नमस्कार मित्रांनो, सूर्यापासून उष्णता व प्रकाशाच्या रूपाने पृथ्वीवर येणाऱ्या ऊर्जेला सौरऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानामध्ये बदल घडत असतात. सूर्यापासून पृथ्वीला 174 पेटावॅट ऊर्जा मिळत असते त्यापैकी सुमारे 30% ऊर्जा परावर्तित होते तर 70% ऊर्जा वातावरणात शोषली जाते. आपला देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येत असल्यामुळे येथे वर्षभर स्वच्छ आणि भरपूर सूर्यप्रकाश मिळतो, त्यामुळेच येथे सौर ऊर्जा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होते.
सौर ऊर्जा हा एक अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असल्यामुळे तो कधीही न संपणारा ऊर्जा स्त्रोत आहे, यामुळेच सौर ऊर्जा ही वीज निर्मितीसाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सौर ऊर्जेच्या माध्यमातून देशातील बहुतांश विजेची गरज पूर्ण होऊ शकते. यासाठी सरकारच्या माध्यमातून विविध योजनाही राबविण्यात येत आहेत. यापैकी एक महत्त्वाची योजना म्हणजे पी एम सूर्यघर योजना. सदर योजनेचा लाभ घेऊन तुम्ही वीज बिलापासून अंशतः मुक्तता मिळवू शकता. म्हणूनच आपण सदर लेखांमध्ये पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत 2 किलोवॅट सोलर सिस्टिम साठी 60 हजार रुपयांचे अनुदान घेतल्यास तुम्हाला किती रुपये भरावे लागतील? याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहूया.
2 किलोवॅट सोलर सिस्टिम विषयी थोडक्यात..
एखाद्या कुटुंबाला विजेची गरज पूर्ण करण्यासाठी त्या कुटुंबाला त्याच्या घराच्या छतावर 2 किलो वॅट सोलर सिस्टिम बसवणे गरजेचे आहे. ज्यासाठी 200 चौरस मीटर जमिनीची आवश्यकता असते. ज्या कुटुंबाचे वीज बिल 150 ते 300 युनिट प्रतिमाह आहे त्यांच्यासाठी 2 किलोवॅट सोलर यंत्रणा एक चांगला पर्याय किलोवॅट सोलर सिस्टिम एका दिवसात 10-12 युनिट वीज तयार करते. 2 किलोवॅट सोलर सिस्टिम लहान कुटुंबाची विजेची गरज पूर्ण करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
2 किलोवॅट सोलर सिस्टीम बसवण्यासाठी सबसिडीसह किती खर्च येईल?
2 किलोवॅट म्हणजेच 2000 वॅट, 2 किलोवॅट सोलर सिस्टिम बसवण्यासाठी तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार मोनोक्रिस्टललाइन सोलर पॅनल किंवा पोलिक्रिस्टलाइन सोलर पॅनलचा वापर करू शकता. 2 किलोवॅट सोलर सिस्टिम बसवण्यासाठी तुम्हाला 250 वॅटचे 8 पॅनेल किंवा 335 वॅटचे 6 पॅनेल खरेदी करू शकता.
तुम्ही घराच्या क्षेत्रफळानुसार पॅनेलची निवड करू शकता.2 किलोवॅट सोलर सिस्टिमसाठी 150Ah च्या 2 बॅटरींची आवश्यकता असते. जर तुम्ही नवीन बॅटरी खरेदी केला तर, तुम्हाला 5 वर्षाची वॉरंटी देखील मिळते.
2 किलोवॅट सोलर सिस्टिम बसवण्यासाठी एकंदरीत 1,40,000 ते 1,60,000 रुपये खर्च येईल. परंतु एकूण खर्चामधून 60,000 रुपये अनुदान वजा केल्यास तुम्हाला केवळ 80 हजार ते 1 लाख रुपयांचा खर्च सोलर पॅनल बसवण्यासाठी येईल.
1 किलोवॅट सोलर सिस्टम बसण्यासाठी किती खर्च येईल हे पहा. 👇
वर दिलेल्या एकूण खर्चामध्ये तुम्ही ज्या कंपनीकडून 2 किलोवॅट सोलर सिस्टिम विकत घेता त्यानुसार सदरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतो. इथे आपण फक्त एक उदाहरणादाखल अंदाजे किंमत दिली आहे. वरील खर्चामध्ये तुमच्या सोलर पॅनलचे इन्स्टॉलेशन शुल्क देखील समाविष्ट असेल. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या संपूर्ण सोलर सिस्टिमची 5 वर्षाच्या वॉरंटी बरोबर सोलर पॅनलला 25 वर्षांची वॉरंटी मिळते.
2 किलोवॅट सोलर सिस्टिम मधील बॅटरी,सोलर पॅनल आणि इतर साधनांच्या किमती
2 किलोवॅट सोलर सिस्टिमची किंमत तुम्ही कोणत्या कंपनीकडून सोलर सिस्टिम खरेदी करता यावर अवलंबून असते. सोलर पॅनल आणि बॅटरींच्या किमती या वेगवेगळ्या कंपन्यांवर अवलंबून असतात. सौर यंत्रणा ही सौर पॅनल, बॅटरी, इन्वर्टर या पॅनेलच्या संरचनेने बनलेली असते. या सर्वांची किंमत ही त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.
2 किलोवॅट सोलर सिस्टिम प्लांट बसवण्यासाठी लागणारे साधने खालीलप्रमाणे:
- सौर पॅनेल-250W किंवा 335W
- पॅनेलची संख्या-250W चे 8 पॅनेल किंवा 335W चे 6 पॅनेल
- सोलर इन्व्हर्टर-3KVA
- सौर बॅटरी-150AH च्या 2 बॅटरी
- डीसी केबल-20 मीटर
- AC केबल-20 मीटर
- क्षेत्र-200 चौरस मीटर
- सोलर ॲक्सेसरीज-अर्थिंग किट, स्विमिंग टूल्स, लाइटिंग अरेस्टर
2 किलोवॅट सोलर सिस्टीम मध्ये एकूण 2 हजार वॅट क्षमतेचे मोनो किंवा पॉली सोलर पॅनल्स खरेदी करावे लागतात, याची किंमत सुमारे 70 हजार रुपये आहे. याशिवाय सोलर इन्व्हर्टर (MPPT) सुमारे 25 हजार रुपयांना तर सौर बॅटरी 30 हजार रुपयांना आणि स्टॅन्ड बसवण्यासाठी सुमारे 15 हजार रुपये खर्च येतो.
1 किलोवॅट सोलर सिस्टम बसण्यासाठी किती खर्च येईल हे पहा. 👇
ऑन-ग्रीड सोलर सिस्टिमवर किती सबसिडी मिळते?
ग्रीड सोलर सिस्टिम मध्ये इन्व्हर्टर आणि सोलर पॅनल वापरले जातात. यामध्ये बॅटरीचा वापर केला जात नाही. त्यामुळेच ऑफ-ग्रीड सोलर सिस्टिम पेक्षा ऑन-ग्रीड सोलर सिस्टिम स्वस्त आहे. त्यातच सरकार कडून सबसिडी ही दिली जाते, त्यामुळे ऑन- ग्रिड सोलर सिस्टिम बसवण्यासाठी खूप कमी खर्च येतो.
घरगुती विजेच्या वापरासाठी जे लोक सोलर सिस्टिम यंत्रणा बसवतील त्यांनाच ही अनुदान दिले 2 किलोवॅट सोलर सिस्टिमला केंद्र सरकारकडून 60,000 रुपये अनुदान मिळते. केंद्र सरकारकडून मिळणारी सबसिडी 2 महिन्यांमध्ये लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते. राज्यानुसार अनुदानाच्या रकमेमध्ये तफावत आढळून येते.
2 किलोवॅट सोलर सिस्टीमवर चालणारी उपकरणे
घरगुती विजेच्या वापरासाठी 2 किलोवॅट सोलर सिस्टिम एक उत्तम पर्याय किलोवॅट सोलर प्लांट एका महिन्यामध्ये सुमारे 300 kWh वीज निर्माण करू शकतो. या विजेवर घरातील 1AC, फ्रिज, पंखा, हीटर,10 बल्ब सहजपणे चालू शकतात. 2 किलोवॅट सोलर सिस्टीम बसवल्यामुळे तुमची वीज बिलातून अंशतः सुटका होऊन पैशाची बचत होते.
सदर लेखांमध्ये आपण 2 किलोवॅट सोलर सिस्टीम घरावर बसवण्यासाठी एकूण किती खर्च येईल व त्या खर्चातून 60 हजार रुपये अनुदान वजा केल्यास तुम्हाला सदर सोलर सिस्टिम बसवण्यासाठी किती रुपये भरावे लागतील. याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली आहे. सदर माहितीच्या आधारे तुम्ही तुमच्या घरावर 2 किलोवॅट सोलर सिस्टिम बसवून महावितरण कडून येणाऱ्या विज बिल आतून अंशतः तुमची सुटका होईल. त्याचबरोबर सौर ऊर्जा एक अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत असल्यामुळे याचा तुटवडा किंवा टंचाई कधीच भासणार नाही त्याचबरोबर यामुळे प्रदूषण ही होत नसल्यामुळे सौर ऊर्जा हा एक वीज निर्मितीसाठी चांगला पर्याय आहे. धन्यवाद!