व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

राज्यात आजपासून वादळी पावसाचा इशारा |maharashtra weather forecast

राज्यात वादळी पावसाचा इशारा!

राज्यात उन्हाचा तीव्र त्रास सहन करत असतानाच वादळी पावसाला पोषक हवामान निर्माण झाले आहे. सोलापूर येथे राज्यातील हंगामातील उच्चांकी ४३.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज (ता. ७) विदर्भात उष्णतेची लाट, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उद्यापासून (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीतीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दक्षिण छत्तीसगढ, विदर्भ, मराठवाडा, कर्नाटक, तमिळनाडू ते कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. राज्यात सध्या ढगाळ हवामान असून, उन्हाच्या झळा आणि उकाडा कायम आहे. आज (ता. ७) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा (येलो अलर्ट), तर उद्यापासून (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

रोजचा हवामान अंदाज पाहण्यासाठी पंजाब डख हवामान अंदाज हे ॲप डाऊनलोड करा.

महत्वाचे मुद्दे:

  • विदर्भात आज (ता. ७) उष्णतेची लाट, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा.
  • उद्यापासून (ता. ८) विदर्भ आणि मराठवाड्यात गारपीतीची शक्यता.
  • ढगाळ हवामान, उन्हाच्या झळा आणि उकाडा कायम.
  • नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन.
हे वाचा-  IGI Aviation Bharti 2024 | 12वी पास उमेदवारांसाठी 1074 रिक्त पदांची ऑनलाईन भरती सुरू, आत्ताच अर्ज करा!

हवामान अंदाज पाहण्यासाठी पंजाब डख हवामान अंदाज हे ॲप डाऊनलोड करा.

-उष्ण लाटेचा इशारा (येलो अलर्ट) :

अमरावती, यवतमाळ.

– वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

नंदूरबार, धुळे, नाशिक, जळगाव, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड.

४२ अंशांपेक्षा अधिक कमाल तापमान असलेली ठिकाणे :

सोलापूर ४३.१, चंद्रपूर ४२.४, वर्धा ४२.१, ब्रह्मपुरी ४२, यवतमाळ ४२.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment