व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा
 लाडकी बहिण योजना पहिला हफ्ता  सर्व शासकीय योजना

लाडकी बहिण योजनेसाठी वेबसाईट वरून असा करा अर्ज..

नमस्कार, महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहिण योजनेचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ॲप वरून सुरू होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सध्या नारीशक्ती दूत ॲप वरून फॉर्म भरणे बंद आहे. आज आपण लाडकी बहिण योजनेच्या Official पोर्टल वेबसाईट वरून योजनेसाठी अर्ज कसा करावा याबद्दल माहिती पाहूया…

महाराष्ट्र शासनाने नुकतेच लाडकी बहिण वेबसाईट उपलब्ध करून दिलेली असून, या वेबसाईट वर लाडकी बहिण योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तुम्ही जर यापूर्वी नारी शक्ती दूत ॲप वरून लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केला नसल्यास तुम्ही या वेबसाईट वरून अर्ज करू शकता. चला तर मग हा अर्ज कश्या पद्धतीने भरायचा आहे याबद्दल माहिती पाहूया…

लाडकी बहिण योजना अर्ज वेबसाईट | Ladaki Bahin Yojana Apply Website

1. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहिण योजनेच्या ऑफिशियल पोर्टल वर जावे लागेल. त्यासाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in ही वेबसाईट उघडून घ्या..

2. या वेबसाईट च्या मुख्य पानावर तुम्हाला योजनेसंदर्भात सर्व Basic माहिती मिळेल. जसे की योजनेसाठी पात्रता, नियम आणि अटी आणि लाडकी बहिण योजना लाभार्थी यादी

3. योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे खाते बनवून घ्यावे लागेल. यासाठी अर्जदार लॉगिन या पर्यायावर क्लिक करून, Create Account या पर्यायावर क्लिक करा..

हे वाचा-  लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी कशी तपासायची संपूर्ण माहिती | check ladki bahin labharti yadi

4. आता तुम्हाला एक फॉर्म दिसेल त्यावर तुम्हाला तुमचे नाव (आधार कार्ड प्रमाणे), त्यानंतर मोबाईल क्रमांक, जिल्हा, तालुका आणि गाव आदी तपशील भरायचे आहेत.

5. तुमची सामान्य माहिती भरल्यानंतर Authorised Person या पर्यायात पहिला पर्याय ‘General Women’ निवडा, Capacha भरून सबमिट करा. तुमचे खाते तयार होईल..

6. यानंतर तुमचा मोबाइल क्रमांक आणि पासवर्ड प्रविष्ट करून लॉगिन करा..

7. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला वरील उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स वरती क्लिक करायचे आहे. तेथून मुख्य मेनू ओपन होईल.

8. मुख्य मेनुवर वेगवेगळे पर्याय दिसतील जसे की Application of Mukhyamantri – Majhi Ladki Bahin Yojana,  Scheme आणी Application made earlier. यापैकी पहिला पर्याय निवडा.

9. यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर प्रविष्ट करायचा आहे, आणि Send OTP पर्यायावर क्लिक करायचे आहे. तुमच्या आधार कार्डशी सलग्न मोबाइल वर OTP येईल तो प्रविष्ट करायचा आहे.

10. आता तुम्हाला तुमची इतर माहिती जसे की तुमचे नाव, जन्मतारीख, शिक्षण आणि व्यवसाय इत्यादी माहिती प्रविष्ट  करावी लागेल.

11. यानंतर शेवटच्या स्टेप मधे तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड च्या दोन्ही बाजू, Pan Card आणि रेशन कार्ड इत्यादी..

वर सांगितल्या प्रमाणे सर्व माहिती काळजीपूर्वक भरून लाडकी बहिण योजनेचा अर्ज सबमिट करा. अर्ज भरल्यानंतर दोन ते तीन आठवड्यात अर्ज तपासून अर्जाची स्थिती सांगितली जाते. लवकरात लवकर अर्ज भरून घ्या जेणे करून लाडकी बहीण योजनेचा पहिला आणि दुसरा हफ्ता 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील

हे वाचा-  ऑनलाइन लर्निंग ड्रायव्हिंग लायसन्स अर्ज करा | Driving Licence apply

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page