व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

पीएम किसान सन्माननिधी योजना| पीएम किसान चा 19 वा हप्ता या तारखेला जमा होणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये.. पहा संपूर्ण माहिती!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

नमस्कार मित्रांनो, आपण सदर लेखांमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पती-पत्नी दोघेही लाभ घेऊ शकतात का? त्याचबरोबर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पाहूया तुम्हाला पडलेल्या या दोन प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूया.

शेतकऱ्यांना फुकट वापरायला मिळणार 60000 रुपये., लवकरात लवकर खाली क्लिक करा.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेविषयी थोडक्यात..

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना संपूर्ण देशामध्ये एक डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. या योजनेअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांची आर्थिक मदत केंद्र सरकारकडून दिली जाते. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष 4 महिन्यांच्या अंतराने 2 हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जातात.

केंद्र सरकारने सुरुवातीला 2 हेक्‍टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा समावेश या योजनेमध्ये केला होता. पण, नंतर पीएम किसान सन्माननिधी योजनेची व्याप्ती वाढवून देशातील सर्व शेतकऱ्यांचा म्हणजेच शेतकऱ्याकडे किती जमीन आहे याचा विचार न करता सरसकट सगळ्याच शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला.

पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी काही व्यक्तींना वगळण्यात आले आहे. यामध्ये घटनात्मक पदावरील व्यक्ती (राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश इ.) आजी-माजी लोकप्रतिनिधी (आमदार, खासदार, महापौर) आजी-माजी सरकारी कर्मचारी, आयकर भरणाऱ्या व्यक्ती, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील, सनदी लेखापाल, वास्तूरचनाकार यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

हे वाचा 👉  राज्य शासनाच्या महसूल विभागाकडून तब्बल 50 वर्षानंतर ७/१२ उताऱ्यात करण्यात आले 11 बदल.. जाणून घ्या काय आहेत हे बदल!|Satbara Utara New updates 2025

पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी नाव नोंदणी करायची असेल तर त्यासाठी केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तीन पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. ते पर्याय खालीलप्रमाणे:

  • पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नाव नोंदणी करण्यासाठी शेतकरी सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गावातील गाव कामगार तलाठी कार्यालयात जमा करू शकतो.
  • पी एम किसान सन्मान निधी योजनेसाठी CSC म्हणजेच कॉमन सर्विस सेंटर मध्ये जाऊन शेतकरी नाव नोंदणी करू शकतो. या सेंटरमध्ये नाव नोंदणी करायचे असल्यास शेतकऱ्याला ठराविक शुल्क द्यावे लागते.
  • शेतकरी स्वतः PM Kisan पोर्टल वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने या योजनेसाठी नाव नोंदणी करू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्याला त्याच्या माहितीमध्ये काही बदल करायचे असल्यास ते बदल या पोर्टलवरून करता येतात.👉🏽 https://pmkisan.gov.in/

वर दिलेल्या 3 पर्यायांपैकी एक पर्याय निवडून तुम्ही पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करू शकता.

शेतकऱ्यांना फुकट वापरायला मिळणार 60000 रुपये., लवकरात लवकर खाली क्लिक करा.

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता कधी मिळणार?

देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. परंतु, आजही देशातील बहुसंख्य शेतकरी आर्थिक दृष्ट्या खूपच कमकुवत असून त्यांच्या राहणीमानाचा दर्जा खूपच खालावलेला आहे. म्हणूनच केंद्र सरकार या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी त्याचबरोबर त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी ही योजना युद्ध पातळीवर राबवत आहे. पीएम किसान सन्माननिधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील सर्व शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांची आर्थिक मदत 3 हप्त्यांमध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यामध्ये जमा करते.

हे वाचा 👉  Satbara boja now Online: वारस नोंदी, बोजा चढविणे किंवा कमी करणे, मयताचे नाव कमी करणे आता ऑनलाईन.

5 ऑक्टोंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील वाशिम जिल्ह्यातून या योजनेचा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वितरित केला. आता शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हत्याची आतुरता लागली आहे.

विश्वसनीय सूत्राकडून असे सांगितले जात आहे की, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता पुढील वर्षी म्हणजेच 21 फेब्रुवारी 2025 ला देशातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो. सरकार लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा करू शकते.

पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ पती-पत्नी घेऊ शकतात का?

पीएम किसान सन्माननिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की, शेतकऱ्यांसोबत त्यांच्या पत्नीलाही या योजनेचा लाभ घेता येईल का? तर पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा देशातील सर्व शेतकरी म्हणजेच यामध्ये महिला, पुरुष यांचा समावेश आहे. त्याचबरोबर ज्याच्या नावे शेतजमीन आहे त्या सर्वांना या योजनेचा लाभ घेता येतो. उदाहरणार्थ जर कुटुंबाची जमीन 5 एकर असेल, त्यामधील 2.5 एकर जमीन स्वतंत्रपणे पतीच्या नावावर व 2.5 एकर जमीन स्वतंत्रपणे पत्नीच्या नावावर असेल तर, दोघांनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येतो. म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता स्वतंत्रपणे पती व पत्नीच्या नावावर बँक खात्यामध्ये केंद्र सरकारमार्फत जमा केला जातो.

सदर लेखामध्ये आपण किसान सन्मान निधी योजनेचा 19 वा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार आहे? त्याचबरोबर पती-पत्नी यांना सदर योजनेचा लाभ घेता येतो की नाही? याविषयीची  माहिती आपण पाहिली आहे. धन्यवाद!

हे वाचा 👉  लाडकी बहीण योजनेचे पैसे रक्षाबंधना दिवशी नाही, तर या तारखेला जमा होणार |ladki bahin yojana installment

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page