व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे पाहण्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती पहा.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत? हे तपासण्यासाठी खालील प्रकिया करा, TAFCOP या पोर्टलला भेट द्या.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे पाहण्यासाठी सरकारची डायरेक्ट लिंक. 👇

  • सर्वप्रथम तुम्हाला https://www.sancharsaathi.gov.in/ ही लिंक ओपन करावी लागेल.
  • त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करा व कॅप्च्या भरा.
  • त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर प्रविष्ट करून OTP रिक्वेस्ट बटणावर क्लिक करावे लागेल.
  • OTP मिळाल्यानंतर तुम्हाला validate ऑप्शनवर क्लिक करावे लागेल.
  • समोर तुम्हाला तुमच्या आयडी प्रूफ आणि सक्रिय मोबाईल नंबरची यादी दिसेल.
  • दिसत असलेल्या यादीमध्ये तुम्ही सध्या वापरत असलेले मोबाईल नंबर तपासून पाहू शकता.

जे नंबर तुम्ही कधीच खरेदी केले नाहीत किंवा वापरले नाहीत असे नंबर देखील समोर दिसत असलेल्या यादीत असतील तर नक्कीच काहीतरी गडबड आहे हे समजून जा. मग नक्कीच कोणीतरी तुमची बनावट कागदपत्रे वापरुन तुमच्या नावावर मोबाईल नंबर वापरत आहे हे नक्की. मग अशावेळी घाबरुन न जाता पुढील प्रोसेस करा. आणि जे नंबर तुमच्या ओळखपत्रासमोर दिसत आहेत असे सगळे फोन नंबरचे सीमकार्ड बंद करा.

 तुम्ही वापरत नसलेले सीमकार्ड बंद करण्याची पद्धती

तुम्ही वापरत नसलेले सिम कार्ड बंद करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

  • तुम्हाला जर सिमकार्ड बंद करायचे असेल तर बॉक्समध्ये तुमचे नाव टाका, त्यानंतर खाली  Report  या बटणावर क्लिक करा.
  • Report ऑप्शनवर क्लिक केल्यावर तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिसेल. त्यामुळे कुठेतरी संदर्भ क्रमांक लिहून ठेवा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा किंवा फोटो काढा.
  • काही दिवसांनंतर, तुम्ही केलेल्या अहवालाचे तपशील पाहण्यासाठी, https://www.sancharsaathi.gov.in/  वेबसाईटवर लॉगिन करा.
  • यावेळी तुम्हाला तुमचा रिपोर्ट ट्रॅक करण्यासाठी तुमचा Ticket ID Ref No. वरती असलेल्या बॉक्समध्ये टाका.
  • नंतर तुमच्यासमोर तुमच्या रिपोर्टचा स्टेटस उघडेल. तर अशाप्रकारे न वापरलेले सिमकार्ड, तुम्ही न घेतलेले  सिमकार्ड या पोर्टलच्या माध्यमातून बंद करु शकता. तुम्हाला तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत हे सुद्धा  येथे समजू शकेल.
हे वाचा 👉  1 किलोवॅट सोलर पॅनल बसवा फक्त दहा हजार रुपये देऊन | buy 1kW solar system on EMI.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page