नमस्कार, महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागातर्फे राज्यामध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस पदांसाठी 18,882 पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या संदर्भातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे. महिला व बाल विकास विभागातर्फे घेण्यात येणारी ही भरती प्रक्रिया खूप मोठी आहे. यामध्ये अंगणवाडी सेविका या पदासाठी 5,639 पदे तर अंगणवाडी मदतनीस पदांसाठी 13,243 पदे असणार आहेत. सदरची भरती प्रक्रिया ही सदर लेखांमध्ये आपण या भरती प्रक्रियेची संपूर्ण माहिती पाहूया.
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठीच्या नियम व अटी
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी च्या नियम व अटी काय आहेत? हे आपण खाली सविस्तरपणे पाहूया:
- अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. याबाबतची माहिती आपण खाली पाहणारच आहोत.
- सदर पदासाठीच्या भरतीचा विहित नमुन्यातील अर्ज व त्यातील सर्व माहिती उमेदवारांनी कागदपत्रांच्या आधारे भरणे आवश्यक आहे. जर का, सदरचा अर्ज अपूर्ण माहिती लिहिलेला असेल तर तो अर्ज रद्द करण्यात येईल.
- अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण (राज्य शिक्षण मंडळ अथवा त्यास समकक्ष) असणे आवश्यक आहे. या शैक्षणिक अर्हते पैकी किमान एक अर्हता मराठी भाषा विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार 12 वी पेक्षा जास्त पदवी किंवा पदव्युत्तर शैक्षणिक अर्हता धारण करत असेल तर, याबाबतची गुणपत्रक व प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहील.
- ज्या अंगणवाडी केंद्रासाठी उमेदवाराची निवड केली जाणार आहे अशा अंगणवाडीमध्ये 50% पेक्षा जास्त मुले मराठी भाषा व्यतिरिक्त इतर भाषा बोलणारे असतील तर तेथील अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदावर सदर भाषेचे ज्ञान असलेल्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात येईल.
- अंगणवाडी भरती प्रक्रियेसाठी वयोमर्यादा ही 18/2/2025 रोजी किमान 18 व कमाल 35 वर्ष राहील. विधवा उमेदवारांसाठी ही वयोमर्यादा कमाल 40 वर्ष राहील.
- अर्जदार महिला ही स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. सदरची महिला फक्त संबंधित ग्रामपंचायत नव्हे तर महसुली गाव/वाडी/तांडा/वस्ती येथील स्थानिक रहिवाशी असावी.
- अंगणवाडी भरती पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना लहान कुटुंबाची पट लागू राहील. लहान कुटुंब याचा अर्थ उमेदवारास जास्तीत जास्त दोन हयात आपत्ती असावीत. दोन पेक्षा अधिक आहेत अपत्य असतील तर सदरचा उमेदवार या भरतीसाठी अपात्र असणार आहे. अर्जासोबत उमेदवारास लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अंगणवाडी सेविका/मदतनीस पदावर अंतिम निवड झाल्यास उमेदवार जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लाभाचे पद भूषवीत असेल तर, पदाचा राजीनामा द्यावा लागेल.
- अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी अर्ज स्वीकारणे विहित नमुन्यातील परिपूर्ण भरलेला अर्ज निश्चित केलेल्या कालावधीत कार्यालयीन वेळेत (सार्वजनिक/शासकीय सुट्टीचे दिवस) स्वीकारले जातील.
- अर्जासोबत उमेदवारांची शैक्षणिक अर्हता व इतर आवश्यक कागदपत्रे ही स्वतः साक्षांकित किंवा सक्षम प्राधिकारी यांच्याकडून प्रमाणित किंवा साक्षांकित केलेले असणे आवश्यक राहील.
- सदरच्या पद भरती संदर्भात अंतिम निवडीपूर्वी संबंधित शासनाकडून निवडीच्या निकषांमध्ये वेळोवेळी केलेले बदल, सुधारणा उमेदवारावर बंधनकारक राहतील. पदभरती संदर्भात काही समस्या किंवा अडचणी निर्माण झाल्यास त्याबाबत शासन निर्देशानुसार अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- अंगणवाडी सेविका/मदतनीस पदासाठी अर्ज दाखल करतेवेळी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांचा व प्रमाणपत्रांचा विचार केला जाईल. त्या आधारित शैक्षणिक व इतर अर्हतेचे गुणांकन ग्राह्य धरले जाईल त्यानुसारच गुणांकन यादी तयार केली जाईल.
- अर्ज करण्याच्या अंतिम तारखेनंतर कोणतेही कागदपत्र स्वीकारले जाणार नाही व त्याचा विचार देखील केला जाणार नाही. 14 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात मुख्य सेविका पदासाठी ही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
- अंगणवाडी सेविका/मदतनीस यांची भरती प्रक्रिया राबवण्यात ऐनवेळी काही अडचणी निर्माण झाल्यास याबाबत रिक्त पदे भरणे अथवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी राखून ठेवलेला आहे. त्यांची संख्या कमी किंवा अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- सदर अर्जामध्ये उमेदवारांनी दिलेली माहिती खोटी किंवा चुकीचे आढळून आल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.
- विधवा व अनाथ उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांचे मितवा व अनाथ प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील.
- अंगणवाडी सेविका/मदतनीस हे पद मानधनी तत्वावर असल्याने शासनाचे लागू असलेले कोणतेही लाभ (वेतन, भत्ते, निवृत्तीवेतन इ.) या पदास लागू राहणार नाहीत.
- अंगणवाडीच्या अनुभव प्रमाणपत्रासाठी फक्त बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेच प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल.
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी आवश्यक कागदपत्रे
राज्यातील अंगणवाड्यांमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. जर तुम्ही सदर पदांसाठी इच्छुक असाल तर तुम्हाला अर्जासोबत काही कागदपत्रांची साक्षांकित सत्य प्रतिसह पूर्तता करणे आवश्यक आहे. सदरची कागदपत्रे कोणती आहेत ते आपण खाली पाहूया:
- तहसील कार्यालयाचे रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य)
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
- सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- सक्षम प्राधिकारी यांचे विधवा महिलांसाठी विधवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शासकीय/अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदारांच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- शैक्षणिक अर्हता/पात्रता प्रमाणपत्र, गुणपत्रके अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित (Self Attested) केलेली जोडणे बंधनकारक आहे.
- अंगणवाडी सेविका व मदतनीस या पदासाठी किमान 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- उमेदवार हा पदवी/पदव्युत्तर असेल तर त्याबाबतचे गुणपत्रक व प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे.
- डी.एड. पदविका, बी.एड. पदविका असल्यास त्याचे गुणपत्रक व प्रमाणपत्र
- उमेदवार MSCIT उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र
- अंगणवाडी सेविका/अंगणवाडी मदतनीस/मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- आधार कार्ड
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी अर्ज कसा करायचा?
अंगणवाडी सेविका व मदतनीस पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागतो. सदर भरती प्रक्रियेचा अर्ज नमुना संबंधित जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध असू शकतात. महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभाग अधिकृत संकेतस्थळ:👇🏼👇🏼 https://womenchild.maharashtra.gov.in/
- महाराष्ट्र राज्य महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेच्या अर्जाचा नमुना मिळवू शकता.
- अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये सादर करा.
सदर लेखांमध्ये आपण महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभागामार्फत राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी तब्बल 18,882 पदांची भरती होणार आहे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण पाहिली आहे. वरील माहितीच्या आधारे तुम्ही या पदासाठी दिलेल्या अटी व शर्ती मध्ये पात्र होत असाल तर अर्ज करून तुम्हाला नोकरी मिळवण्याची एक मोठी संधी आहे. धन्यवाद!