व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! फेब्रुवारी चा हप्ता वेळेवर मिळणार की उशीर होणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वत्र सुप्रसिद्ध ठरली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत दिली जाते. राज्यातील महिला स्वावलंबी बनवण्यासाठी महायुती सरकारने ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जुलै महिन्यापासून जानेवारी महिन्यापर्यंत एकूण सात हप्त्याचे लाभार्थी महिलांच्या खात्यात दहा हजार पाचशे रुपये जमा झाले आहेत. यानंतर महिलांना फेब्रुवारी महिन्याचे प्रतीक्षा लागली आहे.

महिलांची पडताळणी

लाडकी बहीण योजनेत महिलांना पडताळणी केली जात आहे पाच टप्प्यांमध्ये ही पडताळणी केली जाणार आहे. चार चाकी वाहन असलेल्या महिलांची सध्या तपासणी सुरू आहे. ही पडताळणी होण्यासाठी अजून आठ दहा दिवस लागण्याची शक्यता आहे त्यानंतर त्याचा अहवाल शासनाला पाठवला जाईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल पडताळणी झाल्यानंतर 1500 रुपये दिले जातील. त्यासाठी मार्च महिना उजाडेल. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र या योजनेच्या हप्त्याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. यामध्ये काही महिला आधीच इतर योजनांचा लाभ घेत आहेत काही महिलांकडे चार चाकी वाहने आहेत. तर काही महिला 24 ते 65 वयोगटात बसत नाहीत. त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. या योजनेच्या अर्थ अर्जाची पडताळणी सुरू आहे. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहेत.

हे वाचा 👉  मुख्यमंत्री वयोश्री योजना: ज्येष्ठ नागरिकांसाठी नवी योजना

लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. तसेच, लाभार्थ्यांच्या बँक खात्यातून आतापर्यंत (जुलै 2024 ते डिसेंबर 2024) देण्यात आलेली लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असेही सरकारने यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

योजनेचे कोट्यवधी रुपये कमी

लाडकी बहीण योजनेत लाखो महिला अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे या महिलांना मिळणारा लाभ आता सरकारकडून देणे बंद झाले आहे. यामुळे सरकारकडून देण्यात येणाऱ्या निधीपैकी जवळपास 80 कोटी रुपये हे कमी झाले आहेत.

दिवशी येणार फेब्रुवारी चा हप्ता

फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट समोर आली नाही. परंतु या महिन्याल हप्ता २५ फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येऊ शकतो. मागील ३ महिन्यांपासून हा शेवटच्या आठवड्यात हा हप्ता येत आहे. त्यामुळे या महिन्यातदेखील तेव्हाच हप्ता महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. (Ladki Bahin Yojana News)

फेब्रुवारी महिना हा २८ दिवसांचा आहे. त्यामुळे २८ दिवसांचा कालावधी लक्षात घेतला. महिना संपण्याआधी ४-५ दिवसात हे पैसे दिले जाऊ शकतात. परंतु हा हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.महिना अखेरपर्यंत पैसे महिलांच्या खात्यात येऊ शकतात.

हे वाचा 👉  कुक्कुटपालनासाठी सरकारकडून मिळत आहे 33 टक्के अनुदान, असा करा अर्ज | poultry pharming subsidy scheme

लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार

दरम्यान मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीपूर्वी आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये ऐवजी 2100 रुपये देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र याबाबत अजून अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. सत्ता स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की, येणारे अर्थसंकल्पात याबाबत आम्ही निर्णय घेऊ.त्याचबरोबर अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, मार्च महिन्यातील अर्थसंकल्पात आपण याबाबत चर्चा करू त्यामुळे नवीन अर्थसंकल्पात याबद्दलची घोषणा होईल आणि यानंतर नव्या आर्थिक वर्षापासून महिलांच्या खात्यात 2100 रुपये जमा होऊ शकतात.

नमस्कार, मी सचिन पाटील, शासकीय कार्यालयात काम करता करता, बऱ्याच वर्षांपासून शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागातील कुटुंबांना मिळवा यासाठी कार्यरत आहे. त्याच संकल्पनेतून मी हे लेख लिहले आहेत.

Leave a Comment

You cannot copy content of this page