व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

बांधकाम कामगार योजना : या योजनेत कर्ज करून अनेक मोठमोठ्या योजनांचा फायदा घ्या.

महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी ‘बांधकाम कामगार योजना’ नावाची योजना सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे.

बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांना विविध प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागते. कामगार हे आर्थिकदृष्ट्या गरीब असतो व त्यामुळे त्यांच्याजवळ कुठल्याच प्रकारचे सेफ्टी किट उपलब्ध नसते व त्यांना सेफ्टी किट विकत घेणेसुद्धा शक्य नसते त्यामुळे ते कुठल्याच सेफ्टी किट शिवाय काम करत असतात व अशा वेळेस त्यांना अपघात झाल्यास अपंगत्वाचा सामान करावा लागतो किंवा काही वेळेस त्यांना स्वतःचा जीव सुद्धा गमवावा लागतो. कामगारांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने बांधकाम कामगार पेटी योजना राबविण्याचा निर्णय घेतला.

योजनेचे फायदे

  • आर्थिक मदत: बांधकाम कामगारांना प्रती वर्ष ₹5000 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
  • टूल बॉक्स आणि भांडी: कामगारांना टूल बॉक्स आणि भांडी पुरवली जातात.
  • ऑनलाइन अर्ज: कामगार घरी बसून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
  • सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही: पोर्टल ऑनलाइन उपलब्ध असल्यामुळे कामगारांना कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही.
हे वाचा-  लाडकी बहीण योजनेत उडाला गोंधळ, अनेक महिलांचे पैसे  दुसऱ्याच खात्यात जमा.

पात्रता:

  • अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा.
  • कामगार अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षांच्या दरम्यान असावे.
  • कामगाराने किमान 90 दिवस काम केले असावे.
  • कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांची नोंदणी करावी.
  • कामगाराचे नाव महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळात नोंदणी केलेले असावे
  • कामगार कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे
  • योजने अंतर्गत नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारचा पहिल्या 2 मुलांसाठी योजना लागू होईल
  • बांधकाम कामगार केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेमार्फत लाभ घेत असेल तर अशा परिस्थितीत त्या कामगाराला या योजनेच्या लाभ दिला जात नाही
  • इतर क्षेत्रातील कामगारांना या योजनेच्या लाभ दिला जात नाही.

बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत कामगारांना दिल्या जाणाऱ्या वस्तू

  1. बॅग
  2. रिफ्लेक्टर जॅकेट
  3. सेफ्टी हेल्मेट
  4. चार कप्प्याच्या जेवणाचा डबा
  5. सेफ्टी बूट
  6. सोलर टॉर्च
  7. सोलर चार्जर
  8. पाण्याची बॉटल
  9. मच्छरदाणी जाळी
  10. सेफ्टी बूट
  11. हात मोजे
  12. चटई
  13. पेटी

बांधकाम कामगार योजनेमधून मोफत भांडी मिळवण्यासाठी अर्ज करा.

शैक्षणिक योजना

  • इयत्ता 1ली ते 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 
  • इयत्ता 8वी ते 10वी च्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 
  • इयत्ता 11वी व इयत्ता 12वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य 
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य 
  • वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000/- रुपये आर्थिक सहाय्य 
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000/- रुपयांचे आर्थिक सहाय्य 
  • शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000/- रुपयाचे आर्थिक सहाय्य 
  • नोंदीत बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती 
  • बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
  • कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य 
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
  • कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण 
  • बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट 
हे वाचा-  लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व हमीपत्र डाऊनलोड करा | download ladki bahini Yojana form and hamiPatra PDF

आवश्यक कागदपत्रे:

  • आधार कार्ड झेरॉक्स
  • उत्पन्न प्रमाणपत्र
  • पत्त्याचा कोणताही पुरावा
  • वय प्रमाणपत्र
  • राशन कार्ड
  • ओळख प्रमाणपत्र
  • मोबाईल नंबर
  • 90 दिवस कामाचे प्रमाणपत्र
  • पासपोर्ट आकाराचा फोटो

अर्ज कसा करावा:

  1. महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: https://mahabocw.in/
  2. होम पेजवर, “कामगार” पर्यायावर क्लिक करा आणि नंतर “कामगार नोंदणी” पर्याय निवडा.
  3. नोंदणी फॉर्ममध्ये सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
  4. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  5. सबमिट पर्यायावर क्लिक करा.

अधिक माहितीसाठी:

  • अधिकृत वेबसाइट: https://mahabocw.in/
  • हेल्पलाइन नंबर: 1800-233-0012

बांधकाम कामगार योजनेमधून मोफत भांडी मिळवण्यासाठी अर्ज करा.

टीप:

  • योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी पात्रता निकष काळजीपूर्वक वाचा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा.
  • चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.

बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारची एक उत्तम पहल आहे. या योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

1 thought on “बांधकाम कामगार योजना : या योजनेत कर्ज करून अनेक मोठमोठ्या योजनांचा फायदा घ्या.”

  1. बांधकाम कामगार योजना ही महाराष्ट्र सरकारची एक उत्तम पहल आहे. या योजनेमुळे राज्यातील बांधकाम कामगारांना आर्थिक मदत मिळेल आणि त्यांचे जीवनमान उंचावेल. हीच आमची अपेक्षा आहे..🙏

    उत्तर

Leave a Comment