व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म व हमीपत्र pdf स्वरूपात डाउनलोड करा. हमीपत्र डाऊनलोड करा. | Ladki bahan Yojana form hamipatra PDF

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘माझी लाडकी बहिण’ या योजनेची घोषणा केली. या योजनेच्या घोषणेनंतर राज्यातील योजना पात्र महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 1 जुले 2024 पासून या योजनेसाठी अर्ज नोंदणी सुरु झाली असून ठिकठिकाणी सेतू केंद्रांवर आणि अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून योजनेचा अर्ज अर्जदार महिलांकडून भरुन घेतला जात आहे. असे असताना अजूनही काही महिला आहेत ज्यांनी या योजनेसाठी अर्ज केलेला नाही. त्यांच्यासाठी आम्ही हा ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा अर्ज आणि हमीपत्र घेऊन आलो आहोत.  आमच्या लेखाच्या माध्यमातून तुम्ही अर्ज आणि हमीपत्र डाऊनलोड देखील करु शकणार आहात.

कोणकोणत्या गोष्टी अर्जात नमूद करण्यात आल्या आहेत?

महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहिण या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी शासनाने अर्ज जाहीर केला आहे. या अर्जामध्ये सर्वप्रथम अर्जदार महिलेचे नाव विचारण्यात आले आहे. त्यानंतर लग्नापुर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव. जन्मतारीख, अर्जदार महिलेचा संपूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक या सर्व गोष्टी नमूद करणे अपेक्षित आहे.

या अर्जामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न विचारण्यात आलाय तो म्हणजे, कोणत्या शासकीय योजनेचा संबंधित महिला लाभ घेत आहे का? असेल तर अर्जामध्ये हो  असे उत्तर  लिहावे लागेल.  अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दलही महिलांना माहिती देणे बंधनकारक आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form

हे वाचा-  चुंबकाचा वापर करून वीज चोरी करता येते का पहा | Magnet on electricity meter

लाडकी बहीण योजनेचा अर्ज व हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.👇

अर्जदार महिलेच्या बँकेचा तपशील

अर्जामध्ये  महिलेच्या बँक खात्याची संपूर्ण माहिती आणि बँक खाते क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे. बँक अकाऊंट आधारकार्डशी लिंक करण्यात आले आहे की नाही? हे देखील अर्जात विचारण्यात आले आहे. Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana form

अर्ज कोणाकडून तपासून घ्यायचा आहे?

लाडकी बहिण योजनेचा भरलेला अर्ज अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, सेतू सुविधा केंद्र यापैकी कोणाकडूनही  तपासून घेतला जाऊ शकतो. तसेच यापैकी कोणाकडून अर्ज तपासून घेतला आहे हे अर्जात नमूद करणे आवश्यक आहे.

लाडकी बहीण योजना अर्ज डाऊनलोड करा.

Ladki bahin yojana हमीपत्र pdf download

खालील लिंकवर क्लिक करुन तुम्ही माजी लाडकी बहिण योजनेचा अर्ज डाऊनलोड करु शकता. हा अर्ज भरुन वर सांगितल्याप्राणे सेतू केंद्रात सबमीट करावा. त्यासोबत पुढे सांगितल्या प्रमाणे आवश्यक कागदपत्रे जोडावीत.

Hamipatra in marathi| Hamipatra ladki bahin

अर्ज करण्यासाठी ही कागदपत्रे आवश्यक

  • अर्जदार महिलेचे आधार कार्ड
  • अर्जदार महिलेचे अधिवास\जन्म प्रमाणपत्र
  • अर्जदार महिलेच्या उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • अर्जदार महिलेचे हमीपत्र
  • अर्जदार महिलेचे  बॅंक पासबुक
  • अर्जदार महिलेचा फोटो

भरलेला अर्ज येथे जमा करा

अर्जदार महिलेने ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी भरलेला अर्ज नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर जमा करायचा आहे. तसेच सेतू सुविधा केंद्रावरही हा अर्ज जमा करता येईल. यासाठी राज्यभर सेतू केंद्रांवर महिलांची गर्दी पहायला मिळत आहे. इतकेच नाही तर उत्पन्नाचे प्रमाणपत्र काढण्यासाठीही शासकीय कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्याचे बघायला मिळत आहे.

हे वाचा-  लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधना दिवशी नाही, तर या तारखेला जमा होणार |ladki bahin yojana installment

माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र PDF डाउनलोड / Mazi Ladki Bahin Yojana Hamipatra PDF Download

माझी लाडकी बहिन योजना हमी पत्र PDF डाउनलोड करा

माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र PDF डाउनलोड करा: माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र PDF डाउनलोड करण्यासाठी मी खाली दिलेली थेट लिंक तुम्ही या लिंकवरून माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि त्याची प्रिंट काढू शकता.

माझी लाडकी बहिन योजना हमीपत्र मध्ये लिहिलेल्या अटी PDF डाउनलोड करा

  • मी जाहीर करतो की…
  • माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपेक्षा जास्त नाही.
  • माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकरदाता नाही.
  • मी किंवा माझे कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत नाही किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/स्थानिक संस्थेमध्ये निवृत्तीनंतर पेन्शन घेत नाही.
  • मला शासनाच्या इतर काही विभागाकडून कार्यान्वित केलेली रु. 1,500/- पेक्षा जास्त किमतीच्या कोणत्याही आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य सध्याचे किंवा माजी खासदार/आमदार नाहीत.
  • माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड/कॉर्पोरेशन/बोर्ड/उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य नाहीत.

माझी लाडकी बहीण योजना हमीपत्र pdf download

सेतू केंद्र महिलांकडून फी आकारु शकत नाही

अर्ज तपासून सबमीट करण्यासाठी सेतू केंद्र किंवा तहसिलदार कार्यालयात महिलांकडून कोणत्याही प्रकारीच फी आकारली जाणार नाही. फॉर्म भरण्यासाठी किंवा तपासून देण्यासाठी शासनाने नेमून दिलेले कर्मचारी अर्जदार महिलांकडून कोणत्याही प्रकारे पैसे मागत असतील तर त्याची तक्रार तत्काळ करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश गृहमंत्रालयाला दिले आहेत. सेतू केंद्रातून अर्जदार महिलांकडून पैशांची मागणी झाल्यास सेतू केंद्रांचे परवाने रद्द केला जाणार आहेत. शासन या कामासाठी प्रत्येक अर्जामागे 50 रुपये कर्मचाऱ्यांना देत आहे. या व्यतिरिक्त अर्ज भरण्याची, तपासण्याची जबाबदारी दिलेले अधिकारी, कर्मचारी तुमच्याकडे पैसे मागत असतील तर तुम्ही तत्काळ त्यांच्या विरोधात तक्रार करणे गरजेचे आहे.

हे वाचा-  १८८० पासूनचे जुने सातबारे फेरफार व खाते उतारे मोबाईल वर पहा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment