व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Aadhaar card ATM: डेबिट कार्ड नसल्यास आता आधार कार्ड वर मिळणार पैसे, घरबसल्या मिळेल कॅश, जाणून घ्या कसे.

 

Aadhaar ATM: घरात असताना तुम्हाला अचानक रोख किंवा कॅशची गरज भासली आणि ATM (एटीएम) मधून पैसे काढण्यासाठी वेळ नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आधार एटीएम सेवेद्वारे म्हणजे आधार सक्षम पेमेंट सर्व्हिस (AePS) द्वारे घरी बसल्या तुम्हाला कॅश मिळू शकेल. होय, आधार एटीएमद्वारे तुम्ही घरबसल्या सहज पैसे काढू शकता. याबद्दल तपशीलवार जाणून घेऊया…

आजच्या वेगाने धावणाऱ्या विश्वात बँक किंवा एटीएममध्ये जाण्यासाठी विशेषत: जेव्हा आपल्याला ताबडतोब कॅशची गरज असते तेव्हा वेळ काढणे कठीण होऊन बसते. ग्राहकांची हीच गरज लक्षात घेऊन इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकने (IPPB) एक सोयीस्कर सेवा सुरू केली आहे ज्याला ऑनलाइन आधार एटीएम सेवा म्हटले जात असून यामुळे आता बॅक अकाउंटमधून कॅश काढण्यासाठी एटीएमला वारंवार जाण्याच्या समस्येतून ग्राहकांची सुटका होणार आहे. होय, आता पैसे काढण्यासाठी ग्राहकांना एटीएममध्ये जाण्याची गरज नाही, त्याऐवजी कॅश तुमच्या घरी पोहचेल. ऐकायला विचित्र वाटत असेल पण हे शक्य आहे.

हे वाचा-  घरबसल्या मोबाईल वरील वेबसाईटवरून नवीन मतदान कार्ड काढा |apply for new voter id .

इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधेचा वापर करून बँक किंवा एटीएममध्ये न जाता घरपोच रोख रक्कम मिळू शकते. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या आधार एटीएम सेवेद्वारे म्हणजेच आधार सक्षम पेमेंट सर्व्हिस (AePS) द्वारे तुम्ही घरबसल्या रोख रक्कम मिळवू शकता. भारतीय पोस्टाचा पोस्टमन स्वतः तुमच्या घरी पैसे पोहोचवेल.

हे ॲप घ्या, मागेल तेवढे पैसे मिळतील. वाचा सविस्तर माहिती.

आधार इनेबल पेमेंट सेवा म्हणजे काय?
बँक आणि एटीएममधून पैसे काढण्याची पद्धत आता जुनी झाली आहे. AEPS एक क्रांतिकारी पेमेंट प्रणाली आहे जी ग्राहकांना आधार क्रमांक आणि बायोमेट्रिक डेटा तुमच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात मूलभूत व्यवहारांसाठी वापरण्याची सुविधा उपलब्ध करून देते. म्हणजे याद्वारे तुम्ही बँक शाखा किंवा एटीएमला प्रत्यक्ष भेट न देता रोख पैसे काढू शकता, खात्यातील शिल्लकबाबत माहिती घेण्याबरोबर आणखी बरंच काही करू शकता.

बिझनेस करस्पॉन्डंटची भूमिका काय आहे?
बिझनेस करस्पॉन्डंट्स किंवा बीसी कोणत्याही बँक ग्राहकासाठी या सेवा सुलभ करण्यासाठी मायक्रोएटीएमने सुसज्ज बँक एजंट म्हणून काम करतील. सर्वांसाठी बँकिंग सुलभ करण्यासाठी, विशेषतः दुर्गम भागात, बीसी सेवा महत्त्वाची असेल.

  • पैसे काढणे
  • शिल्लकची चौकशी करणे
  • मिनी स्टेटमेंट
  • आधार टू आधार पैसे ट्रान्सफर (हस्तांतरण) करणे

लक्षात घ्या की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या AEPS सुविधेचा लाभ घ्यासाठी ग्राहकांनी सहभागी बँकेत खाते उघडले पाहिजे. तसेच आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्याशी लिंक केलेल्याची खात्री करावी लागेल आणि बायोमेट्रिक डेटाचा वापर करून व्यवहार प्रमाणित केले जाऊ शकतात.

हे वाचा-  मोबाईल वरून वारसांची नोंद करा ऑनलाईन | सातबार्यावर वारसाची नोंद करा

हे ॲप घ्या, मागेल तेवढे पैसे मिळतील. वाचा सविस्तर माहिती.


AEPS सुविधेद्वारे पैसे काढण्याचे नियम आणि मर्यादा
चुकीचे आधार तपशील प्रविष्ट केले आहे किंवा चुकीची बँक निवडल्यास व्यवहार नाकारला जाईल. अशा स्थितीत, ग्राहकांना व्यवहारासाठी योग्य बँकेची निवड करणे अनिवार्य आहे आणि रक्कम फक्त प्राथमिक खात्यातून डेबिट केली जाईल. यासाठी तुम्हाला सोबत आधार कार्डही ठेवायची गरज नाही पण आधार-बँक खाते लिंक असणे आवश्यक असून मायक्रोएटीएम आणि एसएमएस अलर्टद्वारे ग्राहकांना यशस्वी व्यवहाराबद्दल माहिती दिली जाईल.

IPPB ॲक्सेस पॉइंटवर किंवा दारापाशी सेवांसाठी व्यवहार शुल्क आकारत नाही. परंतु डोअरस्टेप सेवा शुल्क भरावे लागेल. एनपीसीआयने प्रति AEPS व्यवहाराची कमाल मर्यादा १० हजार रुपये निश्चित केली आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment