व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024-25 ची झाली सुरवात, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान

नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रात शासनाने पुन्हा एकदा गाय गोठा योजनेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ही योजना शेती बरोबर एखादा जोडधंदा करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त आहे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील कोणताही रहिवासी असलेला शेतकरी घेऊ शकतो. महाराष्ट्र सरकारने ही योजना गाय आणि म्हैस पालन करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याच्या उद्देशाने सुरू केली.

असून या योजनेअंतर्गत लाभार्थी 1 लाख 44 हजार रुपयांपर्यंत अनुदानास पात्र आहे. या लेखात आपण या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्जप्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती पाहूया…

नमस्कार शेतकरी मित्रांनो शासनाने ही योजना चालू करण्याचे मुख्य उद्देश असा आहे की सध्या शेतीच्या मालाला योग्य तो हमीभाव भेटत नाही .

त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालले आहे. व अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रयत्न जास्त होत आहेत व महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आकडा देखील वाढत आहे व या शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुळे भारतासारख्या कृषीप्रधान देशांमध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये नकारात्मक विचार शेती बद्दल तयार होत आहेत .

व शेतकरी शेती सोडून पुण्या मुंबईला मजुरीसाठी येत आहे व आपल्या पाल्याला देखील तुम्ही शेती करू नका असे सूचित करत आहे कारण शेतीमध्ये पूर्वीसारखा फारसा नफा राहिलेला नाही.

या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनाने शेती सोबत शेतीला चालना चालना देण्यासाठी जोडधंदा म्हणून दुग्ध पशुपालन करावे जेणेकरून शेतकऱ्याला थोडासा का होईना या गोष्टीचा फायदा व्हावा कारण नुसता शेतीच्या भरोशावर या निसर्गावर मात करत शेतकरी यशस्वी होईलच असेल नाही त्यामुळे त्याला पशुपालनाची साथ मिळावी व शेतकऱ्याला फायदा व्हावा अशी सरकारची इच्छा आहे.

व त्यामुळे सरकारने पशुपालन करताना शेतकऱ्याला पहिल्यांदा फारशी गुंतवणूक करावी लागू नये म्हणून ही योजना अमलात आणलेली आहे ज्याचे नाव आहे गाय गोठा अनुदान योजना

हे वाचा-  लाडका भाऊ योजना नक्की काय आहे ? योजना खरी आहे की खोटी, सविस्तर समजून घ्या | Ladka Bhau Yojana Maharashtra 2024

पक्का गोठा बांधणे का गरजेचे आहे ?

पक्का गोठा तयार केल्याने गोट्याची उत्पादक उत्पादकता वाढते गोठ्यातील जनावर हे आरामदायी वातावरणात राहते त्यामुळे ते स्वतः आनंदी व निरोगी राहते व त्याचे या गोष्टीमुळे आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ होते.

जर आपला गोठा पक्का नसेल तर आपल्या गोठ्यामध्ये स्वच्छता ही चांगल्या प्रमाणामध्ये होत नाही कारण पक्का गोटा तयार केल्यानंतर स्वच्छता करणे हे सोपे जाते पाणी आणि इतर कचरा गोठ्यातून सहज बाहेर काढता येतो यामुळे गोठ्यात जंतू निर्माण होत नाहीत व त्यामुळे गोठ्यामध्ये रोगाचा प्रादुर्भाव रोखला जाऊ शकतो.

व पक्का गोठा तयार केल्यामुळे गोठ्यातील जनावरांचे संरक्षण हे चांगल्या प्रकारे होते ऊन वारा पाऊस थंडी इत्यादीपासून आपला गोठा सुरक्षित राहतो यामुळे गोठ्यातील जनावर हे आरामदायी वातावरणात राहू शकतात.

व जर आपण जेथे जनावर बांधत आहे तेथील जागा जर ओबडधोबड असेल तर आपल्या जनावराला mastyatis व इतर कासेचे आजार होतात त्यामुळे आपल्याला आपला गोठा पक्का असणे गरजेचे आहे

गाय गोठा अनुदान योजनेचे स्वरूप.

ही योजना शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाचे आहे महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेला हा एक चांगला निर्णय आहे या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गाय म्हशी शेळ्या बोकड व कोंबड्या इत्यादी यांना पक्क्या स्वरूपाचा गोठा किंवा शेड बांधण्यासाठी अनुदान या योजनेमधून प्राप्त होते.

ग्रामीण भागात रोजगाराची संधी फारशी नसते त्यामुळे ग्रामीण भागातील तरुणा तरुणाईला बेरोजगारीचा सामना करावा लागतो यालाच पर्याय म्हणून महाराष्ट्र सरकारने ही योजना चालू केली जेणेकरून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी प्राप्त व्हावी व त्यांच्या गावात त्यांना उत्पन्नाचे साधन मिळावे.

आपल्याला तर माहीतच आहे की शेतीचा जोड व्यवसाय किंवा पूरक व्यवसाय म्हणून पशुपालनाला ओळखले जाते कारण गाई आणि म्हशींचे पालन हे शेतकऱ्यांना पारंपारिकपणे व शेतीसाठी महत्त्वाचा जोड व्यवसाय आहे परंतु हा व्यवसाय चालू करताना प्राथमिक खर्च कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ अवश्य घ्यावा.

गाय गोठा अनुदानासाठी आवश्यक पात्रता

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या गाय गोठा अनुदान योजनेसाठी खालील पात्रता असणे फार गरजेचे आहे:

 • अर्जदाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण झालेले असावे.
 • अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर किमान एक एकर क्षेत्र नोंद असावे किंवा त्याने भाडेतत्त्वावर करार करून घेतलेली किमान 50 चौरस फूट क्षेत्रफळाची जागा त्याच्याकडे असावी.
 • अर्ज करणारा शेतकरी हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
 • अर्ज करणारा शेतकरी हा महाराष्ट्र राज्याचा नागरिक व रहिवासी असावा .
 • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे दीड ते दोन लाख यांच्या दरम्यान असावे व दोन लाखांपेक्षा जास्त नसावे.
 • अर्जदाराकडे किमान एक गाय किंवा म्हैस असावी.
हे वाचा-  शेतकऱ्यांनो आता पीक विमा भरा एक रुपयात. विमा भरण्याची संपूर्ण प्रक्रिया

गाय गोठा अनुदानासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

गाय गोठा अनुदान योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे:

 • अर्जदाराचे आधार कार्ड
 • अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे
 • अर्जदार शेतकऱ्यांचे रेशन कार्ड
 • अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो
 • अर्जदाराचे मतदान कार्ड
 • अर्जदाराच्या कुटुंबाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला
 • अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे व त्याचा पंधरा वर्षांचा वास्तव्याचा दाखला असणे आवश्यक आहे
 • आदिवासी प्रमाणपत्र (असल्यास)
 • अर्जदार हा ग्रामीण भागात राहणारा रहिवासी असावा व त्याच्या गावचा रहिवासी दाखला
 • अर्जदाराचा चालू मोबाईल क्रमांक
 • अर्जदाराचा शाळा सोडलेला दाखला
 • अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र (असल्यास)
 • या योजनेअंतर्गत याच्या आधी कधी गाय गोठा अनुदान योजनेचा लाभ घेतला नाही असे घोषणापत्र जोडणे आवश्यक.
 • ज्या जागेत गोठा बांधायचा आहे त्या जागेचा उतारा व सह हिस्सेदार असल्यास त्याचे संमती पत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र.
 • अर्जदाराच्या गावचे ग्रामपंचायत मधील शिफारस पत्र
 • अर्जदार हा अल्पभूधारक असणे गरजेचे आहे त्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येत नाही.
 • अर्जदारांना जनावरांचे गोटा शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत जोडणे गरजेचे आहे
 • अर्जदाराकडे त्याच्या कुटुंबाचे नरेगा ओळखपत्र जॉब कार्ड असणे गरजेचे आहे.
 • अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे.

गाय गोठा अनुदान योजनेमध्ये मिळणारा लाभ

जर शेतकऱ्याकडे दोन ते सहा जनावरे असतील तर त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून गोठा बांधण्यासाठी 77,188 रुपये दिले जातात.

जर शेतकऱ्याकडे सहा पेक्षा जास्त जनावरे असतील तर त्याला गाय गोठा अनुदान 145000 इतक्या अनुदान त्या शेतकऱ्याला महाराष्ट्र शासनाकडून दिले जाते.

हे वाचा-  सर्वोदय सोलर योजनेअंतर्गत मिळणार 1 कोटी कुटुंबांना मोफत सोलर

जर अर्ज करणाऱ्या शेतकऱ्याकडे बारा पेक्षा जास्त जनावरे असतील तर त्याच्यासाठी हे अनुदान तिप्पट म्हणजेच 230000 इतके दिले जाते.

गाय गोठा योजनेचा अर्ज कसा करावा

 • यामध्ये या योजनेअंतर्गत आपण सरपंच ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कोणातर्फे आहोत त्याच्या नावापुढे बरोबर खून करावी
 • त्याखाली आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीचे नाव आपला तालुका व जिल्हा टाकायचा आहे.
 • अर्जदार शेतकऱ्याने आपले नाव आपला पत्ता आणि मोबाईल क्रमांक भरायचा आहे
 • अर्जदाराने ज्या प्रकारासाठी अर्ज केला आहे त्याच्यासमोर बरोबर खून करावी
 • व त्याखाली अर्जदाराने आपले वैयक्तिक माहिती भरायचे आहे व जो प्रकार निवडेल त्याच्या संबंधित कागदपत्रांचे पुरावे जोडायचे आहेत.
 • त्यानंतर त्याचे नावे जमीन असल्यास सातबारा व आठ अ आणि ग्रामपंचायत नमुना 9 जोडायचा आहे.
 • लाभार्थ्याचा गावचा रहिवासी दाखला जोडायचा आहे.
 • त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचा आहे त्याच्यासोबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या सहीचा शिफारस पत्र जोडावे व लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे असे त्याच्यामध्ये सांगितले जाते
 • व यानंतर अर्जदार शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदारला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सही शिक्षानुसार पोचपावती दिली जाते.

गाय गोठा योजना अर्ज रद्द होण्याची प्रमुख कारणे

अर्जदार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जातो.

अर्जदाराचा पूर्वीचा गोठा असल्यास हा अर्ज बाद केला जातो.

अर्जदाराकडे स्वतःची जमीन व भाडेतत्त्वावरील करार नसल्यास अर्जदाराचा अर्ज रद्द केला जातो.

अर्जदार हा मुळाच ग्रामीण भागाचा रहिवाशी नसल्यास त्याचा अर्ज रद्द केला जातो.

अर्जदारांनी जर यापूर्वी केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाचा गाय गोठा योजना अंतर्गत कोणतेही अनुदान जर प्राप्त केले असेल तर त्याला या योजनेचा लाभ घेता येत नाही

अर्जदाराने जर अर्ज करताना त्यामध्ये खोटी माहिती भरल्यास त्याचा अर्ज हा बात केला जातो

अर्जात विचारलेली सर्व माहिती व सर्व कागदपत्रे योग्य रीतीने पूर्तता केल्यावर तुम्हाला या योजनेअंतर्गत गाय गोठा अनुदान मिळेल.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

3 thoughts on “गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र 2024-25 ची झाली सुरवात, शेतकऱ्यांना मिळणार अनुदान”

Leave a Comment