व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

नवीन इलेक्ट्रिक लुना लॉन्च झाली, फक्त इतक्या कमी किमतीत

कायनेटिक लुना ही एक 1972 मधील सर्वात लोकप्रिय दुचाकी होती .कायनेटिक लुना एक पन्नास सीसी मोपेड आहे. जे 1972 मध्ये कायनेटिक इंजिनिअरिंग ने भारतात आणलेले होती .ही एक इटालियन कंपनी पियाजिओ ने बनवलेल्या मोपेड वर आधारित होती. लुना लवकरच भारतात लोकप्रिय झाली आणि अनेक वर्षे सर्वाधिक विक्री होणारे एक दुचाकी होती. लुना  ही त्या काळात शहरी आणि ग्रामीण भागात वापरली जात होती . ती स्वस्त कार्यक्षम आणि देखभाल करण्यासाठी सोपे होती.  ती सायकल प्रमाणे चालविणे देखील सोपे होते. परंतु 2000 च्या शतकाच्या सुरुवातीस फोर स्ट्रोक गाड्या बाजारात येताच .ह्या गाडीचे मार्केट संपले ,हळूहळू गाडी नामशेष झाली. पण मागील महिन्यात कायनेटिक लूनाने नवीन ई लूना लॉन्च केली आहे. आता 2024 मध्ये लुना इलेक्ट्रिक नवीन अवतारात बाजारात पुन्हा आली आहे.

कायनेटिक ई लुना फीचर्स

कायनेटिक ई लुना ही गाडी बाजारातील इतर बजाज चेतक, टीव्हीएस i क्यूब या गाड्यांना फाईट देण्यासाठी ,यामध्ये खूप पिक्चर्स कंपनीने ऍड केलेले आहे

  • टॉप स्पीड 65 km/h
  • मोटर 2.9 kw
  • बॅटरी with लिथियम आयन
  • चार्जिंग टाइमिंग-4 hours only
  • रेंज 110 km
  • टेलिस्कोपिक फर्क
  • एबीएस ब्रेक सिस्टम
  • एलईडी हेडलाईट
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
  • मोबाईल चार्जिंग पोर्ट
  • अँटि थिफ्ट अलार्म
  • रीजनरेटिव्ह ब्रेकिंग
हे वाचा-  इलेक्ट्रिक स्कूटर घरी आणणाऱ्यांसाठी खास ऑफर | hero ची 165 average देणारी गाडी मिळणार 40 हजार डिस्काउंट मध्ये.

कायनेटिक ई लुना चे फायदे

ही गाडी पेट्रोलवर चालणाऱ्या लूनापेक्षा गाड्यांच्या तुलनेने स्वस्त आहे. गाडी पर्यावरण पूरक आहे. या गाडीमुळे हवा प्रदूषण होत नाही .कारण चालण्यासाठी पेट्रोल किंवा डिझेल सारख्या इंधनाची आवश्यकता नसते .हे शहरी भागात हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधारण्यासाठी ,ग्रीन हाऊस वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. ही गाडी इतर गाड्यांच्या तुलनेने जास्त शांत असते .त्यामुळे शहरी वातावरणात ध्वनी प्रदूषण कमी करण्यास मदत होते . रहिवासी व प्राण्यांसाठी अधिक शांतता वातावरण निर्माण होते. ई लुना ही पेट्रोल किंवा डिझेल वाहनांच्या तुलनेने आपल्याला ही गाडी वापरण्यासाठी स्वस्त पडते. कमी पैशांमध्ये आपण जास्त अंतर ये-जा करू शकतो. अत्यंत शांत असते जी तुम्हाला ड्रायव्हिंग अनुभव अधिक आरामदायक बनवते . ई लुना इतर गाड्या प्रमाणेच जास्त वेग देखील देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार आणि बजेटनुसार विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे .ई लुना पर्यावरण आणि तुमच्या वॉलेट साठी उत्तम पर्याय आहे .

ई लुनाची किंमत

कंपनीने ह्या ई लुनाचा लुक 26 जानेवारीला सर्वांसमोर आणलेला आहे .या ई लुनाचे बुकिंग 26 जानेवारी पासूनच सुरू झाले आहे. तर आपल्या सर्वांनाच आतुरता आहे की या गाडीची किंमत किती? तर ही गाडी फक्त आपल्याला 1.7 kwhबॅटरी सह 70000 रुपये पर्यंत मिळेल.2kwh बॅटरी सहज 74000 रुपये .तर 3kwh बॅटरी सह 84 हजार रुपये फक्त इतक्या कमी किमतीत आपल्याला मिळेल. तुम्ही शासनाच्या फेम 2सबसिडीनुसार पात्र असू शकता. ज्यामुळे वाहनाची किंमत कमी देखील होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला तुमच्या वॉलेटला परवडणाऱ्या दरामध्ये ई लुना मिळेल . ही गाडी मध्यमवर्गीय व विद्यार्थ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही स्वस्त इलेक्ट्रिक मोबिलिटी पसंत करत असाल, तर येईल ना हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.

हे वाचा-  फक्त दोन लाख रुपयांत खरेदी करा चार चाकी गाड्या...

कायनेटिक ई लुनाची व्हेरियंट

कायनेटिक ई लुना तीन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. पहिली म्हणजे ई लुना 100 ही गाडी 100 किलोमीटरच्या पर्यंतच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. दुसरी ई लुना 125 ही 125 किलोमीटरच्या पर्यंतच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. आणि तिसरी ई लुना 160 ही 160 किलोमीटरच्या पर्यंतच्या श्रेणीमध्ये उपलब्ध आहे. कायनेटिक ई लुना ही विवीध रंगांमध्ये उपलब्ध आहे .मलबेरी रेड, ओशन ब्ल्यू, पर्ल येलो, स्कायलिंग ग्रीन ,नाईट स्टार ब्लॅक पाच रंगांमध्ये आहे.

कायनेटिक ई लुनाचे तोटे

कायनेटिक ई लुनाची श्रेणी एका चार्ज वर सरासरी 130 किलोमीटर आहे. परंतु शहरी वापरासाठी ठीक आहे पण जर तुम्हाला लांबचा प्रवास करायचा असेल तर ते पुरेशी नाही . या गाडीची गती 65 km/h आहे. हे शहरात फिरण्यासाठी ठीक आहे परंतु तुम्ही जलद गतीने जात असाल ,तर ते पुरेसे वेगवान नाही. ह्या गाडीमध्ये 3kw बॅटरी लहान आहे. त्यामुळे ती तुम्हाला वारंवार चार्ज करावी लागेल. गाडी चार्ज होण्यासाठी चार तास लागतात . त्यामुळे तुमची वेळेची नुकसान होऊ शकते. ई लुना शहरी भागामध्ये व गाव भागामध्ये वापरासाठी चांगले आहे, परंतु ग्रामीण भागातील हाच खळग्याच्या रस्त्यावरती या गाडीचा परफॉर्मन्स चांगला राहणार नाही. ही गाडी भारतात लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर आहे .किमतीत परवडणारे आहे .चांगली श्रेणी देखील आहे ,परंतु यामध्ये काही तोटे देखील आहेत .त्यांचा विचार करण्याची इतकी फारशी आवश्यकता नाही.

हे वाचा-  नवीन 5 डोअर थार फक्त इतक्या कमी किमतीत

ई लुना तुमच्या दैनंदिन वापरासाठी व गरजेसाठी एक चांगली गाडी आहे .जर तुम्हाला अनुकूल बजेटमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर हवी असेल. तर ज्यामध्ये तुम्हाला चांगली रेंज आणि टॉप स्पीड हवा असेल ,तर कायनेटिक ई लुना तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment