व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

या 30 लाख महिलांना अर्ज मंजूर असूनही मिळणार नाहीत पैसे|लाडकी बहीण योजना 3 हजार रुपये

30 लाख महिलांना अर्ज मंजूर असूनही पैसे मिळाले नाहीत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार आहेत. सध्या पहिला हप्ता जमा झाला आहे, परंतु काही अडचणींमुळे काही महिलांना हे पैसे मिळाले नाहीत. राज्यातील एकूण 80 लाख महिलांना त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत. तसेच राज्यातील 30 लाख महिलांना अर्ज मंजूर होऊन ही काही कारणांमुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत.

पहिला हप्ता जमा

14 ऑगस्ट 2024 रोजी, स्वतंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला, सरकारने राज्यातील महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत 3,000 रुपये जमा केले आहेत. या रकमेचा पहिला हप्ता म्हणून जून आणि जुलै महिन्यांचे मिळून हे पैसे दिले गेले आहेत. ज्या महिलांनी 31 जुलैपूर्वी अर्ज केला होता, त्यांच्याच खात्यात हे पैसे जमा झाले आहेत. तसेच ज्या महिलांनी एक ऑगस्ट नंतर अर्ज केलेला आहे अशा महिलांना 17 ऑगस्ट रोजी पैसे बँक खात्यात जमा होणार आहेत.

हे वाचा-  बँकेने कर्ज नाकारले? या सरकारी संस्थेकडून आता 6 मिनिटांत मिळवा Personal Loan

बँक खात्याला आधार सिडिंग नाही

ही योजना जरी उपयुक्त असली तरीही, काही महिलांना काही अडचणींमुळे पहिला हप्ता मिळालेला नाही. योजनेसाठी अर्ज केलेल्यांपैकी काहींची नावे पात्रता यादीत नाहीत, ज्यामुळे त्यांना लाभ मिळण्यास विलंब झाला आहे. यापैकी अनेक अर्जांची अद्याप छाननी सुरू आहे. त्याचबरोबर, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसल्यास योजनेच्या रकमेत अडचणी येऊ शकतात.

अर्ज मंजूर असूनही पैसे आले नाहीत, यापैकी 90% महिलांच्या बँक खात्याला आधार लिंक नाही. त्यामुळे त्या महिलांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड आपल्या बँक खात्याला लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे आपण ऑनलाइन ही पाहू शकतो. याची माहिती पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे की नाही ते पाहू शकता.

तुमचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक आहे का पहा.

आधार कार्ड लिंक करण्याचे महत्त्व

माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आधार कार्ड लिंक असणे आवश्यक आहे. जर आधार लिंक नसेल तर लाभ मिळणार नाही. त्यामुळे महिलांनी लवकरात लवकर आपले आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करणे गरजेचे आहे. तसेच बँक खात्याचे ई-केवायसी करणेही आवश्यक आहे, जे जवळच्या सेतू केंद्रावर करता येते.

हे वाचा-  तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन डिजिटल सहीचा सातबारा डाऊनलोड करा 2024. | Digital satbara 7/12 download.

योजनेचे फायदे

या योजनेतून महिलांना आर्थिक सहाय्य मिळत असल्याने त्यांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला मिळणारे 1,500 रुपये त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी उपयोगी पडतील. ही योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सबल बनवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.

तुमचे बँक खाते आधार कार्ड शी लिंक आहे का पहा.

लाडकी बहीण योजनेचा हप्ता

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातील महिलांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे, परंतु काही अडचणींमुळे काहींना पैसे मिळाले नाहीत. आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करणे हे आवश्यक आहे, अन्यथा लाभ मिळण्यात अडचणी येऊ शकतात. या योजनेचे फायदे आणि त्यातील अडचणींवर लक्ष ठेवून महिलांनी आवश्यक ती पावले उचलावी.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment