व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 बिनव्याजी कर्ज👈  20000 तत्काळ कर्ज

PAN 2.0 : नवीन पॅन कार्ड काही मिनिटात येईल तुमच्या ईमेलवर; फॉलो करा ‘ही’ सोपी प्रोसेस

पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे सरकारी कागदपत्र आहे. आर्थिक व्यवहाराशी संबंधित कोणतेही काम करताना पॅन कार्ड उपयोगी येते. मोठ्या आर्थिक व्यवहार करताना, बँकेतून पैसे काढताना, शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुमच्याकडे पॅन कार्ड असणे गरजेचे आहे. पॅन कार्ड चा उपयोग ओळखपत्र म्हणून देखील केला जातो. त्यामुळे आधार कार्ड प्रमाणेच तुमच्याकडे पॅन कार्ड असणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्याकडे पॅन कार्ड नसल्यास काही काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी सहज बसल्या काही मिनिटात पॅन कार्ड साठी अर्ज करू शकता. पॅन कार्ड च्या रजिस्ट्रेशन ची प्रक्रिया खूपच सोपी आहे याविषयी आपण या लेखात सविस्तर माहिती जाणून घेऊया.

पॅन कार्ड म्हणजे काय?

PAN(permanent account number): परमनंट अकाउंट नंबर इन्कम टॅक्स विभागाकडून जारी केले जातात. हे मुख्यतः आर्थिक कामासाठी वापरले जाते. जसे की इन्कम टॅक्स भरणे, बँक खाते उघडणे किंवा प्रॉपर्टी खरेदी करणे. पॅन कार्ड हा दहा अंकी क्रमांक असतो ज्यामध्ये तुमच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित सर्व माहिती नोंदवली जाते. यात तुमच्या गुंतवणुकीशी संबंधित संपूर्ण माहिती ही असते.

PAN 2.0 ची वैशिष्ट्ये:

1. आधार क्रमांकावर आधारित इलेक्ट्रॉनिक केवायसी वापरून काही मिनिटात PAN क्रमांक मिळू शकतो.

2. कोणतेही शारीरिक दस्ताऐवज जमा करण्याची गरज नाही.

हे वाचा-  तुमचा देखील एफडी करण्याचा प्लॅन आहे का? तर वाचा देशातील महत्त्वांच्या बँकातील एफडी चा कालावधी व त्यानुसार मिळणाऱ्या व्याजदर

3. अर्जाची स्थिती आणि ऑनलाईन इतर सेवा तपासता येतात.

4. अर्जदाराला त्वरित पीडीएफ स्वरूपात उपलब्ध होते.

5. डेटाचे संरक्षण केले जाते आधुनिक सायबर सुरक्षा तंत्रज्ञान वापरून.

पॅन कार्ड बनवण्याची प्रोसेस काय?

तुमच्या जवळच्या पॅन सेवा एजन्सीला भेट द्या.

नवीन कार्ड बनवण्यासाठी तिथे अर्ज करा.

ओटीपी पडताळणीसाठी मोबाईल नंबर द्या.

नाव,आधार क्रमांक आणि वैयक्तिक माहिती बरोबर आहे का नाही हे चेक करून  द्या.

eKYC किंवा स्कॅन आधारित यामधील पर्याय निवडा.

प्रत्यक्ष पॅन कार्ड साठी 107 रुपये द्यावे लागतील.

ePAN कार्डसाठी 72 रुपये शुल्क आकारले जाईल.

पॅन कार्ड पेमेंट केल्यानंतर ई केवायसी प्रमाणिकरण होईल.

इकेवायसी प्रमाणिकरण नंतर कागदपत्रे अपलोड करा.

मोबाईल वर मिळालेला ओटीपी टाका आणि सबमिट करा.

यानंतर तुम्हाला अक्नॉलेजमेंट क्रमांक मिळेल. याद्वारे तुम्ही तुमच्या पॅन कार्ड चे स्टेटस ऑनलाइन चेक करू शकता.

नव्या पॅन कार्डचा काय फायदा होणार?

PAN 2.0 प्रकल्प उपक्रमासह सरकार जलद सेवा आणि कार्यक्षमतेसह करदातांच्या अनुभवात सुधारणा करु इच्छित आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून करदात्यांची नोंदणी आणि सेवा आता जलद प्रक्रियेसाठी सहज उपलब्ध होणार आहेत. याशिवाय नवीन 2.0 सर्व प्रणालीमध्ये इंटिग्रेटेड इन्फॉर्मेशन साठी सिंगल सोर्स म्हणून काम करेल. तसेच हे पेपरलेस सिस्टीम असल्याने नवीन PAN 2.0 कॉस्ट ऑप्टिमाइज्ड इन्फ्रास्ट्रक्चर ऑफर करेल जे इकोफ्रेंडली देखील आहे

हे वाचा-  Aadhar card: आधार मध्ये मोफत अपडेट मिळण्यासाठी फक्त बारा दिवस उरले आहेत ताबडतोब मोफत सेवेचा लाभ घ्या.

हे लक्षात घ्या

पॅन क्रमांक दहा अंकी अल्फान्यूमरिक ओळखीचा पुरावा असून तो आयकर विभागाकडून जारी केला जातो. पॅन क्रमांक द्वारे आयकर विभाग कोणत्याही व्यक्तीच्या ऑनलाईन किंवा आर्थिक व्यवहारांवर नजर ठेवतो.

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, नवे पॅन कार्ड लागू झाल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन क्रमांक बदलण्याची गरज नाही. तुमचे सध्याचे पॅन कार्ड अवैद्य ठरणार नाही. तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला नवीन नवीन पॅन कार्ड मिळेल. नवीन पॅन कार्ड मध्ये कोणत्या नवीन सुविधा मिळतील? असा प्रश्न पडला असेल तर त्याचे उत्तरही अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

नवीन कार्ड मध्ये क्यूआर कोड सारख्या सुविधा असणार आहेत. तसेच तुम्हाला तुमचे बॅनर करण्यासाठी पूर्णपणे पैसे देण्याचे गरज  नाही. त्यांचे पब्लिकेशन पूर्णपणे मोफत असेल आणि ती तुम्ही ऑर्डर केल्यानंतर तुमच्या घरापर्यंत डिलिव्हर केले जाईल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page