुम्ही लाभार्थी म्हणून पात्र आहात का हे ठरवलं जाईल आणि मगच तुम्हाला नुकसानभरपाई दिली जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment