व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

शेतकऱ्यांना फवारणी पंपावर मिळत आहे 100% अनुदान | लवकर करा अर्ज

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने महाडीबीटीच्या अंतर्गत मोफत फवारणी पंपाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेसाठी फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट होती. पण ती आता वाढवून 26 ऑगस्ट करण्यात आलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. या योजनेअंतर्गत फवारणी पंप हा 100% अनुदानावर सरकारमार्फत दिला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत तुम्ही महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टल वर जाऊन अर्ज करणे गरजेचे आहे. तो अर्ज कसा करायचा याबाबत सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी नवनव्या योजना राबवण्याचे धोरण कायम ठेवले आहे. 2024-2025 या योजनेअंतर्गत खरीप हंगामासाठी कृषी यांत्रिकीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व कापूस साठवून बॅग शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागाने आवाहन केले आहे.

फवारणी पंप आणि कापूस साठवणूक बॅग

शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप व बियाणे औषधे आणि खते यासाठी अर्ज करता येणार आहे. याशिवाय कापूस साठवणूक बॅग हे देखील शंभर टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आवश्यक असणारी साधने सुलभपणे आणि विनामूल्य मिळवून देणे हा आहे.

हे वाचा-  महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना 2024 मराठी | Maharashtra Berojgari Bhatta 2024: (Registration) Apply Online

बॅटरी पंप अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख

जिल्हा अधीक्षक कृषी सुधाकर बोराळे यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी 26 ऑगस्टपर्यंत तर कापूस साठवणूक बॅगसाठी 31 ऑगस्टपर्यंत महाडीबीटी पोर्टवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावेत. अर्जाच्या प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज भरून त्याची पडताळणी केली जाईल आणि निवड झालेल्या शेतकऱ्यांना योजनांचा लाभ दिला जाईल.

शेतकऱ्यांसाठी आवाहन

या योजनेचा लाभ घेताना शेतकऱ्यांनी अर्ज करताना योग्य माहिती पुरवावी आणि अर्जाच्या सर्व अटी-शर्तींचे पालन करावे. कृषी विभागाने दिलेल्या वेळेत अर्ज सादर करून शेतकऱ्यांनी या योजनांचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी 26 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची शेवटची तारीख असून कापूस साठवणूक बॅगसाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत.

बॅटरी पंप अनुदान योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

शेतकऱ्यांसाठी लाभदायक योजना

या योजनांचा उद्देश शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे आणि उत्पादनक्षमता वाढवणे हा आहे. बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपामुळे शेतकऱ्यांना शेतीची फवारणी करणे सुलभ होईल आणि कापूस साठवणूक बॅगमुळे कापसाची सुरक्षित साठवणूक होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली अर्ज प्रक्रिया पूर्ण करून योजनांचा फायदा घ्यावा.

हे वाचा-  शिधापत्रिकेची केवायसी केली नसल्यास बंद होणार तुमचे रेशन कार्ड! लगेच करा e-KYC.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment