व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

AI च्या साह्याने एका क्लिकमध्ये Remini App द्वारे फोटो कसा एडिट करावा / How to edit photo using AI with Remini app

आज आपण पाहूया, AI च्या साह्याने एका क्लिक मध्ये फोटो कसा एडिट करावा, फोटो एडिट करण्यासाठी AI संचलित रेमिनी एप्लीकेशन चा उपयोग यामध्ये करणार आहोत. रेमीनी हा एक फोटोची क्वालिटी वाढवणार एप्लीकेशन आहे. यामध्ये कोणताही आपला जुना कमी क्वालिटीचा फोटो आपल्याला थोड्या सेकंदात त्याची क्वालिटी वाढवून देतो . या आर्टिकल मध्ये आपण रेमिनी ॲप द्वारे फोटो कसा एडिट करावा याची संपूर्ण माहिती घेणार आहोत.

AI फोटो एडिटर काय आहे.

AI फोटो एडिटर ॲपच्या साह्याने म्हणजेच रेमीनी ॲपच्या साह्याने, कमी क्वालिटी चा फोटो चांगल्या क्वालिटी मध्ये कन्व्हर्ट करू शकतो. हा फोटो एडिटिंग ॲप इतर एडिटिंग ॲप पेक्षा वेगळा आहे. कारण यामध्ये फोटो एडिट करण्यासाठी आपल्याला काहीच क फीरावे लागत नाही .सर्व काही आर्टिफिशल इंटेलिजन्स च्या साह्याने ऑटोमॅटिकली फोटो एडिट होतो. इतर ॲप प्रमाणे यामध्ये फोटो क्रॉप ,फिल्टर ,ब्राईटनेस ,इफेक्ट, शाडो यासारखी यासारखे कोणतेही सेटिंग आपल्याला करावी लागत नाही. हे ॲप्लिकेशन सर्व गोष्टी गरजेनुसार एडिट करून आपल्याला फोटो एडिट करून देते. एप्लीकेशन द्वारे तुमचा फोटो फोटो स्टुडिओ सारखा तुम्ही घरच्या घरी एडिट करू शकता. या एप्लीकेशन चा उपयोग करून तुम्ही कमी वेळात चांगला फोटो एडिट करू शकता. रेमिनी ऍप द्वारे आपला फोटो व्हिडिओ एडिट करून हाय क्वालिटी मध्ये त्याचे रूपांतर करू शकतो.

हे वाचा-  10000 आतील सर्वात बेस्ट 5 फोन, तेही आकर्षक फीचर्स सोबत

Remini App चा उपयोग कसा करावा

Remini app द्वारे फोटो एडिट करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा:

 • Remini app चा उपयोग करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून रेमीनी ॲप डाऊनलोड करावा लागेल.
 • रेमीनी ॲप डाऊनलोड केल्यावर Remini appओपन करावा.
 • Remini app ओपन केल्यावर “get satrated “वर क्लिक करावे. यानंतर ‘next ‘वर क्लिक करावे.
 • यानंतर प्रोफाईल तयार करण्यासाठी नाव टाकावे लागेल.
 • यानंतर रेमीनी ॲप मध्ये तुमचे लॉगिन होईल.
 • यानंतर फोटो एडिट करण्यासाठी रेमीनी ॲप तुम्हाला परवानगी विचार तिथे ‘ok’ ऑप्शन वर क्लिक करा
 • आपल्याला जो फोटो एडिट करायचा आहे तो फोटो एडिट करण्यासाठी ‘Enhance ‘ऑप्शन वर क्लिक करावे.
 • Enhance ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर use it वरती क्लिक करावे.
 • यानंतर तुमची डायरेक्ट गॅलरी ओपन होईल . तुम्हाला जो फोटो एडिट करायचा आहे तो सिलेक्ट करा.
 • सिलेक्ट झालेला फोटो एप्लीकेशन मध्ये ओपन होईल.
 • यानंतर Edit ऑप्शन वरती क्लिक करावे.
 • यानंतर डाव्या बाजूस एक लाईन दिसेल ,जी तुमची फोटो क्वालिटी कमी जास्त करेल.
 • या लाईन द्वारे तुम्ही तुमचा फोटो गरजेप्रमाणे कमी जास्त करू शकता केल्यानंतर डाऊनलोड ऑप्शन तुम्हाला दिसेल.
 • फोटो डाउनलोड ऑप्शन वरती क्लिक करावे.
 • यानंतर एडिट फोटो डायरेक्ट गॅलरीमध्ये सेव होईल.

तर आता आपण पाहिले आहे की Remini app चा कसा वापर करावा ,तर तुम्ही याचा उपयोग करून फोटो क्वालिटी चांगली करून तुमचा वेळ देखील वाचू शकता.

हे वाचा-  चीनचा नवीन शोध, कधीही चार्जिंग न संपणारी बॅटरी, किंमत फक्त इतकीच

Remini app सुरक्षित आहे का

Remini app एक पूर्णपणे AI संचलित ॲप आहे .त्यामुळे तुमचा कोणत्याही प्रकारचा डाटा हा सेव करून घेतला जात नाही. किंवा कुणालाही शेअर केला जात नाही .तुमच्या परवानगीशिवाय यामध्ये काही केले जाऊ शकत नाही .त्यामुळे Remini app सुरक्षित एडिटिंग ॲप आहे.

Remini app free आहे का ?

हे एक free एप्लीकेशन आहे. पण यामध्ये तुम्हाला फोटो एडिट करत असताना तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट बघायला लागतात. जर तुम्हाला एड्स पाहायच्या नसतील तर ,तुम्हाला सबस्क्रीप्शन प्लॅन घ्यावा लागेल. हा महिन्यासाठी 420 रुपयांपर्यंत आहे . तुम्ही subscripation घेतल्यानंतर तुम्हाला ऍड फ्री फोटो एडिट करता येतो.

यासारखीच इतर AI फोटो एडिटिंग एप्लीकेशन

AI टॉप best 5 Photo एडिटिंग ॲप

◽Remini

◽AI Enhancer

◽photo Tune

◽Evoke

◽Facetune AI

ही फोटो एडिटिंग साठी सर्वात चांगले 5 एप्लीकेशन आहेत.

तुम्ही वर वरील सर्व गोष्टींचा रेफरन्स घेऊन तुमचा कोणताही फोटो चांगल्या पद्धतीने एडिट करू शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment