व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

Lok Sabha Election Result 2024 Live Streaming : लोकसभा निवडणूक निकाला कसा आणि कुठे पाहू शकाल

Lok Sabha Election Result 2024 : 7 टप्प्यात झालेल्या या निवडणुकीनंतर देशातील जनतेचे लक्ष स्थापन होणाऱ्या नव्या सरकारकडे लागले आहे. 1 जून रोजी आलेल्या एक्झिट पोलने हे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही. त्यामुळे आज मंगळवारी येणार निकाल हा महत्वाचा ठरणार आहे.

Lok Sabha Election 2024 : देशातील सर्वात मोठ्या निवडणुकीचे म्हणजेच लोकसभा निवडणुकीचे निकाल उद्या म्हणजेच 4 जून रोजी येणार आहेत. भाजप प्रणीत एनडीए आणि इंडिया आघाडी असा थेट सामना या निवडणुकीत होत आहे. 7 टप्प्यात झालेल्या या निवडणुकीनंतर देशातील जनतेचे लक्ष स्थापन होणाऱ्या नव्या सरकारकडे लागले आहे. 1 जून रोजी आलेल्या एक्झिट पोलने हे चित्र बऱ्याच अंशी स्पष्ट केले असले तरी तो अंतिम निकाल नाही. त्यामुळे मंगळवारी येणार निकाल हा महत्वाचा ठरणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी पोस्टल बॅलेटची मोजणी केली जाईल. पोस्टल मतपत्रिकेतही दोन गटात मतमोजणी होणार आहे.

लोकसभा निकाल पाहण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

पहिल्या गटात लष्कर, निमलष्करी दलाचे जवान आणि अधिकारी यांच्या मतांची मोजणी केली जाईल. दुसऱ्या गटात निवडणूक कर्तव्य बजावणारे कर्मचारी, अधिकारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची पोस्टल मतमोजणी होणार आहे. त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणीला सुरवात होईल.

हे वाचा-  Union Bank Personal Loan: 20 मिनिटांत 50 हजार रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवा.

लोकसभा निवडणुकीच्या निकालाबरोबरच आंध्र प्रदेश आणि ओडिशा विधानसभा निवडणुकांची मतमोजणीचे निकालही 4 जून रोजी येतील. दुपारी दोन वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. EVM चे VVPAT सह जुळल्यानंतर VVPAT स्लिप मोजणी आणि पोस्टल मतपत्रिका जोडल्यानंतर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्व जागांवर निकाल घोषित होतील असा अंदाज आहे.

वोटर हेल्पलाइन ॲप मधून निकाल पहा

लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. तुम्ही या ॲपवरही सहज तपासू शकता. निवडणूक आयोगाने मतदार हेल्पलाइन ॲप सुरू केले आहे. या ठिकाणी तुम्हाला निकालाची संपूर्ण माहिती मिळणार आहे.

वोटर हेल्पलाइन अॅप द्वारे तुमचा निकाल पाहण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.

निवडणूक आयोगाचे ॲप-

  • ॲपद्वारे निकाल पाहण्यासाठी तुम्हाला प्रथम ॲप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर जावे लागेल. 
  • येथे मतदार हेल्पलाइनच्या नावाने निवडणूक आयोगाचे ॲप उपलब्ध आहे.
  • यामध्ये गेल्यावर तुम्हाला अनेक पर्याय दिसतील.
  • येथे तुम्हाला निवडणूक निकाल पर्यायावर जावे लागेल. येथे गेल्यानंतर, तुम्ही सीट आणि उमेदवारानुसार निकाल देखील पाहू शकता.

निकालाची घोषणा-

  • सर्व प्रथम तुम्हाला राज्य निवडावे लागेल आणि नंतर तुम्हाला जागा निवडण्याचा पर्याय देखील असेल.
  • यासोबतच तुम्हाला एकूण जागांचा निकालही दिसेल. निकाल जाहीर होईपर्यंत संध्याकाळ झाली असली तरी कोणता उमेदवार आघाडीवर आहे आणि ते तपासता येईल याचा अंदाज लावणे तुम्हाला सोपे जाईल.
हे वाचा-  बांधकाम कामगार योजना : या योजनेत कर्ज करून अनेक मोठमोठ्या योजनांचा फायदा घ्या.

व्होटर हेल्पलाइन ॲपवर अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. यात मतदारसंघनिहाय किंवा राज्यनिहाय निकाल तसेच विजयी, नेतृत्व किंवा मागे राहिलेल्या उमेदवारांचे डिटेल्स मिळवण्यासाठी तुम्ही उपलब्ध फिल्टर्स वापरू शकता. याशिवाय, निवडणूक अधिकारी आणि मतमोजणी एजंट्ससाठी हँडबुक ECI वेबसाइटवर उपलब्ध आहे. मतमोजणी व्यवस्थापन, मतमोजणी प्रक्रिया आणि EVM/VVPAT चे स्टोरेजसाठी आयोगाच्या गाईडलाइन्स ECI वेबसाइटवर आधीच उपलब्ध आहेत.

निवडणूक निकाल कुठे आणि कसा पाहायचा?

मंगळवारी सकाळी 8 वाजल्यापासून निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक निकाल पाहण्यासाठी निवडणूक आयोगाच्या https://eci.gov.in या वेबसाइटवर जाऊन जनरल इलेक्शन 2024 वर क्लिक करावे लागेल. यासोबतच निवडणूक आयोगाशी लिंक असलेल्या व्होटर हेल्पलाइन ॲप, iOS आणि अँड्रॉइड मोबाइल ॲप्सवरही निकाल दिसतील. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर राज्यनिहाय, जागानिहाय आणि पक्षनिहाय निकाल जाहीर करण्याची तयारी करण्यात आली आहे.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment