जाती प्रमाणत्राकरीता ऑनलाईन अर्ज.
अकाउंट क्रिएट कसे करावे
सर्वप्रथम या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ साईडला भेट दिल्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
न्यू यूजर रजिस्ट्रेशनला क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये दोन पर्याय दिसतील.
पर्याय एकला क्लिक करा.
जिल्हा निवडा.
मोबाईल नंबर एंटर करा.
सेंड ओटीपीला क्लिक करा.
हव असलेल युजरनेम तयार करा.
अर्जदाराचे पूर्ण नाव लिहा, इंग्लिश आणि मराठी मध्ये व्यवस्थित लिहून घ्या.
जन्मतारीख एंटर करा.
आय एक्सेप्टला टिक करा.
नंतर ओटीपी एंटर करून वेरिफायला क्लिक करा.
नंतर रजिस्टर बटनला क्लिक करून, स्वतःचे खाते तयार करून घ्या. या प्रकारे तुम्ही तुम्हचे अकाउंट क्रिएट करू घेवू शकता.
युजर आयडी चा वापर करून जाती प्रमाणपत्र बनवणे.
या https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ साईडला भेट दिल्यानंतर तुमच्या समोर होम पेज ओपन होईल.
होम पेजला ऑलरेडी रजिस्टर? लॉगिन हिअर मध्ये
लॉगिन ID इंटर करा.
पासवर्ड इंटर करा.
कॅपच्या एंटर करा.
तुमचा जिल्हा निवडा.
लॉगिन बटनला क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल,
प्रथम इंग्लिश भाषेची निवड करा. उजव्या बाजूला टॉप कॉर्नरला भाषा दिसेल भाषा निवडून घ्या.
त्यांतर त्यामध्ये डाव्या बाजूला विविध डिपार्टमेंटच्या नावाची यादी दिलेली आहे. त्यामध्ये रेवेन्यू डिपार्टमेंटला क्लिक करा.
रेवेन्यू डिपार्टमेंटला क्लिक केल्यानंतर समोरे सब डिपार्टमेंट दिसेल. त्यामध्ये रेवेन्यू सर्विसेसची निवड करायची आहे.
रेवेन्यू सर्विसेसला निवड केल्यानंतर तुमच्यासमोर ज्या-ज्या रेवेन्यू सर्विसेस उपलब्ध आहेत, त्या सर्व रेवेन्यू सर्विसची यादी तुमच्या समोर दिसेल.
कास्ट सर्टिफिकेटला टिक करून प्रोसीड बटनवर क्लिक करा.
नवीन पेज ओपन होईल डाव्या बाजूला डॅशबोर्ड आणि सर्विस लिस्ट असे दोन पर्याय दिसतील.
सर्विस लिस्टला क्लिक करा. सर्विस लिस्टला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर पुन्हा सर्व्हिसेसची यादी दिसेल त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेटला सिलेक्ट करा.
तुमच्यासमोर डॉक्युमेंटची लिस्ट दिसेल.
- प्रूफ ऑफ आयडेंटिटी (ऐनी वन)
- प्रूफ ऑफ ऍड्रेस (ऐनी वन)
- अदर डॉक्युमेंट (ऐनी वन)
लागणारे कागद व्यवस्थित वाचून घ्या. व कंटिन्यू बटनला क्लिक करा.
नवीन पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट दिसेल. त्यामध्ये तुम्हाला जे कास्ट सर्टिफिकेट बनवायचे आहे त्याची निवड करायची आहे.
जसे जर तुम्ही एस सी ची कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर एससी कास्ट सर्टिफिकेटची ची निवड करा,
जर तुम्हाला एसटीची कास्ट सर्टिफिकेट बनवायची आहे तर तुम्ही एसटी कास्ट सर्टिफिकेट ची निवड करा.
जर तुम्हाला ओबीसीची कास्ट सर्टिफिकेट बनवायची आहे तर तुम्ही ओबीसी कास्ट सर्टिफिकेट ची निवड करा. नंतर
एप्लीकनट डिटेल योग्यरित्या भरून घ्या
महत्वाचे स्टेप Caste Certificate Online Apply
रिलेशन ऑफ बेनिफिशरी विथ एप्लीकनट – यामध्ये का सर्टिफिकेट कोणाकरिता काढत आहात ते निवडा.
जसे जर तुम्ही मुलाकरिता कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर तुम्ही सन (Son)ची निवड करा.
जर तुम्ही मुली करिता कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर तुम्ही डॉटर (Daughter)ची निवड करा.
जर तुम्ही स्वतः करिताच कास्ट सर्टिफिकेट बनवत असाल तर सेल्फ (SELF)ची निवड करा.
हि बेनिफिशियरी डिटेल योग्य भरून घ्या.
बेनिफिशियरी फादर्स डिटेल भरून घ्या.
या बेनिफिशियरी फादर्स ऍड्रेस डिटेल मध्ये योग्य माहिती भरून घ्या.
बेनिफिशियरी कास्ट कॅटेगिरी डिटेल्स भरून घ्या.
एप्लीकनट अदर डिटेल्स भरून घ्या.
फादर्स अदर डिटेल भरून घ्या.
बेनिफिशरी अदर डिटेल भरून घ्या.
अटॅचमेंट टू बी अटॅच – यामध्ये तुम्ही जे डॉक्युमेंट जोडणार आहात, त्यांच्या पुढे एस(Yes) किंवा नो(No) ची निवड करा.
निवड केल्यानंतर डॉक्युमेंटचे डिस्क्रिप्शन सुद्धा लिहायचे आहे.
एडिशनल इन्फॉर्मेशन – योग्य माहिती वाचून भरून घ्या.
यामध्ये एफिडेवीट फॉर्म नंबर 2 आणि एफिडेवीट फॉर्म नंबर 3, ची प्रिंट काढून तो व्यवस्थित भरून घ्या.
अदर डिटेल मध्ये कास्ट सर्टिफिकेट कशाकरिता हवी आहे त्याचं कारण लिहायचं आहे. जसे – शैक्षणिक, नौकरी इत्यादी.
एग्रीमेंट डिटेल वाचून घ्या.
आय एक्सेप्ट ला टीक करा. नंतर सेव बटनला क्लिक करा.
सेव बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अर्ज क्रमांक मिळेल. तो अर्ज क्रमांक कॉपी करून तुमच्याकडे सुरक्षित करून घ्या.
यानंतर अर्जदाराचे फोटो अपलोड करायचे आहे.
प्रूफऑफ आयडेंटिटी मध्ये योग्य कागदपत्रे जोडा.
प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये कागदपत्रे जोडा.
अदर डॉक्युमेंट मध्ये योग्य जास्तीत जास्त कागद जोडा.
अपलोड डॉक्युमेंट या बटनला क्लिक करा.
यानंतर जाती प्रमाणपत्र करिता किती शुल्क द्यावे लागेल याची पावती जनरेट होईल. कन्फर्म या बटनला क्लिक करा.
योग्य त्या पेमेंट-टूल्सचा वापर करून पेमेंट कन्फर्म करून घ्या.
ट्रांजेक्शन सक्सेसफुल्लची रिसीट जनरेट होईल. ती सांभाळून ठेवा व सेव करून घ्या. कारण तुमचं कास्ट सर्टिफिकेट तयार झाले किंवा नाही.
या तपासणी करिता महत्त्वाचा आहे.
जर तुमचे कास्ट सर्टिफिकेट तयार झाले असेल तर तुम्ही त्याची प्रिंट काढून घ्या.
या प्रकारे आपण कास्ट सर्टिफिकेट घरच्या घरी बनवू शकतो.