व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

शेतकऱ्यांनो एका रुपयात रब्बी हंगामातील पीक विमा तत्काळ भरून घ्या..


खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातील पिकांनाही एका रुपयात विमा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पंतप्रधान पीक विमा योजनेच्या (पीएमएफबीवाय) संकेतस्थळावर शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप हंगामातही शेतकऱ्यांना एका रुपयात पीक विमा मिळाला होता. रब्बी हंगामातही हाच निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होईल.

या निर्णयामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातही पीक नुकसानीपासून संरक्षण मिळेल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर सकारात्मक परिणाम होईल.

काय आहे ही योजना

2016 च्या खरीप हंगामापासून प्रधानमंत्री पिक विमा योजना राबवण्यात येत आहे सातारा राज्य सरकारने या योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि नवीन बदलांसह सर्व समावेशक पिक विमा योजना 2023-24 म्हणजे यंदाच्या खरीप हंगामापासून २०२५-२६ च्या रबी हंगामा पर्यंत लागू असणार आहे.

नवीन बदलानुसार शेतकऱ्याला आता केवळ एका रुपयांमध्ये पिक विमा उतरता येणार आहे. याशिवाय सर्व समावेशक विमा योजना नेमकं काय असणार आहे या योजनेत तुम्ही सहभागी कसे होऊ शकतात पात्रतेचे काय निकष आहेत याची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

कसा मिळेल लाभ

ही योजना सुरू होण्याआधी प्रधानमंत्री पिक विमा योजना शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दोन टक्के इतका विमा हप्ता भरावा लागायचा तर रब्बी हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या दीड टक्के हप्ता भरावा लागायचा.
म्हणजे खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामासाठी विमा संरक्षित रकमेच्या 5% इतका भरावा लागायचा आणि ही रक्कम सातशे आठशे ते हजार दोन हजार रुपयांपर्यंत प्रत्येकाला भरावी लागत होती.

हे वाचा-  लाडका शेतकरी योजना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नवीन घोषणा

आता मात्र शेतकऱ्यांना केवळ एक रुपये इतका हप्ता भरून या योजनेत सहभाग होता येणार आहे. तसेच कर्जदार शेतकरी आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली आहे म्हणजे त्यांना वाटत असेल तर ते या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत.

जे शेतकरी इतरांची शेती करायला घेतात ते सुद्धा या योजनेत सहभागी होऊ शकणार आहेत.

अर्ज कसा करायचा

रब्बी हंगामात पीक विमा घेण्यासाठी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावर जावे लागेल. या संकेतस्थळावर जाऊन शेतकऱ्यांना प्रथम रजिस्ट्रेशन करावे लागेल. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर शेतकऱ्यांना विमा भरावा लागेल. विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागेल.

पिक विमा भरण्याची अंतिम तारीख

रब्बी हंगामातील पिकांना विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना 31 जानेवारी 2024 पर्यंत विमा भरावा लागेल. विमा न भरल्यास शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळणार नाही.

पिकांची यादी

आता कोणत्या पिकांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे ते बघुयात.

हंगामपिके
खरीपभात, खरिपातील ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका, भुईमुंग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप, कांदा
रब्बीगहू, रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी हंगामातील कांदा

खरीप हंगामातील भात म्हणजेच धान, खरिपातील ज्वारी, बाजरी, नाचणी, मूग, उडीद, तुर, मका, भुईमुंग, सूर्यफूल, सोयाबीन, कापूस, खरीप, कांदा या पिकांना विमा संरक्षण देण्यात आले आहे

हे वाचा-  100 शेळ्यांसाठी आता 10 लाखापर्यंत अनुदान पहा नवीन जीआर व भरा ऑनलाईन फॉर्म

रब्बी हंगामातील गहू, रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, उन्हाळी भात, उन्हाळी हंगामातील कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण देण्यात आले आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page