व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

व्हॉट्सॲपवरील कोणीही डिलीट केलेले मेसेज वाचण्याची सोपी पद्धत

WhatsApp आजच्या काळातील सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. यावर अनेक फिचर्स आहेत, जे वापरकर्त्यांसाठी उपयुक्त ठरतात. मात्र एक सामान्य समस्या अशी आहे की, कधी कधी कोणीतरी पाठवलेला मेसेज लगेचच डिलीट करतो आणि आपण नेमकं काय पाठवलं होतं हे कळत नाही. जर तुम्हीही या समस्येला सामोरे जात असाल तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक सोपी पद्धत आहे जी आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत.

डिलीट केलेले मेसेज कसा वाचायचा

तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉटसॲप डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. सर्वप्रथम तुमच्या फोनच्या Settings मध्ये जा. तिथं तुम्हाला Notification असा एक पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक करा आणि एडवांस सेटिंग्ज मध्ये जा. येथे तुम्हाला Notification History हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यास, तुम्हाला त्या नोटिफिकेशन्समध्ये जाऊन डिलीट केलेले सर्व मेसेज दिसू शकतात.

मात्र, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, या पर्यायाचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपच्या नोटिफिकेशन सेटिंग्जमध्ये जाऊन नोटिफिकेशन सुरु करणे आवश्यक आहे. जर Notification पर्याय बंद असेल, तर डिलीट केलेले मेसेज वाचणे शक्य होणार नाही.

WhatsApp च्या नवीन फिचरची लवकरच होणार आहे घोषणा

Whatsapp सतत आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फिचर्स आणत असते. लवकरच व्हॉटसअप एक नवीन फिचर आणणार आहे ज्यामुळे तुमच्या गोपनीयतेचं संरक्षण अधिक चांगलं होईल. Block unknown account messages या नावाने येणाऱ्या या फिचरच्या मदतीने अनोळखी व्यक्तींकडून येणारे मेसेज तुम्ही ब्लॉक करू शकता, ज्यामुळे तुमचा अकाउंट सुरक्षित राहील.

हे वाचा-  तुम्ही एटीएम, फोनपे, गुगल पे, क्रेडिट कार्डसाठी जन्मतारीख पासवर्ड म्हणून वापरत आहात का! आजच बदल करा, अन्यथा गंभीर परिणाम होऊ शकतात."

तुमच्या डिव्हाईसमध्ये ही सोपी पद्धत वापरून डिलीट झालेले मेसेज वाचू शकता आणि भविष्यात आणखी सुरक्षित राहू शकता.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment