व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

शेळीपालन व कुक्कुटपालनासाठी शेड बांधण्याची गाय गोठा अनुदनाअंतर्गत योजना.

शेळी पालन शेड बांधणे

Gay Gota Shed

शेळीला गरीबाची गाय समजली जाते.शेळीपालन हा ग्रामीण भागातील अल्प उत्पन्न गटातील कुटुंबाच्या उपजिवीकेचे पारंपरिक आणि महत्वाचे साधन आहे.अल्प उत्पन्न असलेल्या ग्रामीण भागातील कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी शेळीपालन या व्यवसायाकरिता मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

गाय गोठा योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत.

ग्रामीण भागातील शेळी मेंढी पालनावर उदरनिर्वाह करणारी गोरगरीब कुटुंबे पैशाअभावी शेळया-मेंढयाना चांगल्या प्रकारचा सरंक्षित निवारा देऊ शकत नाहीत.चांगल्या निवाऱ्याअभावी शेळया मेंढयामध्ये विवीध प्रकाराचे संसर्गजन्य, जंतजन्य, बाहयपरजीवी किटकांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोगग्रस्त, खुरटी व आर्थिकदृष्टया फारशी किफायतशीर नसलेल्या शेळया-मेंढयाचे कळप पाळले जातात. याकरिता मागणी केलेल्या प्रत्येक कुटूंबास नरेगा योजनेअंतर्गत शेळीपालन शेड बांधणे हे काम उपलब्ध करुन देण्यात येते.

ग्रामीण भागामध्ये शेळया-मेंढयापासून मिळणारे शेण, लेंडया व मूत्र यापासून तयार होणा-या उत्कृष्ठ दर्जाच्या सेंद्रीय खतांचा पक्क्या स्वरुपाचे व चांगले गोठे नसल्याने नाश होतो. शेळया-मेंढयाकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधून दिल्यास या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल,मूत्र एकत्र करुन शेतीमध्ये उत्कृष्ठ प्रकारचे सेंद्रीय खत म्हणून वापर करता येईल.यामुळे शेतीच्या सुपिकतेबरोबरच शेती उत्पादन वाढीवर चांगला परिणाम होऊन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकेल.

प्रत्येक शेतकऱ्याकडे २ ते ३ शेळ्या असतातच परंतु त्या २ ते २ शेळ्यांसाठी शेतकऱ्याला स्व-खर्चातून शेड बांधणे परवडण्यासारखे नसते या गोष्टीचा विचार करून शासनाने २ ते ३ शेळ्या असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही योजना राबविण्याचे ठरविले आहे

  • या योजनेअंतर्गत १० शेळ्यांसाठी शेड बांधण्यासाठी ४९२८४ – रुपये अनुदान देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत २० शेळ्यांसाठी दुप्पट आणि 30 शेळ्यांसाठी तिप्पट अनुदान दिले जाते.
  • शेळीसाठी बांधण्यात येणारी शेड सिमेंट व विटा लोखंडे सळ्यांच्या आधाराने बांधण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत एका कुटुंबात जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरीता 3 पट अनुदान मंजूर करण्यात येते.
हे वाचा-  सर्वोदय सोलर योजनेअंतर्गत मिळणार 1 कोटी कुटुंबांना मोफत सोलर

या योजनेसाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे पहा .👇👇👇

कुकूट पालन शेड बांधणे

Gotha Anudan 2023

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश शेतकरी शेती सोबत कुकूटपालनासारखा जोड व्यवसाय सुरु करतात.
कुक्कुट पालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबाना पूरक उत्पादनाबरोबरच आवश्यक पोषक प्राणीजन्य प्राथिनांचा पुरवठा होतो. खेडेगावामध्ये कुक्कूटपक्षांना चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध नसतो. त्यामुळे त्यांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते.

कुक्कूटपक्ष्यांचे उन,पाऊस, परभक्षी जनावरे व वारंवार येणा-या आजारांपासून सरंक्षण करण्यासाठी चांगल्या प्रतीचा निवारा उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
चांगल्या निवा-यामुळे रात्रीच्या वेळी त्यांचे, पिल्लांचे व अंडयाचे परभक्षी प्राण्यांपासून सरंक्षण होण्यास मदत होईल

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन,
वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.
तसेच भूमिहीन (शेती नसलेले) कुटूंबाना प्राधान्य देण्यात येईल.

योजनेअंतर्गत १०० पक्ष्यांकरिता ७.५० चौ.मी.शेड बांधण्यात येईल तसेच त्याची लांबी ३.७५ मी. आणि रुंदी २.० मी.असेल
लांबीकडील बाजूस ३० सेमी उंच व २० सेमी जाडीची, विटांची जोत्यापर्यंत भिंत बांधण्यात येईल तसेच छतापर्यंत कुक्कूट जाळी ३० सेमी X ३० सेमीच्या खांबानी आधार दिलेली असेल.
आखूड बाजूस २० सेमी जाडीची सरासरी २.२० मीटर उंचीची भिंत असेल. छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात येईल.
छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे / सिमेंटचे पत्रे वापरण्यात येतील. तळयाच्या पायासाठी मुरुमाची भर घालण्यात येईल त्यावर दुय्यम दर्जाच्या विटा व सिमेंटचा १ : ६ प्रमाण असलेला मजबूत थर असेल
पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येईल त्यासाठी शेळयांना पिण्याच्या पाण्याची टाकी बांधण्यात येईल
या योजनेअंतर्गत छतास लोखंडी तुळयांचा आधार देण्यात येईल छतासाठी गॅल्व्हनाइज्ड लोखंडी पत्रे/सिमेंटचे पत्रे वापरण्यात येतील. तळासाठी मुरुम घालण्यात येईल.

  • या सर्व गोष्टीचा विचार करून शासनाने १०० पक्षांकरिता शेड बांधण्यासाठी रुपये ४९७७०/- अनुदान देण्याचे ठरविले आहे या शेडमध्ये १०० पक्षी सांभाळणे शक्य होईल.
  • जर लाभार्थ्यांनी पक्ष्यांची संख्या १५० च्या वर नेल्यास शेडसाठी दुप्पट अनुदान देण्यात येईल
  • जर एखाद्याकडे १०० पक्षी उपलब्ध नसल्यास त्याने शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर २ जमीनदारांसह शेडची मागणी करायची आहे. त्यानंतर बांधकाम पूर्ण झाल्यानंतर शेडमध्ये १०० पक्षी आणणे लाभार्थ्यास बंधनकारक राहील.
हे वाचा-  पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये लाभार्थ्यां यादीत तुमचे नाव पहा

भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग

Sharad Pawar Gai Gotha Yojana

भू-संजीवनी नाडेप कंपोस्टिंग बांधकामासाठी १०५३७/- रुपये दिले जातात.
जमिनीच्या आरोग्यात सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठया प्रमाणावर भर पडू शकते.
शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंगव्दारे प्रक्रीया केल्यास त्यातील सेंद्रीय पदार्थ जैविक पध्दतीने, सूक्ष्म जीव तसेच गांडुळाव्दारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे ह्यूमस सारखे सेंद्रीय कंपोस्ट खत तयार होते.
या खताचा वापर शेतात मोठया प्रमाणावर केल्यास जमिनाच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते.

अशा सेंद्रीय पदार्थात सर्वच प्रकारचे सूक्ष्म जीव मोठया प्रमाणावरअसतात. योग्य परिस्थितीत या सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि हे मोठया संख्येत असलेले सूक्ष्मजीव सेंद्रीय पदार्थांचे विघटन झपाटयाने करतात.

नाडेप कंपोस्टिंग अंतर्गत ३.६ मी X १.५ मी X ०.९ मी आकाराचे जमिनीवरील बांधकाम करण्यात येईल.
त्यापासून साधारणत: २ ते २.२५ टन कंपोस्ट खत ८० ते ९० दिवसांत तयार होईल. हे खत ०.२५ हेक्टर क्षेत्रास पुरेसे आहे. शेतातून निघालेल्या सर्व वनस्पतीजन्य पदार्थांपासून सेंद्रीय खत तयार करुन, परत
शेतात टाकणे ही काळाची गरज आहे. सेंद्रीय खतांमुळे जमिनीचा कस व जलधारण शक्ती वाढून पोषक
द्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणात होतो. जमीन भुसभूशीत राहून जमिनीत हवा खेळती राहते. शेतात उपयुक्त सूक्ष्म जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते. नाडेपच्या बांधकामातील चारही भिंतीत छिद्रे ठेवली जातात.
जेणेकरुन त्यातून हवा खेळती राहून सेंद्रीय पदार्थांचे विघटन होण्यास, कुजण्यास चालना मिळते.

हे वाचा-  मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज, पात्रता आणि माहिती

नाडेपचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्यात सेद्रीय पदार्थ / कचरा, शेण, माती आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. साधारणत: पहिल्या थरात १०० किलो कचरा तळात रचला जातो तो अंदाजे ६ इंच उंचीचा असतो. ४ किलो गायीचे शेण १२५ ते १५० लिटर पाण्यात मिसळून पहिल्या थरावर शिंपले जाते. हंगामातील तापमानानुसार पाणी कमी-जास्त लागते. या शेण पाण्याचा दुस-या थराच्या वर खडे, काच, इत्यादी विरहीत गाळलेली स्वच्छ माती (पहिल्या थरातील कच-याचे वजनाचे अंदाजे निम्मे ५० ते ५५ किलो) दुस-या थरावर पसरवली जाते त्यावर थोडे आवश्यकतेनुसार पाणी शिंपडले जाते. अशा प्रकारे एकावर एक थर नाडेप टाकीच्या टाकीच्या वर १.५ फुटापर्यंत रचून ढीग तयार केला जातो. त्यानंतर ढिगाचा वरचा थर ३ इंचचे शेण व मातीचे मिश्रणाने (४०० ते ५०० किलो) बंद केला जातो. २ ते ३ महिन्यात काळपट, तपकिरी, भुसभूशीत, मऊ, ओळसर आणि दुर्गंध विरहीत कंपोस्ट तयार होते.

सदर कामाचा लाभ मिळविण्यासाठी मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वत:ची जमीन, वैयक्तीक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी पात्र असतील.

🔴🔴🔴🔴🔴

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment