व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
DBT योजना पशु योजना कर्ज योजना सबसिडी योजना शेती योजना

लाडकी बहीण योजना बंद? अजित पवार यांच्या घोषणेमुळे राज्यात खळबळ!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Mazi Ladki Bahin Yojana : राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला भरघोस प्रतिसादत मिळत आहे. राज्यभरात लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठा अर्ज दाखल केले आहेत. लवकरच या योजनेसाठी अर्ज भरलेल्या महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी अधिवेशनात  मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. तसेच महिलांना या योजनेचा लाभ घेण्याचे अवाहन केले आहे. आता अजित पवारांनीच लाडकी बहीण योजना बंद पडेल असे वक्तव्य केले आहे. अजित पवार यांनी असं वक्तव्य का केले जाणून घेऊया. 

योजना बंद करण्याचा निर्णय आणि कारणे

अजित पवार यांच्या ताज्या घोषणेनुसार, ‘लाडकी बहीण योजना’ तात्पुरती थांबवली जाणार आहे. यामागची प्रमुख कारणे पुढीलप्रमाणे आहेत:

1. आर्थिक भार: ₹46,000 कोटींच्या निधीमुळे इतर महत्त्वाच्या प्रकल्पांवर आर्थिक परिणाम होत आहे.

2. नियमांचे उल्लंघन: काही अपात्र महिलांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे आढळून आले.

3. राजकीय दबाव: काही विरोधी पक्षांनी योजनेच्या स्थायित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

4. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फेरआढावा: आगामी निवडणुका लक्षात घेऊन सरकारला आर्थिक नियोजन पुन्हा करायचे आहे.

भविष्यातील पर्याय आणि सुधारित योजना

योजना बंद होण्याची शक्यता असली तरी अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे की, “आर्थिक स्थिती सुधारली की योजना नव्या स्वरूपात येऊ शकते.”

हे वाचा ????  Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score check; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?

सुधारित योजनांमध्ये काय बदल होऊ शकतात?

1. फक्त गरीब आणि गरजू महिलांसाठी योजना मर्यादित होऊ शकते.

2. लाभार्थ्यांची काटेकोर पडताळणी केली जाऊ शकते.

3. महिला सशक्तीकरणासाठी नवीन पर्यायी योजना आणल्या जाऊ शकतात.

4. योजनेचा निधी आणखी प्रभावीपणे वापरण्यासाठी आर्थिक नियोजन होऊ शकते.

अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा 7500 रुपयांचा हप्ता मिळाला 

आधी या योजनेच्या व्यवहार्यतेवर आणि नंतर त्याच्या अंमलबजावणीवर विरोधकांनी सातत्याने विरोध केला होता. ही योजना अंमलात आल्यानंतर आता पैसे येत असले तरी निवडणुकीनंतर ही योजना बंद केली जाईल, असे विरोधक पसरवताय. लाडकी बहीण योजनेबद्दल सांगताना अजितदादा म्हणाले की, महिलांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी छोटे व्यवसाय सुरू करण्यासाठी पैशांचा वापर केला आहे. दुसऱ्या एका घटनेत एका महिलेने दोन महिन्यांचा हप्ता आणि स्वत:च्या बचतीतून शिवणयंत्र विकत घेतले आहे. राज्यभरात अशा अनेक महिलांच्या यशोगाथा समोर येत असल्याचे त्यांनी अधोरेखीत केले. अडीच कोटींहून अधिक महिलांना पाच महिन्यांचा एकूण 7500 रुपयांचा हप्ता मिळाला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. 

माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो की ही योजना बंद होऊ देणार नाही

राज्याचे अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली होती. यासाठी 46 हजार कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. या योजनेअंतर्गत सरकार महिलांना 1500 रुपये देते. विरोधी पक्षातील अनेकांनी ही योजना बंद केल्याचा दावा केला असला तरी तुम्ही माझ्या मनगटावर बांधलेल्या प्रत्येक राखीची मी शपथ घेतो. मी ही योजना कधीही बंद होऊ देणार नाही, असे अजित पवार म्हणाले. निवडणुकीनंतर महायुती सरकारकडून योजनेच्या निधीत वाढ करण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. महिलांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानत अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील माझ्या बहिणी आगामी निवडणुकीत ही योजना संपवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देतील.

हे वाचा ????  घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: राज्य सरकारकडून पाच ब्रास मोफत वाळू, सरकारची घोषणा.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page