व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

आता तुमच्या जमिनीच्या सातबारा वर घातलं जाणार तुमच्या आईचं नाव | ad name of satbara

शाळेच्या दाखल्यासह विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) याआधीच घेतला आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. सातबारा (Satbara) उताऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आता त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून (Land Record Department) घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात भूमी अभिलेख विभागामार्फत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

गट नंबर टाकून सातबारा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा

सहा महिन्यांत होणार अंमलबजावणी

दरम्यान, सातबारा उताऱ्यात आईच्या नावासाठी नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. त्यासोबत आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तसेच तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल असे सांगण्यात आले आहे.

हे वाचा-  TATA Capital देत आहे 35 लाखांपर्यंत पर्सनल लोन | TATA Capital Personal loan

विवाहा आधीच्या नावानेही होईल नोंदणी

सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे.

तुमच्या जमिनीचा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी खालील बटन वर क्लिक करा.

Mother name in satbara document ?

  • 01 मे 2024 नंतर नावे टाकताना त्यांचे नाव सोबत आता आईचे नाव सुद्धा लागणार आहे हे या ठिकाणी लक्षात घ्या.
  • आईचे नाव लागण्यासाठी किंवा रकान्यामध्ये येण्यासाठी ती महिला त्याची आई असल्याबाबत पुरावा द्यावा लागणार आहे.
  • याची चौकशी तलाठी मार्फत होऊन नंतरच त्या व्यक्तीच्या नावावरून किंवा बालकाच्या नावावर लागणार आहे.

१ मेनंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या सातबाऱ्यावर आईचे नाव समाविष्ट करताना आपोआप पुरावे असतील. १ मेपूर्वी जन्माला आलेल्या व्यक्तीने आईचे नाव समाविष्ट करणे हे ऐच्छिक असेल. त्यासाठी संबंधित महिला ही त्याची आई असल्याचा पुरावा मिळत नाही, तोपर्यंत नोंद होणार नाही. – सरिता नरके, राज्य प्रकल्प संचालक ई-फेरफार प्रकल्प

विवाहित महिलांबाबत पद्धत काय आहे ?

  • पद्धत ही प्रचलित पद्धतीनुसारच सध्या असणार आहे.
  • तिचे लग्नानंतरचे नाव त्यानंतर तिच्या पतीचे नाव आणि त्यानंतर आडनाव अशा स्वरूपात नोंदवण्या ची प्रक्रिया असणार आहे.
  • महिलेचे लग्नापूर्वीचे नाव मालमत्ता दस्तावेज मध्ये नोंदवण्याची मुभा आहे.
हे वाचा-  आयुष्यमान भारत योजनेमधील दवाखान्यांची यादी अशी शोधा | ayushyaman Bharat hospital list

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment