महिला सक्षमीकरणाच्या दिशेने महाराष्ट्र सरकारने अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या अनुभवातून धडा घेत महायुती सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवून काही मोठ्या घोषणा केल्या आहेत. यामध्ये Lakhpati Didi योजना ही एक विशेष योजना आहे, जी महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी एक महत्त्वाचं साधन ठरत आहे.
कधी झाली सुरुवात?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून भाषण करताना ‘लखपती दीदी’ योजनेची घोषणा केली. या योजनेनुसार महिलांना स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत म्हणून बिनव्याजी 1 ते 5 लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. आर्थिक दृष्ट्या वंचित असलेली महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी केंद्र सरकारनं ही योजना सुरु केली आहे.
पाच लाख रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
5 lakh personal loan
काय आहे लखपती दीदी योजना?
Lakhpati Didi योजना ही केंद्र सरकारद्वारे सुरू केलेली एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे आणि त्यांना स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेतून महिलांना कौशल्य प्रशिक्षण (Skill Training) दिले जाते. प्रशिक्षणानंतर त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज (Interest-free loan) देखील पुरवले जाते. हे कर्ज 1 लाखांपासून ते 5 लाख रुपयांपर्यंत असू शकते.
महिला सक्षमीकरणासाठी मिळते ट्रेनिंग
या योजनेतून महिलांना त्यांच्या आवडीच्या व्यवसायात कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींमध्ये महिलांना मार्गदर्शन मिळतं. व्यवसायाची सुरुवात, व्यवस्थापन (Management) आणि मार्केटिंग (Marketing) याबाबतही त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यामुळे महिलांना त्यांच्या व्यवसायात यश मिळवणं सोपं जातं.
कर्जाचा लाभ आणि अटी काय आहेत
Lakhpati Didi योजनेतून महिलांना बिनव्याजी कर्ज दिलं जातं, ज्यामुळे त्यांना आर्थिक भार कमी होतो. मात्र, या कर्जाचा लाभ फक्त 18 ते 50 वयोगटातील महिलांनाच मिळतो. या योजनेसाठी फक्त महिलाच अर्ज करु शकतात . लाभार्थी महिला संबंधित राज्याची रहिवाशी असावी. त्या महिलेचे वार्षिक उत्पन्न 3,00,000 (तीन लाखांपेक्षा) कमी असणे आवश्यक.
तसेच, या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांनी बचत गट (Self-help group) सोबत जोडलेलं असणं आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया (Application Process) आणि आवश्यक कागदपत्रे
Lakhpati Didi योजना साठी अर्ज करण्यासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात. यामध्ये
- आधार कार्ड (Aadhaar Card)
- पॅन कार्ड (PAN Card)
- बँक पासबुक (Bank Passbook)
- उत्पन्नाचा दाखला (Income Certificate)
- बिजनेस प्लॅन (Business Plan) यांचा समावेश आहे.
अर्ज प्रक्रिया
लखपती दीदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी महिलांना ‘स्वयं मदत गट’ व्यवसाय योजना तयार करावी लागेल. व्यवसायाचा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट योजना आणि अर्ज सरकारकडं पाठवण्यात येईल. या अर्जाची छाननी आणि पुनरावलोकन केलं जाईल. सर्व पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या महिला या योजनेसाठी पात्र होतील.
पाच लाख रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी खालील बटनवर क्लिक करा.
5 lakh personal loan
योजनेचा प्रभाव (Impact) आणि भविष्यातील उद्दिष्टे
या योजनेमुळे आत्तापर्यंत एक कोटींहून अधिक महिलांना लाभ मिळालाय. भविष्यात अजूनही कोट्यवधी महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना एक महत्त्वपूर्ण साधन ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या योजनेच्या प्रभावाबद्दल वारंवार उल्लेख केला आहे.
लखपती दीदी योजना
Lakhpati Didi योजना ही महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक ठोस पाऊल आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरली आहे. या योजनेचा योग्य लाभ घेत महिलांनी आपले आर्थिक स्वातंत्र्य साध्य करावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.